AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rule Change : घरगुती गॅस सिलेंडरपासून पेन्शनपर्यंत, 1 जानेवारीपासून हे 5 बदल होणार

साल २०२४ लवकरच संपणार आहे. नव्या वर्षांच्या स्वागताची तयारी देशभरात सुरु आहे.नव्या वर्षाबरोबर १ जानेवारी २०२५ पासून देशात अनेक बदल होणार आहेत. त्याचा परिणाम प्रत्येक घरावर आणि खिशावर होणार आहेत. या बदलात स्वयंपाकघरात वापरला जाणारा एलपीजी सिलेंडरच्या किंमतीपासून युपीआय पेमेंटपर्यंतच्या नियमांचा समावेश आहे.

Rule Change : घरगुती गॅस सिलेंडरपासून पेन्शनपर्यंत, 1 जानेवारीपासून हे 5 बदल होणार
Rule Change From 1st January
Follow us
| Updated on: Dec 25, 2024 | 10:47 PM

देशात दर महिन्याला अनेक आर्थिक बदल होत असतात. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच हे बदल होणार आहेत. 1 जानेवारीपासून देशात पाच मोठे बदल होणार आहे. पहिल्या बदलात एलपीजी सिलेंडरच्या किंमतीपासून ते हवाई इंधनाच्या किंमतीपर्यंत बदल होणार आहेत. महिन्याच्या एक तारखेनंतर तेल कंपन्या दर बदल करतात. 1 जानेवारीपासून UPI 123Pay पेमेंटचे नियम बदलणार आहेत. EPFO चा पेंशनर्सचा नवा नियम या दिवसापासून लागू होत आहे. शेतकऱ्यांना गॅरंटीशिवायचे कर्ज देखील यात समावेश आहेत.

पहिला बदल – LPG चे दर

दर महिन्याच्या एक तारखेला 1 जानेवरी 2025 पासून तेल कंपन्या घरगुती गॅस आणि व्यावसायिक एलपीजी गॅसचे दरात बदल होणार आहेत. गेल्या काही दिवसात कंपन्यांनी 19 किलोग्रॅमच्या कमर्शियल LPG Cylinder च्या किंमतीत बदल केले आहेत. अनेक काळापासून 14 किलोच्या स्वयंपाकाच्या गॅसचे दर स्थिर आहेत. त्यामुळे या घरगुती गॅसचे दर वाढण्याची शक्यता आहे.

दुसरा बदल – EPFO चा नवा नियम

नवीन वर्षात कर्मचारी भविष्य निधी संघटन म्हणजे EPFO द्वारे पेंशनर्ससाठी नवा नियम लागू होणार आहे. त्यांच्यासाठी ही मोठी भेट आहे.ईपीएफओ पेंशनर्ससाठी नवीन वर्षात बदल होत आहे. आता पेंशनर्सना आपल्या पेन्शनची (Pension) रक्कम देशातील कोणत्याही बँक खात्यातून काढू शकता.यासाठी त्यांना अतिरिक्त व्हेरिफिकेशनची गरज नाही.

हे सुद्धा वाचा

तिसरा बदल – UPI 123Pay चे नियम

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बेसिक फोनद्वारे ऑनलाइन पेमेंटची सुविधा देण्यासाठी युपीआय 123पे ची सुरुवात केली होती. याची ट्रांझक्शनची लिमिट वाढविण्याचा निर्णय घेतलेला आहे. 1 जानेवारीपासून हा निर्णय लागू केला आहे. यानंतर युजर्स 10,000 रुपयांपर्यंतची रक्कम ऑनलाइन पेमेंट करु शकणार आहेत. याआधी ही रक्कम 5,000 रुपयांपर्यंत मर्यादित होती.

चौथा बदल – शेअर मार्केट संबंधीचा नियम

सेन्सेक्स, सेन्सेक्स-50 आणि बँकेक्सच्या मासिक एक्स्पायरीमध्ये बदल करण्यात आले आहेत. आता दर आठवड्याला शुक्रवारी नव्हे तर मंगळवारी होणार आहे. तर NSE इंडेक्सने Nifty 50 मंथली कॉन्ट्रॅक्ट्ससाठी गुरुवारचा दिवस निश्चित केला आहे.

पाचवा बदल – शेतकऱ्यांचे कर्ज

1 जानेवरी 2025 पासून भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे शेतकऱ्यांना विना गॅरंटी दोन लाखापर्यंतचे लोन मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांना विना गॅरंटी लोनची मर्यादा वाढविण्याची घोषणा झाली होती. त्यामुळे त्यांना आता 1.6 लाख रुपये नव्हे तर दोन लाखापर्यंतचे लोन मिळणे शक्य होणार आहे.

532 भारतीय नागरिक मायदेशी परतले
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले.
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू.
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर...
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर....
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर.
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?.
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं.
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी.
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी.
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते....
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते.....