पाऊस LIVE : कोयणा धरणाचे दरवाजे 16 फुटांवर उघडले, पूरपरिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता

मुंबईसह उपनगरात पावसाने विश्रांती घेतली असली तरीही पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी, औरंगाबाद, सांगली यासह इतर ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. कोल्हापूर आणि सांगलीत पावसाचा हाहा:कार पाहायला मिळत आहे.

पाऊस LIVE : कोयणा धरणाचे दरवाजे 16 फुटांवर उघडले, पूरपरिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता
Follow us
| Updated on: Aug 07, 2019 | 11:57 PM

मुंबई : मुंबईसह उपनगरात पावसाने विश्रांती घेतली असली तरीही पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी, औरंगाबाद, सांगली यासह इतर ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. कोल्हापूर आणि सांगलीत पावसाचा हाहा:कार पाहायला मिळत आहे. कोल्हापूर शहरात पंचगंगा नदीचे (Panchaganga River) पाणी घुसलं आहे. शहरात पाणी घुसल्याने मोठं नुकसान झालं आहे. तसेच शहराचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

सांगलीत सततच्या पावसामुळे कृष्णा नदीला महापूर आला आहे. कृष्णा नदीच्या पाणीपातळी 49 फुटांपर्यंत पोहोचली आहे. तसेच यामुळे वारणा आणि कृष्णा नदीला पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान या भीषण पूरपरिस्थितीमुळे मदतीसाठी NDRF ची टीम दाखल झाली आहे.

LIVE UPDATE

[svt-event title=”कोयणा धरणाचे दरवाजे 16 फुटांवर उघडले, पूरपरिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता” date=”07/08/2019,11:41PM” class=”svt-cd-green” ] सातारा : पावसामुळे सांगली-साताऱ्यात महापूर, कोयना धरणाचे दरवाजे 14 फुटांवरुन 16 फुटांवर उघडले, एकूण विसर्ग 1.24 लाख कयुसेक्सने वाढला, उद्या पूरपरिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता, सांगलीमध्ये पुरपातळी वाढण्याची दाट शक्यता [/svt-event]

[svt-event title=”सिंधुदुर्गातही पूरस्थिती कायम” date=”07/08/2019,11:57PM” class=”svt-cd-green” ] सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातही पूरस्थिती कायम, मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गरज असल्यास उद्या शाळा बंद ठेवण्याचे शिक्षणाधिकाऱ्यांचे मुख्याध्यापकांना आदेश [/svt-event]

[svt-event title=”पूरग्रस्तांच्या मदतीला रेल्वे धावणार, कराड ते मिरज दरम्यान विशेष रेल्वे” date=”07/08/2019,11:51PM” class=”svt-cd-green” ] पुणे : पूरग्रस्तांच्या मदतीला रेल्वे धावणार, कराड ते मिरज दरम्यान विशेष रेल्वे गाडी सुरु करणार, रस्त्यांचा संपर्क तुटल्याने मदत आणि बचाव कार्यासाठी विशेष रेल्वे, 8 ऑगस्ट पासून पुढील तीन दिवस विशेष रेल्वे सुरू राहणार, ही रेल्वे मिरज वरुन 12.05 वाजता निघेल आणि 1.40 वाजता कराड पोहोचेल, त्यानंतर पुन्हा कराड वरून 2 वाजता परतीच्या प्रवासाला निघेल आणि 3.40 वाजता मिरज पोहोचेल, ही विशेष रेल्वे मिरज स्टेशनवर सोलापूर पंढरपूर एक्सप्रेसला जोडली जाईल [/svt-event]

[svt-event title=”पूरस्थितीमुळे मावळ, भोर आणि मुळशीतील शाळांना गुरुवारी सुट्टी जाहीर” date=”07/08/2019,11:54PM” class=”svt-cd-green” ] पुणे : आपत्कालीन आणि पूरस्थिती कायम, गुरुवारी (8 ऑगस्ट) पुणे जिल्ह्यातील मावळ, भोर आणि मुळशी प्री स्कूल, प्राथमिक आणि माध्यमिक शाळा तसेच उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर [/svt-event]

[svt-event title=”उजनी 100 टक्के भरलं” date=”07/08/2019,5:23PM” class=”svt-cd-green” ] प्रचंड पावसाने सोलापुरातील उजनी 100 टक्के भरलं, तर औरंगाबादेतील जायकवाडी धरणात 60 टक्के पाणीसाठी, गोदावरीच्या पाण्याने अनेक गावात पूर [/svt-event]

[svt-event title=”कोकणात पावसाची उसंत” date=”07/08/2019,5:22PM” class=”svt-cd-green” ] रत्नागिरी-सिंधुदुर्गातील पावसाचा जोर ओसरला, मात्र रायगड जिल्ह्यात पूरसदृश परिस्थिती कायम, महाड,माणगाव, तळा, पोलादपूर तालुक्यातीन अनेक गावं पाण्याखाली [/svt-event]

