पणजी : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कायम असताना गोवा सरकारने राज्यात प्रवेश करु इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी नियमावली बदलली आहे. गोव्यात प्रवेश करण्यापूर्वी ‘कोरोना’ चाचणी बंधनकारक नसेल. ज्यांना कोरोना चाचणी करायची नाही, त्यांना 14 दिवस होम क्वारंटाईन राहण्याचा पर्याय गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिला आहे. (New SOP for Goa Says COVID Test Not mandatory)
ज्यांना गोव्यात प्रवेश करण्यापूर्वी कोरोना चाचणी करायची असेल, त्यांनी अहवाल येईपर्यंत 14 दिवस सशुल्क संस्थात्मक क्वारंटाईन सेंटरमध्ये राहावे. मात्र चाचणी करायची नसल्यास 14 दिवस होम क्वारंटाईन राहण्याचा पर्याय असेल. त्यांच्या हातावर शिक्का मारण्यात येईल आणि स्थानिक प्रशासन देखरेख करेल. दहा जून म्हणजेच उद्यापासून नवीन स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (एसओपी) लागू होईल.
प्रमोद सावंत यांच्या बैठकांचा सिलसिला सोमवारी दिवसभर चालला. “गोव्यात प्रवेश करणाऱ्या नागरिकांच्या वाढत्या संख्येमुळे सर्व जणांची चाचणी करणे कठीण होत आहे. त्यामुळे चाचण्यांचे अहवाल साचले (बॅकलॉग) आहेत” असं सावंत यांनी बैठकीनंतर सांगितलं.
हेही वाचा : कोव्हिड योद्धे CISF जवानांनी घरं रिकामी करा, खारघरच्या सोसायटीचा फतवा
“जवळपास 2500 चाचण्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. आम्ही दररोज दीड ते दोन हजार चाचण्या घेत आहोत. जे यापुढेही सुरु राहतील, परंतु आम्हाला आगमनासाठी कार्यप्रणाली बदलली पाहिजे” असे सावंत म्हणाले. प्रत्येकाची थर्मल स्क्रीनिंग करण्यात येईल, लक्षणे आढळली, तर मात्र कोविड चाचणी अनिवार्य असेल.
वास्कोमधील हॉटस्पॉट मंगोर हिलबद्दल बोलताना सावंत म्हणाले की, गोव्यातील 300 पेक्षा अधिक कोरोनाग्रस्त रुग्णांपैकी 25 वगळता सर्व या (मंगोर हिल) भागातील आहेत. मात्र केवळ 19 रुग्णांनाच उपचारांची आवश्यकता आहे. उर्वरित लक्षणविरहित आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
In its new #SOP for people visiting #Goa, testing for #Covid19 will no longer be mandatory. However, all passengers will now have to pass thermal scanners & only those who are red-flagged during the screening will be tested, the state’s Port Minister Michael Lobo said. pic.twitter.com/xt6ZfA2Po1
— IANS Tweets (@ians_india) June 8, 2020
(New SOP for Goa Says COVID Test Not mandatory)