AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘देशी गायीच्या दुधात सोनं, परदेशी गाय माता नाही तर आंटी!’

परदेशी गायी आपल्या गोमाता नसतात, तर मावशा असतात, असं पश्चिम बंगालचे भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष म्हणाले.

'देशी गायीच्या दुधात सोनं, परदेशी गाय माता नाही तर आंटी!'
गाईला भाकरी देण्याचे जबरदस्त फायदे, पुण्यासह मिळतील ही सर्व सुखं
| Updated on: Nov 05, 2019 | 2:57 PM
Share

कोलकाता : देशी गायींच्या दुधात अस्सल सोनं असतं, परदेशी गायी मात्र गो’माता’ नसून आपल्या मावशा (आंटी) असतात, असा जावईशोध पश्चिम बंगालचे भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष (Foreign cow aunty) यांनी लावला आहे.

‘देशी गायींचं स्वतःचं असं वैशिष्ट्य असतं. त्यांच्या दुधात सोनं मिसळलेलं असतं. याच कारणामुळे त्यांचं दूध सोनेरी रंगाचं दिसतं. एक नाडी असते, जी सूर्यकिरणांच्या मदतीने सोनं तयार करण्यात मदत करते. म्हणून आपण देशी गायींचं जतन करायला पाहिजे. जर आपण देशी गायींचं दूध प्यायलं, तर आपण धष्टपुष्ट होऊ’ असं दिलीप घोष कोलकात्यात एका भाषणादरम्यान म्हणाले.

‘आपण ज्या परदेशी प्रजातींच्या गायी आणतो, त्या गायी नसतातच मुळी. त्या एक प्रकारचं जनावर असतात. परदेशी गायींचा आवाजही देशी गायींप्रमाणे नसतो. त्या आपल्या गोमाता नसतात, तर मावशा असतात. आपण या आंटींची पूजा केली, तर ते देशाच्या हिताचं नाही’ असंही घोष पुढे म्हणाले.

‘गाय आपली माऊली आहे. आपण गायीचं दूध पिऊन जिवंत राहतो. जर कोणी माझ्या आईसोबत गैरवर्तन केलं, तर मी तेच करणार जे योग्य आहे. भारतासारख्या पवित्र भूमीवर गायींची हत्या आणि गोमांस खाणं हा गुन्हाच आहे’ असंही दिलीप घोष म्हणतात.

चोरांनी लिपस्टिकने आरशावर लिहिलं ‘वहिनी खूप चांगली आहे’

‘काही बुद्धिजीवी लोक रस्त्यावर गोमांस खातात. त्यांनी कुत्र्याचं मांसही खावं, त्यांची प्रकृती ठणठणीत होईल’ असा सल्लाही दिलीप घोष यांनी दिला.

Foreign cow aunty

Follow Us
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू...
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू....
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल.
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान.
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;.
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा...
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा....
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला.
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका...
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका....
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?.
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं...
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं....
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर..
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर...