गेल्या 9 वर्षांपासून पावसाचं प्रमाण घटलं, तापमान वाढलं, भविष्यात मोठा धोका

या संकटाची चाहूल पाच दशकांपूर्वीच जगाला लागली होती, त्यामुळे 5 जून 1972 पासून जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातोय. आज आपल्यासमोर कमी झालेल्या पावसाचं प्रमाण सर्वात मोठं संकट आहे.

गेल्या 9 वर्षांपासून पावसाचं प्रमाण घटलं, तापमान वाढलं, भविष्यात मोठा धोका
Follow us
| Updated on: Jun 26, 2019 | 8:45 PM

नागपूर : जगभरात पर्यावरण संवर्धनासाठी अनेक प्रयत्न केले जातात, पण भारताच्या बाबतीत विचार केला तर वैयक्तिक पातळीवर त्याबाबत फार जागरुकता दिसून येत नाही. याचाच परिणाम म्हणून गेल्या काही वर्षात उष्णता प्रचंड वाढली आहे आणि पावसाचं प्रमाण कमी झालंय. यावर्षी चंद्रपुरात सर्वात विक्रमी तापमान नोंदवण्यात आलंय. त्यामुळे तापमान वाढ, बदलतं हवामान आणि सर्वात चिंताजनक म्हणजे कमी झालेलं पावसाचं प्रमाण. या संकटाची चाहूल पाच दशकांपूर्वीच जगाला लागली होती, त्यामुळे 5 जून 1972 पासून जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातोय. आज आपल्यासमोर कमी झालेल्या पावसाचं प्रमाण सर्वात मोठं संकट आहे.

जून महिना संपत आलाय, पण पावसाचं प्रमाण अत्यंत कमी आहे. काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आहे. पर्यावरणाचा ऱ्हास हा मानवी अस्तित्त्वासाठी सर्वात मोठा धोका बनलाय. याचे चटकेही बसायला लागले आहेत. वाढलेल्या तापमानामुळे एकट्या विदर्भात यंदाच्या उन्हाळ्यात 50 पेक्षा जास्त लोकांचा उष्माघाताने मृत्यू झालाय, तर सततच्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचं जगणंच हिरावून घेतलं जातंय. बदलत्या हवामानामुळे देशात आणि जगातही पावसाने आपला मूड बदललाय. गेल्या काही वर्षांत पाऊस उशिराने येतो आणि लवकर निघून जातोय. पावसाचे एकूण दिवस कमी झालेत. शेतीवर अवलंबून असलेल्या देशातील 57 टक्के जनतेला हा सर्वात मोठा धोका आहे.

हवामान बदलामुळे देशात दुष्काळ पाचवीला पुजलेला आहे. कधी गारपीट, कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ. हे बदलतं ऋतूचक्र माणसांपुढे सर्वात मोठं आव्हान आहे.

पावसाचे आकडे, भीषण संकटाची चाहूल

वर्ष – 2012

मराठवाडा- 33 टक्के कमी पाऊस

मध्य महाराष्ट्र – 25 टक्के कमी पाऊस

देशात – 07 टक्के कमी पाऊस

वर्ष – 2014

मराठवाडा – 42 टक्के कमी पाऊस

मध्य महाराष्ट्र –  06 टक्के कमी पाऊस

विदर्भ – 14 टक्के कमी पाऊस

देशात- 12 टक्के कमी पाऊस

वर्ष – 2015

मराठवाडा – 40 टक्के कमी पाऊस

मध्य महाराष्ट्र – 33 टक्के कमी पाऊस

विदर्भ – 11 टक्के कमी पाऊस

देशात – 14 टक्के कमी पाऊस

वर्ष – 2017

मराठवाडा- 06 टक्के कमी पाऊस

विदर्भ – 23 टक्के कमी पाऊस

देशात – 05 टक्के कमी पाऊस

वर्ष – 2018

मराठवाडा – सरासरीच्या 22 टक्के कमी पाऊस

पाच वर्षातील पावसाचे हे आकडे धोक्याची घंटा आहेत. कारण पाचही वर्षे मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि देशातही सरासरीच्या कमी पाऊस पडला. जगाला ग्लोबल वॉर्मिगचा मोठा धोका आहे, याचे चटके आता सोसावे लागत आहेत. गेल्या काही वर्षांत तापमानात मोठी वाढ झाली आहे आणि पावसाचं प्रमाण कमी झालंय.

पावसाचे एकूण दिवसही कमी झाले आहेत. त्याचा मोठा फटका मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यातल्या शेतकऱ्यांना बसतोय. देशात पावसाचं प्रमाण कमी झाल्याची बाब हवामान विभागही मान्य करतो. सततचा दुष्काळ, भूगर्भातील घटलेली पाणीपातळी आणि वाढलेलं तापमान… पर्यावरण बदलाचे हे परिणाम आहेत. त्यामुळे धोका वेळीच लक्षात घेऊन पर्यावरणाच्या रक्षणासाठी ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे आणि पावसाच्या पाण्याचा काटेकोर वापरही तेवढाच गरजेचा आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.