[svt-event title=”सांगली बुडाली” date=”07/08/2019,5:22PM” class=”svt-cd-green” ] कृष्णा नदीला पूर, त्यात कर्नाटकातील अलमट्टीच्या बॅक वॉटरची भर, सांगली बुडाली, 1700 हेक्टर शेतीचं नुकसान, हजारो नागरिकांचं स्थलांतर [/svt-event]

[svt-event title=”राधानगरी धरणाचे दरवाजे बंद” date=”07/08/2019,5:21PM” class=”svt-cd-green” ] राधानगरी परिसरात पाऊस मंदावल्याने धरणाचे दरवाजे बंद, धास्तावलेल्या कोल्हापूरकरांना मोठा दिलासा, मात्र पुणे-बंगळुरु महामार्ग अद्याप ठप्प, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन कोल्हापुरात [/svt-event]

[svt-event title=”महापुरात 16 जणांचा बळी” date=”07/08/2019,5:21PM” class=”svt-cd-green” ] पश्चिम महाराष्ट्रातील महापुरात आतापर्यंत 16 बळी, पुणे विभागीय आयुक्तांची माहिती, मुख्यमंत्र्यांकडून आढावा बैठक, शक्य ती सर्व मदत पोहोचवण्याचं आश्वासन [/svt-event]

[svt-event title=”रत्नागिरीत पेट्रोल टंचाई” date=”07/08/2019,1:46PM” class=”svt-cd-green” ] पश्चिम महाराष्ट्रातील पुराचा फटका रत्नागिरीकरांना बसला आहे. पेट्रोल डिझेल घेवून येणाऱ्या गाड्या मध्येच अडकल्या आहेत. त्यामुळे रत्नागिरीत पेट्रोल टंचाई निर्माण झाली आहे. इंधन असलेल्या पेट्रोल पंपावर एक ते दिड किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत. [/svt-event]

[svt-event title=”मुंबई आणि नवी मुंबईत गोकुळ दूध तुटवड्याची शक्यता” date=”07/08/2019,1:39PM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूरमध्ये आलेल्या पुराचा दूध संकलणावर परिणाम,उद्या गोकुळ दूध मुंबईला मिळणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात आहे. [/svt-event]

[svt-event title=”रत्नागिरीत दुधाचा तुटवडा” date=”07/08/2019,1:36PM” class=”svt-cd-green” ] रत्नागिरी जिल्ह्यात आज दुधाच्या एका थेंबाचेही वितरण झाले नाही. जिल्ह्यात दुधाचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुराचा फटका जिवनावश्यक वस्तूवर बसत आहे. रस्ते बंद झाल्यामुळे दुध वितरण होऊ शकत नाही. [/svt-event]

[svt-event title=”पंढरपुरात भीमा नदीला पूर, 7 हजार लोकांचे स्थलांतर” date=”07/08/2019,1:27PM” class=”svt-cd-green” ] पंढरपुरातील भीमा नदीलाही पूर आला आहे. पंढरपूर जवळील गोपाळपूर येथील पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे पंढरपूर-विजयपूर मार्ग बंद झाला आहे. पंढरपूर-नगर मार्गावरील पूल पाण्याखाली गेल्यामुळे पंढरपूर-नगर तसेच पंढरपूर- सोलापूर मार्गही बंद झाले आहेत. पंढरपुरातील 1 हजार 58 कुटुंबांतील 7 हजार 37 लोकांचे स्थलांतर केले आहे. [/svt-event]

[svt-event title=”‘तुझ्यात जीव रंगला’च्या कलाकारांना पुराचा फटका” date=”07/08/2019,1:10PM” class=”svt-cd-green” ] कोल्हापुरातील पुरात तुझ्यात जीव रंगला कार्यक्रमाचे शूटिंग सुरु होते. मात्र कोल्हापुरात सध्या मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे येथे पंचगंगा नदीला पूर आला आहे. या पुराचे पाणी संपूर्ण शहरात शिरलं आहे. याचा फटका तुझ्यात जीव रंगलाच्या सर्व कलाकारांना बसला आहे. राणाद, अंजली बाईसह सर्व कलाकारांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. [/svt-event]

[svt-event title=”दरड कोसळल्याने महाड वाहतूक बंद” date=”07/08/2019,1:01PM” class=”svt-cd-green” ] दरड कोसळल्याने भोर-महाज वाहतूक बंद करण्यात आली आहे. वरंध घाटात महाड हद्दीत शिवतर गावाजवळ काल तीन ठिकाणी दरड पडली. तर एका ठिकाणी रस्ता खचल्याने भोर-महाड वाहतूक पूर्ण बंद आहे. [/svt-event]

