नांदेडमधून पंजाबला परतलेले पाच भाविक ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

नांदेडमधील गुरुद्वाराच्या दर्शनासाठी पंजाब आणि हरियाणा राज्यातील भाविक मार्च महिन्याच्या सुरुवातीला आले होते. (Punjab pilgrims returned from Nanded tested Corona Positive)

नांदेडमधून पंजाबला परतलेले पाच भाविक 'कोरोना' पॉझिटिव्ह

चंदिगढ : नांदेडमधून पंजाबला परतलेले पाच भाविक ‘कोरोना’ पॉझिटिव्ह आढळले आहेत. लॉकडाऊनमुळे गेल्या महिनाभरापासून नांदेडमधील गुरुद्वाऱ्यात अडकलेले चार हजार पर्यटक विशेष बसेसनी मूळगावी परतले आहेत. (Punjab pilgrims returned from Nanded tested Corona Positive)

नांदेडमधील हुजूर साहिबहून पंजाबमधील तर्ण-तरण जिल्ह्यात हे भाविक परतले आहेत. ‘कोरोना’ पॉझिटिव्ह सापडलेल्या पाचही रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली नव्हती. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नांदेडहून येणाऱ्या सर्व पर्यटकांना क्वारंटाइन करण्याचा निर्णय पंजाबच्या आरोग्य विभागाने घेतला आहे. या सर्वांची ‘कोरोना’ चाचणीही घेतली जाणार आहे.

नांदेडमधील गुरुद्वाराच्या दर्शनासाठी पंजाब आणि हरियाणा राज्यातील भाविक मार्च महिन्याच्या सुरुवातीला आले होते. पण लॉकडाऊन झाल्याने सर्व भाविक अडकून पडले. या भाविकांना परत नेण्यासाठी पंजाब सरकारने पाठवलेल्या 80 बसेस काल नांदेडमध्ये दाखल झाल्या होत्या.

भाविकांना परत पाठवण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकार, स्थानिक प्रशासन आणि पंजाब सरकारकडून प्रयत्न सुरु होते. त्या भाविकांना पंजाबला पाठवण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली होती. त्यानुसार यापूर्वी जवळपास आठशे भाविकांना दोन टप्प्यात पंजाबला आणण्यात आले होते. तर उरलेल्या 3500 भाविकांना परत नेण्यासाठी पंजाब सरकारने 80 बसेस पाठवल्या होत्या.

(Punjab pilgrims returned from Nanded tested Corona Positive)

Published On - 10:38 am, Tue, 28 April 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI