भारतीय सैन्याकडून LAC ओलांडून गोळीबार, चीनचा कांगावा

पूर्व लडाख सेक्टरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) भारत आणि चीन सैन्यामध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली आहे (Firing on India China LAC).

भारतीय सैन्याकडून LAC ओलांडून गोळीबार, चीनचा कांगावा

नवी दिल्ली : मागील 4 महिन्यांपासून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीनच्या सैन्यात सातत्याने तणावपूर्ण स्थिती आहे. त्यातच आता दोन्ही सैन्यांमध्ये संघर्ष झाल्याची माहिती समोर येत आहे. पूर्व लडाख सेक्टरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) गोळीबार झाल्याची घटना घडली आहे (Firing on India China LAC). चीनने भारतीय सैन्याने प्रथम हल्ला केल्याचा आरोप केला आहे. याबाबत चीनचं सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्समध्ये याबाबतचा दावा करण्यात आला आहे.

एएनआय (ANI) या वृत्तसंस्थेने सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सांगितलं, “पूर्व लडाख सेक्टरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या ठिकाणी भारत आणि चीन सैन्या आमनेसामने आल्याची स्थित तयार झाली. या ठिकाणी मागील 3 महिन्यापासून तणावपूर्ण स्थिती आहे. अधिक तपशील समोर येणे बाकी आहे.”

चीनचा भारतीय सैन्यावर गोळीबार केल्याचा आरोप

चीनने भारतीय सैन्यावर प्रथम गोळीबार केल्याचा आरोप केला. चीनचं सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, “चीनचं सैन्य पीएलएच्या वेस्टर्न थिएटर कमांडच्या प्रवक्त्याने म्हटलं आहे की भारतीय सैन्याने पुन्हा एकदा बेकायदेशीरपणे प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून पँगाँग त्सो झीलच्या दक्षिण किनाऱ्याजवळील डोंगरावर चढाई केली.

ग्लोबल टाइम्सच्या अन्य एका ट्वीटमध्ये दावा करण्यात आला, “भारतीय सैनिकांनी पीएलएच्या सीमा टेहाळणी पथकावर इशारा देत गोळीबार केला. यानंतर चिनी सैनिकांना नाईलाजाने परिस्थिती स्थिर करण्यासाठी प्रत्युत्तरादाखल गोळीबार करावा लागला.” असं असलं तरी चीनच्या सैन्याकडून होणाऱ्या या दाव्यावर केंद्र सरकार किंवा भारतीय सैन्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

विशेष म्हणजे 1975 नंतर म्हणजेच जवळपास 45 वर्षांनंतर पहिल्यांदा दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये एलएसीवर फायरिंग झाली आहे. भारत आणि चीनमध्ये एप्रिल-मेपासून फिंगर एरिया, गलवान खोरं, हॉट स्प्रिंग्स आणि कोंगरुंग नालासह अनेक ठिकाणी संघर्ष झाल्यानंतर तणाव कायम आहे.

जूनमध्ये गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांसोबत झालेल्या संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारत चीनमधील संबंधांमध्ये मोठा तणाव निर्माण झालेला आहे. यानंतर दोन्ही देशांमध्ये 3 महिन्यांपासून चर्चा सुरु आहे. यात 5 वेळी लेफ्टनंट जनरल स्तरावरील बैठक झाली. मात्र, यातून कोणताही पर्याय निघाला नाही.

संबंधित बातम्या :

LAC वरच्या सैनिकांचा आत्मविश्वास हिमालयाएवढा; फक्त आदेशाची गरज : लष्करप्रमुख नरवणे

भारत चीन सीमेवरील तणाव, शरद पवारांची माजी हवाईदल प्रमुख आणि माजी परराष्ट्र सचिवांशी चर्चा

चीनचा हिंदमहासागरात भारताविरोधात नवा कट, भारताकडूनही चोख उत्तर

Firing on India China LAC

Published On - 8:13 am, Tue, 8 September 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI