AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोईंची प्रकृती चिंताजनक, कोरोनामुक्त झाल्यानंतर पुन्हा रुग्णालयात दाखल

तरुण गोगोई यांची प्रकृती शनिवारी अचानक बिघडली. त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना GMCH रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गोगोई यांची प्रकृती सुधारण्यासाठी डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोईंची प्रकृती चिंताजनक, कोरोनामुक्त झाल्यानंतर पुन्हा रुग्णालयात दाखल
| Updated on: Nov 22, 2020 | 9:47 AM
Share

गुवाहाटी: आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. त्यानंतर गोगोई यांनी व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. गोगोई यांच्या शरिरातील अनेक अवयव काम करत नसल्यानं त्यांना श्वसनाला त्रास होत आहे. गोगोई सध्या बेशुद्धावस्थेत असल्याची माहिती आसामचे आरोग्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वीच तरुण गोगोई हे कोरोनामुक्त झाले होते. (Former Assam Chief Minister Tarun Gogoi is in critical condition, admitted in GMC hospital)

तरुण गोगोई यांची प्रकृती शनिवारी अचानक बिघडली. त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना GMCH रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गोगोई यांची प्रकृती सुधारण्यासाठी डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. पुढील 48 ते 72 तास गोगोई यांच्यासाठी अतिशय महत्वाचे असल्याची माहिती डॉक्टरांनी दिल्याचं हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं.

कोरोनावर मात केल्यानंतर पुन्हा प्रकृती बिघडली

86 वर्षांचे तरुण गोगोई हे काही दिवसांपूर्वीच कोरोनामुक्त झाले आहेत. 2 नोव्हेंबरला प्रकृती बिघडल्यानंतर गोगोई यांना गुवाहाटी मेडिकल कॉलेज आणि GMCH रुग्णालयात दाखल करण्यात आलं. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर गोगोई यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं.

डॉक्टरांकडून औषधोपचार आणि अन्य उपचारांद्वारे गोगोई यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांच्यावर डायलिसिसही केलं जाण्याची शक्यता हेमंत बिस्वा यांनी वर्तवली आहे. एम्सच्या डॉक्टर आणि GMCH ची टीम सातत्यानं आपल्या संपर्कात असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. तसंच गोगोई यांचा परिवारही संपर्कात आहे आणि त्यांच्या अनुमतीनेच सर्व उपचार सुरु असल्याचं हेमंत बिस्वा यांनी सांगितलं.

तरुण गोगोई हे 25 ऑक्टोबरला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. कोरोनावर मात केल्यानंतर 2 नोव्हेंबरला त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. तेव्हापासून गोगोई यांच्यावर GMCH रुग्णलयात उपचार सुरु आहेत. तरुण गोगोई हे 2001 ते 2016 पर्यंत सलग तीन वेळा आसामचे मुख्यमंत्री राहिले आहेत.

देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव

भारतात काल दिवसभरात 45 हजार 209 नवे कोरोनारुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 90 लाख 95 हजार 807 वर जाऊन पोहोचली आहे. देशात सध्या कोरोनाचे 4 लाख 40 हजार 962 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. काल दिवसभरात 501 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

संबंधित बातम्या:

दिल्लीत पुन्हा एकदा कोरोनाचा प्रकोप, सचखंड एक्सप्रेसच्या प्रवाशांची औरंगाबादेत कोरोना चाचणी!

राज्यातील भाजपच्या नेत्यांकडून कोरोनाचे राजकारण, मोदींचे स्वपक्षीयांना आवाहन गरजेचे, शिवसेनेचा घणाघात

Former Assam Chief Minister Tarun Gogoi is in critical condition, admitted in GMC hospital

कोंडेश्वर शिव मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा
कोंडेश्वर शिव मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा.
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरु! नेमकं काय घडलं?
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरु! नेमकं काय घडलं?.
अजित पवारांचा विलीनीकरणासाठी आग्रह होता - जयंत पाटील
अजित पवारांचा विलीनीकरणासाठी आग्रह होता - जयंत पाटील.
हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याने वाद; भाजप-काँग्रेसमध्ये जुंपली
हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याने वाद; भाजप-काँग्रेसमध्ये जुंपली.
राज्यभरात एटीएसची मोठी कारवाई; यवतमाळ आणि अहिल्यानगरमध्ये छापे
राज्यभरात एटीएसची मोठी कारवाई; यवतमाळ आणि अहिल्यानगरमध्ये छापे.
अजित पवारांच्या अपघाताप्रकरणी रोहित पवारांचं अमित शाहांना पत्र
अजित पवारांच्या अपघाताप्रकरणी रोहित पवारांचं अमित शाहांना पत्र.
महाराष्ट्र पालथा घातला असता तर...; राऊतांनी ठाकरे बंधूंचे कान टोचले
महाराष्ट्र पालथा घातला असता तर...; राऊतांनी ठाकरे बंधूंचे कान टोचले.
मी कान नाही टोचले, मी फक्त...; सामनातील अग्रलेखावर राऊतांचं उत्तर
मी कान नाही टोचले, मी फक्त...; सामनातील अग्रलेखावर राऊतांचं उत्तर.
मेट्रोच्या कामाच्या नावाखाली अख्खी मुंबई खोदून ठेवलीय; राऊतांची टीका
मेट्रोच्या कामाच्या नावाखाली अख्खी मुंबई खोदून ठेवलीय; राऊतांची टीका.
पैशाचा विषय येतो! भारत-पाक सामन्यावर संजय राऊतांचं मोठं विधान
पैशाचा विषय येतो! भारत-पाक सामन्यावर संजय राऊतांचं मोठं विधान.