[svt-event title=”सांगलीतील हरिपूर गावात 2 हजार लोक अडकले” date=”07/08/2019,10:29AM” class=”svt-cd-green” ] सांगलीत सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीला पूर आला आहे. पुरामुळे हरिपूर गावात तब्बल 2 हजार लोक अडकले आहेत. लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सैन्य दलाकडून बचावकार्य सुरु आहे. [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबादमध्ये पुरामुळे 100 फूट जमीन वाहून गेली” date=”07/08/2019,9:48AM” class=”svt-cd-green” ] गोदावरीच्या पुरामुळे पुला शेजारची शंभर फूट जमीन वाहून गेली. वैजापूर तालुक्यातील वंजारगाव गावातील घटना. गोदावरी नदीवरील पुलाशेजारी 100 फूट जमीन पाण्यात वाहून गेली. [/svt-event]

[svt-event title=”पाऊस वाढल्याने खडकवासला धरणातून विसर्ग” date=”07/08/2019,9:45AM” class=”svt-cd-green” ] पावसाचा जोर वाढल्याने खडकवास धरणातून विसर्ग सुरु करण्यात आला आहे. धरण क्षेत्रात सतत पाऊस पडत आहे. तसेच पुण्यातील पुरस्थिती कायम आहे. बाबा भिडे, जयंत टिळक पुल बंद करण्यात आले आहेत. [/svt-event]

[svt-event title=”गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस” date=”07/08/2019,9:39AM” class=”svt-cd-green” ] गडचिरोलीतील मुसळधार पावसामुळे पर्लकोटा नदीला पूर आला आहे. भामरागड तालुक्यातल्या शंभर गावांचा संपर्क तुटला आहे. पर्लकोटा नदीवरील अनेक पुल पाण्याखाली गेले आहेत. [/svt-event]

[svt-event title=”रायगड जिल्ह्यात पूरसदृश परिस्थिती” date=”07/08/2019,9:35AM” class=”svt-cd-green” ] रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई-गोवा महामार्ग पाण्याखाली गेला आहे. महाड,माणगाव, तळा, पोलादपूर तालुक्यातीन अनेक गावं पाण्याखाली गेली आहेत. सुधागड तालुक्यातील खोपोली-पाली-वाकण रोडवरील पुल पाण्याखाली गेल्याने रस्ता बंद करण्यात आला आहे. [/svt-event]

[svt-event title=”सांगलीत  महापूर, 1 हजार 700 हेकटर शेती नुकसान” date=”07/08/2019,9:25AM” class=”svt-cd-green” ] सांगली शहरामध्ये पुराचं पाणी शिरले आहे. शामरावनगर, पत्रकार नगर, टिळक चौक, कोल्हापूर रस्ता, सांगलीवाडी यासह अनेक उपनगरात पुराचं पाणी पसरलं आहे. सांगली जिल्ह्यातील 43 हजार लोकांना स्थलांतरीत करण्यात आलं आहे. तर 12 जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवली. पुराच्या पाण्यामुळे 11 हजार 700 हेकटर शेती पिकाच नुकसान झालं आहे. [/svt-event]

[svt-event title=”कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ” date=”07/08/2019,9:22AM” class=”svt-cd-green” ] सांगलीतील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. 53 फूट 10 इंच इतकी नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंतची सर्वात जास्त पाणी पातळी नोदं करण्यात आली आहे. यापूर्वीही 2005 ला सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळी 53 फूट 9 इतकी नोंद करण्यात आली होती. [/svt-event]

[svt-event title=”रायगड येथे डोगंर खचला” date=”07/08/2019,9:19AM” class=”svt-cd-green” ] रायगड भालगावमध्ये डोंगर खचला आहे. त्यामुळे रोहा-भालेगाव मार्ग बंद करण्यात आला आहे. भालगाव मिठागर भुस्खलनची भीती वर्तवण्यात येत आहे. भालगाव मध्ये डोगंर खचलाय. [/svt-event]

[svt-event title=”रायगडमधील महाड वरंध घाटात 200 जण अडकले” date=”07/08/2019,9:17AM” class=”svt-cd-green” ] महाड वरंध घाटात 200 जण अडकले आहेत. घाटात तीन ठिकाणी दरड कोसळल्याने रात्रभर अनेक प्रवाशांनी वाघजाई मंदिराजवळ आसरा घेतला. यावेळी महाड प्रशासनाचे आपत्कालीन नंबरही बंद होते. पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरुन रोहा, माणगाव, महाड, पोलादपूर मार्ग वाहतूकीसाठी बंद करण्यात आले आहेत. [/svt-event]

[svt-event title=”कोयनेतून पाणी विसर्ग सुरुच” date=”07/08/2019,9:14AM” class=”svt-cd-green” ] कोयना धरणातून अजूनही 122475 क्युसेस विसर्ग सुरु आहे. कलेत धरण पाणलोट क्षेत्रात पाऊसही अजून सुरु आहे. [/svt-event]

[svt-event title=”रत्नागिरीत पावसाचा जोर ओसरला” date=”07/08/2019,9:04AM” class=”svt-cd-green” ] रत्नागिरीत पावसाजा जोर ओसरलेला दिसत आहे. राजापूर शहर आणि जवाहर चौकात अजूनही पाणी साचलेलं आहे. आंबा घाट अवजड वाहनांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. तसेच शहरात दुधाचा तुटवडा निर्माण झाला आहे. [/svt-event]

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.