AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील घुसखोरांची यादी द्या, आम्ही परत घेतो, बांगलादेशचा पावित्रा

अवैधरित्या भारतात घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांची यादी भारताने बांगलादेशला द्यावी. त्या सर्वांना आम्ही पुन्हा स्वदेशी परततण्याची मंजूरी देऊ," असे वक्तव्य बांगलादेशचे पराराष्ट्र मंत्री ए.के. अब्दुल मोमेन यांनी केले (Bangladeshi living in India illegally) आहे.

भारतातील घुसखोरांची यादी द्या, आम्ही परत घेतो, बांगलादेशचा पावित्रा
| Updated on: Dec 16, 2019 | 9:43 AM
Share

नवी दिल्ली : भारतात दरवर्षी हजारोंच्या संख्येने बांगलादेशी नागरिक बेकायदेशीररित्या वास्तव्यास (Bangladeshi living in India illegally) येतात. या पार्श्वभूमीवर “अवैधरित्या भारतात घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांची यादी भारताने बांगलादेशला द्यावी. त्या सर्वांना आम्ही पुन्हा स्वदेशी परततण्याची मंजूरी देऊ,” असे वक्तव्य बांगलादेशचे पराराष्ट्र मंत्री ए.के. अब्दुल मोमेन यांनी केले (Bangladeshi living in India illegally) आहे. रविवारी (15 डिसेंबरला) राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीबाबत (एनआरसी) मोमेन यांना विचारले असता त्यांनी हे वक्तव्य केले.

काही दिवसांपूर्वी मोमेन यांनी कामात व्यस्त असल्याचे कारण भारत दौरा रद्द केला होता. बांगलादेश आणि भारताचे संबंध सामान्य आणि फार चांगले आहेत. त्यामुळे त्या संबंधावर कोणताही फरक पडणार नाही. असेही मोमेन यांनी स्पष्ट केले आहे. “भारताची राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी हा त्यांचा अंतर्गत मुद्दा आहे आणि याचा बांगलादेशला काहीही फरक पडत नाही,” असे आश्वासनही ढाकाला दिले होते.

यानंतर राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीबाबत मोमेन यांना विचारले असता ते म्हणाले, “जर बांगलादेशी नागरिकांव्यतिरिक्त इतर कोणीही आमच्या राज्यात घुसण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही त्यांना परत पाठवतो. पण बांगलादेशचे काही नागरिक भारत-बांगलादेश सीमेवरुन अवैधरित्या भारतात प्रवेश करतात. याबाबतच्या अनेक घटना प्रसारमाध्यमांकडून उघड झाल्या आहेत. या माहितीचा आधारे जर कोणताही बांगलादेशी नागरिक भारतात अवैध रुपात राहत असेल. तर त्याची यादी केंद्र सरकारने आम्हाला द्यावी. आम्ही त्या सर्व नागरिकांना बांगलादेशात परतण्याचे आवाहन करु. तसेच देशात पुन:प्रवेश करण्याचेही अधिकार देऊ,” असे वक्तव्य बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्र्यांनी (Bangladeshi living in India illegally) केले.

राज्याचे परराष्ट्र मंत्री शहरयार आलम आणि मंत्रालयाचे सचिव हे दोघेही मधील काळात अनुपस्थितीत होते. तसेच इतरही काही कार्यक्रमात व्यस्त असल्याने भारत दौरा अचानक रद्द करावा लागला असेही मोमेन यांनी स्पष्ट केले.

दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभेत नागरिकत्व कायद्यातील नवीन सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर झाल्याने मोमेन आणि बांगलादेश गृहमंत्री असमद्दुजमान खान यांनी भारत दौरा रद्द केला होता. भारताचे गृहमंत्री अमित शाह यांच्या लोकसभेतील भाषणानंतर हा दौरा रद्द करण्यात आला (Bangladeshi living in India illegally) होता.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.