दिल्लीत पुन्हा एकदा कोरोनाचा प्रकोप, सचखंड एक्सप्रेसच्या प्रवाशांची औरंगाबादेत कोरोना चाचणी!

राजधानी नवी दिल्लीत कोरोनाने थैमान घातलं आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत रोज चार ते पाच हजार कोरोना केसेस समोर येत आहेत.

दिल्लीत पुन्हा एकदा कोरोनाचा प्रकोप, सचखंड एक्सप्रेसच्या प्रवाशांची औरंगाबादेत कोरोना चाचणी!
मुंबईत कोरोना रुग्ण वाढण्याच्या संख्येत घट झाल्यानंतर आता या जीवघेण्या संसर्गाचा धोका आणखी कमी करण्यासाठी कडक पाऊलं उचलली जात आहे. मास्क न घालणाऱ्यांना आता अनोखी शिक्षा देण्यात येणार आहे.
Follow us
| Updated on: Nov 22, 2020 | 8:33 AM

नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्लीत कोरोनाने थैमान घातलं आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत रोज चार ते पाच हजार कोरोना केसेस समोर येत आहेत. गेल्या 24 तासांमध्ये 5 हजार 879 रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे तर 111 रुग्ण कोरोनाने मृत्यू पावले आहेत. दिल्लीतील हीच कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन सचखंड एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची औरंगाबादेत कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. (Saturday 22 Dec new Delhi Corona Bulletine)

दिल्लीत मोठ्या प्रमाणात कोरोनाचा कहर सुरु असल्याने महाराष्ट्राने सावध पावले टाकायला सुरुवात केली आहे. दिल्लीवरुन औरंगाबादेत येणाऱ्या सचखंड एक्सप्रेसच्या प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. सचखंड एक्सप्रेसने दिल्लीतील अनेक प्रवाशी औरंगाबादमध्ये येतात. दिल्लीमधून आलेल्या प्रवाश्यांमुळेऔरंगाबाद शहरात कोरोना वाढू शकतो, ही परिस्थिती लक्षात घेऊन रेल्वे स्टेशनवरच प्रवाश्यांच्या कोरोना चाचण्या होणार आहे. तसंच संशयित रुग्ण आढळल्यास त्याला तातडीने क्वारन्टाईन केलं जाणार आहे.

दिल्लीत बाधित होण्याचा दर 12.90 आहे. दिल्लीत आतापर्यंत 8 हजार 270 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी 45 हजार 662 कोरोना टेस्ट केल्या गेल्या होत्या. त्यातील 21 हजार 845 टेस्ट आरटीपीसीआर होत्या तर उरलेल्या अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या. दिल्लीत मृतांची संख्या देखील अचानक वाढू लागली आहे. पाठीमागच्या दहा दिवसांत चौथ्यांदा 100 हून अधिक नागरिकांना जीवाला मुकावे लागले आहे.

दिल्लीच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार दिल्लीतील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 5 लाख 23 हजार 117 एवढी झालेली आहे. त्यातील 4 लाख 75 हजार 103 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. दिल्लीत सध्या 4 हजार 633 कन्टेन्मेंट झोन आहेत.ही संख्या आता वाढण्याची शक्यता आहे.

दिल्लीतील नागरिकांचा निष्काळजीपणा आणि सरकारचा हलगर्जीपणा कोरोनाचा प्रादूर्भाव वाढण्यास कारणीभूत असल्याचं एका सर्व्हेतून आढळून आलं आहे. ‘इंडिया टुडे’ने मुंबई आणि दिल्लीच्या कोरोना परिस्थितीचा तुलनात्मक अभ्यास करून दिल्लीतील कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची पाच मुख्ये कारणे नमूद केली आहेत. तुलनेत मुंबईने कोरोनावर अत्यंत सुयोनियोजितपणे नियंत्रण आणल्याचंही नमूद केलं आहे.

सणांमध्ये वाढलेली नागरिकांची गर्दी, मेट्रो आणि बससेवा पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा घाईने घेतलेला निर्णय, लॉकडाऊनमध्ये दिलेली सवलत, कोविड सेंटरची कमतरता आणि मोहिमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आलेलं अपयश या पाच कारणांमुळे दिल्लीतील कोरोना नियंत्रणाचा कार्यक्रम फसल्याचं या अहवालातून पुढे आलं आहे.

(Saturday 22 Dec new Delhi Corona Bulletine)

संबंधित बातम्या

दिल्ली-मुंबई रेल्वे सेवा थांबवल्याच्या बातम्या निराधार, रेल्वेचं स्पष्टीकरण

दिल्लीची हवा बिघडली; सोनिया आणि राहुल गांधींचा मुक्काम आता गोव्यात

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.