5

Flood Updates | उत्तर भारतात पुराचा कहर, आसाममध्ये 84 जणांचा मृत्यू, बिहारमध्ये वीज पडून 10 बळी

आसाममध्ये आलेल्या पुराने हाहाकार माजवला असून आतापर्यंत 84 जणांच्या मृत्यू झाला आहे (Flood Updates Heavy Rain in Asam Bihar Delhi).

Flood Updates | उत्तर भारतात पुराचा कहर, आसाममध्ये 84 जणांचा मृत्यू, बिहारमध्ये वीज पडून 10 बळी
Follow us
| Updated on: Jul 20, 2020 | 9:51 AM

नवी दिल्ली : देशभरातील अनेक भागात मुसळधार पाऊस आणि पुराने हाहाकार माजवला आहे. आसाममध्ये आलेल्या पूरात आतापर्यंत 84 जणांच्या मृत्यू झालाय (Flood Updates Heavy Rain in Asam Bihar Delhi). आसाममधील 33 जिल्ह्यांपैकी 24 जिल्ह्यांच्या 25.30 लाख नागरिकांवर या पुराचा परिणाम झाला आहे. बिहारमध्ये देखील मुसळधार पावसात वीज कोसळून 10 जणांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे दिल्लीतही पुराची स्थिती तयार झाली, तर उत्तराखंडमध्येही पूल पडल्याची घटना घडली आहे.

यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आसाममधील पुराची आणि कोरोनाच्या स्थितीची माहिती घेण्यासाठी आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांना फोन केला. त्यांनी बागजान येथील तेलाच्या विहिरीत लागलेल्या आगीच्या घटनेचीही माहिती घेतली. मुख्यमंत्री सोनोवाल यांनी ट्विट केलं, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करुन आपली चिंता व्यक्त केली आणि नागरिकांसोबत एकजूटता दाखवली. पंतप्रधान मोदींनी आसामला सर्वोतपरी मदत देण्याचं आश्वासन दिलं.”

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

मुख्यमंत्री सोनोवाल यांनी पंतप्रधान मोदींना पुरामुळे राज्यातील 24 जिल्हे प्रभावित झाल्याची माहिती दिली. तसेच राज्य सरकारने पुरग्रस्तांसाठी मदत शिबीरं सुरु केल्याचं सांगत तेथे कोविड-19 चे सर्व नियम पाळले जात असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

दिल्लीतील रस्ते पाण्याखाली

दिल्लीतही रविवारी (19 जुलै) सकाळी झालेल्या मुसळधार पावसाने पाणीच पाणी झाले. काही ठिकाणी तर अगदी पुरस्थिती तयार झाली. दिल्लीतील जवळपास सर्वच भागात रस्ते पाण्याखाली गेल्याने नागरिकांना चांगल्याच अडचणींचा सामना करावा लागला. या पावसाचा सर्वाधिक फटका नवी दिल्लीला बसला. नवी दिल्लीतील मिंटो ब्रिजखाली तर पाण्यात बुडाल्याने एका टेम्पो चालकाचा मृत्यू झाला.

बिहारमध्ये वीज पडून 10 जणांचा मृत्यू

बिहारमध्ये विविध ठिकाणी वीज पडून 10 जणांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त केलं आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना तात्काळ प्रत्येकी 4 लाख रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. बिहारमध्ये रविवारी पूर्णिया जिल्ह्यात 3, बेगूसरायमध्ये 2, पटना, सहरसा, पूर्व चंम्पारन, मधेपुरा आणि दरभंगात प्रत्येकी एका नागरिकाचा मृत्यू झाला.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

नेपाळमधून येणाऱ्या नदींना आलेल्या उधाणामुळे बिहारमध्ये देखील पुरस्थितीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बिहारमध्ये देखील अनेक नागरी भागांमध्ये पाणी शिरलं आहे. नदीतील पाण्याचा स्तर वाढल्याने अनेक रस्ते पाण्याखाली गेले. त्यामुळे अनेक गावांशी संपर्कही तुटला आहे. हजारो लोकांना विस्थापित करण्यात आलं आहे. हवामान खात्याने याचा आधीच अंदाज वर्तवला होता.

उत्तराखंडमध्येही पूल कोसळला

उत्तराखंडमध्ये देखील गोरी नदीला पूर आल्याने मोठ्य प्रमाणात शेतीचं नुकसान झालं आहे. मुसळधार पावसाने पिथोरागड मुनस्यारी रोडवर मदखोटचा पूलही कोसळला. या परिसरातील लोक आधीच सुरक्षेसाठी आपली घरं सोडून दुसऱ्या ठिकाणी गेले होते.

हेही वाचा :

Corona Community Spread | भारतात बिकट स्थिती, कोरोनाचा समूह संसर्ग सुरु, IMA चा दावा

भाजपनं खोटेपणाचाही संस्थात्मक प्रचार केला, यामुळे देशाला मोठी किंमत मोजावी लागेल : राहुल गांधी

भारताकडून चीनला चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी, लडाख सीमेवर राफेल तैनात होणार

Flood Updates Heavy Rain in Asam Bihar Delhi

Non Stop LIVE Update
'आम्ही अपात्र होऊ अशी स्वप्ने बघणारे...' शिवसेना आमदाराने झापले
'आम्ही अपात्र होऊ अशी स्वप्ने बघणारे...' शिवसेना आमदाराने झापले
लोकसभेसाठी 'त्या' चार नावांची चर्चा, बावनकुळे म्हणतात...
लोकसभेसाठी 'त्या' चार नावांची चर्चा, बावनकुळे म्हणतात...
'महिला आरक्षण विधेयक म्हणजे पोस्ट डेटेड चेक', महिला खासदारांची टीका
'महिला आरक्षण विधेयक म्हणजे पोस्ट डेटेड चेक', महिला खासदारांची टीका
'खोटं बोलंण हे त्यांच्या पाचवीलाच पुजलं', खडसे यांना कुणी डिवचलं?
'खोटं बोलंण हे त्यांच्या पाचवीलाच पुजलं', खडसे यांना कुणी डिवचलं?
२०२३ ला कल्याण लोकसभेचा खासदार कोण होणार? भाजप नेत्याकडून नावच जाहीर
२०२३ ला कल्याण लोकसभेचा खासदार कोण होणार? भाजप नेत्याकडून नावच जाहीर
विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांना जीवाची पर्वा नाही ! कुठं आहे भीषण वास्तव?
विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांना जीवाची पर्वा नाही ! कुठं आहे भीषण वास्तव?
राज्यातील, दिल्लीतील सत्ता लवकरच जाणार? कुणाची भविष्यवाणी अन् इशाारा?
राज्यातील, दिल्लीतील सत्ता लवकरच जाणार? कुणाची भविष्यवाणी अन् इशाारा?
रोहित पवार अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष व्हावे, 'त्या' बॅनवरून कुणाचा टोला?
रोहित पवार अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष व्हावे, 'त्या' बॅनवरून कुणाचा टोला?
शरद पवार अन् प्रफुल्ल पटेल यांच्या 'त्या' भेटीवर अजितदादांच भाष्य
शरद पवार अन् प्रफुल्ल पटेल यांच्या 'त्या' भेटीवर अजितदादांच भाष्य
'पवारांवर पूर्ण विश्वास ठेवणारा माणूस महाराष्ट्रात नाही', कुणाचा टोला?
'पवारांवर पूर्ण विश्वास ठेवणारा माणूस महाराष्ट्रात नाही', कुणाचा टोला?