Google वर भिकारी टाईप केल्यावर पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा फोटो, सोशल मीडियावर ट्रोलिंग

| Updated on: Aug 18, 2019 | 3:15 PM

जर तुम्ही गुगल सर्च इंजिनवर भिकारी सर्च केले, तर त्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचा फोटो दिसेल. गुगल इमेजमध्ये दिसत असलेल्या या फोटोमध्ये इमरान खान हातात वाडगं घेऊन बसलेले दिसत आहेत.

Google वर भिकारी टाईप केल्यावर पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा फोटो, सोशल मीडियावर ट्रोलिंग
Follow us on

मुंबई : जर तुम्ही गुगल सर्च इंजिनवर भिकारी सर्च केले, तर त्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचा फोटो दिसेल. गुगल इमेजमध्ये दिसत असलेल्या या फोटोमध्ये इमरान खान हातात वाडगं घेऊन बसलेले दिसत आहेत. हा एडिट केलेला फोटो सध्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाकिस्तान सध्या आर्थिक संकटात सापडलेला आहे. यामधून बाहेर येण्यासाठी पंतप्रधान इमरान खान अनेक देशांकडून कर्ज घेण्यासाठी दौरे करत आहेत. याच पार्श्वभूमीवर हा फोटो एडिट करण्यात आला आहे.

सोशल मीडियावर फोटो व्हायरल

सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाल्यामुळे लोक पाकिस्तान आणि इमरान खान यांची थट्टा करत आहेत. फेसबुक, ट्विटरसह सर्व सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल होत आहे. गुगलवर भिकारी सर्च केले तरी इमरान खान यांचे फोटो दिसत आहेत.

गुगलवर भिकारी सर्च केल्यावर इमरान खान याचा फोटो का दिसतो?

दरम्यान, गुगल सर्च इंजिन अशा प्रकारे तयार करण्यात आलं आहे की, जेव्हा कोणता एक शब्द अनेकदा टाईप करुन शोधला जातो. तेव्हा सर्च इंजिन त्या की वर्डचा समावेश लोकप्रिय श्रेणीमध्ये करतो. गुगलच्या सर्चमध्ये इडियट टाईप केल्यावर सर्वात वरती डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो येतो. कारण अनेकदा डोनाल्ड ट्रम्प यांना इडियट म्हणून सर्च केलं आहे.