फॉरेस्ट ऑफीसरने शेअर केला सिंहाच्या दुर्मिळ पांढऱ्या छाव्याचा व्हीडिओ

या व्हीडीओत सिंहीण दिमाखाने जंगलात विहरत असून तिचे तीन छावे तिच्या मागे मागे चालत आहेत. त्यापैकी एक छावा दुर्मिळ पांढऱ्या रंगाचा असून तो आपल्या भावंडांसह आईच्या संरक्षणाखाली मस्त बागडत आणि हुंदडत आहे.

फॉरेस्ट ऑफीसरने शेअर केला सिंहाच्या दुर्मिळ पांढऱ्या छाव्याचा व्हीडिओ
whitecubs
Image Credit source: whitecubs
| Updated on: Dec 16, 2022 | 1:46 PM

मुंबई : सोशल मिडीयावर काही सरकारी अधिकारी अनोखे व्हीडीओ शेअर करीत असतात. त्यात अत्यंत महत्वाची माहीती त्यांनी शेअर केलेली असते. त्यातच इंडीयन फॉरेस्ट सर्व्हीस ऑफीसर सुसंता नंदा यांनी आपल्या ट्वीटर हॅण्डलवरून जंगलातील एक व्हीडीओ क्लीप गुरूवारी शेअर केली असून पर्यावरणप्रेमी तसेच वन्यप्रेमींचे लक्ष त्यांनी वेधले आहे….

या व्हीडिओमध्ये आपल्या आई बरोबर छावे आनंदाने उड्या मारताना आणि बागताना दिसत आहे. नंदा यांनी या क्लीपला कॅप्शन देताना म्हटले आहे की हा पाहा तुमच्यासाठी पांढरा छावा आणला आहे. तुम्हाला विश्वास वाटेल का जगात केवळ तीनच पांढरे सिंह मुक्तपणे जंगलात जगत आहेत.

या व्हीडीओत सिंहीण दिमाखाने जंगलात विहरत असून तिचे तीन छावे तिच्या मागे मागे चालत आहेत. त्यापैकी एक छावा दुर्मिळ पांढऱ्या रंगाचा असून तो आपल्या भावंडांसह आईच्या संरक्षणाखाली मस्त बागडत आणि हुंदडत आहे. सिंहीण मध्येच सावधपवित्रा घेत थांबून आपल्या छाव्यांकडे मान करीत त्यांची वाट पाहून मगच पुढे जात असल्याचा हा सुंदर व्हीडिओ सोशल मिडीयावर लाईक्स मिळवित आहे.

या व्हीडीओला 29 हजार 300 जणांनी पाहीला आहे.तर 1,712  जणांनी लाईक तर 220 जणांनी रिट्वीट केले आहे. या व्हीडीओत त्यांनी स्थळाचा उल्लेख केलेला नाही. पांढरे सिंह अत्यंत दुर्मिळ प्रजात असून जगात केवळ दक्षिण आफ्रीकेत ही जमात आढळते.