दिवाळीच्या आनंदात किमान एका गरीब-उपेक्षिताला सामावून घ्या, राज्यपालांकडून जनतेला ‘हॅप्पी दीपावली’

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील जनतेला दीपावली सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

दिवाळीच्या आनंदात किमान एका गरीब-उपेक्षिताला सामावून घ्या, राज्यपालांकडून जनतेला 'हॅप्पी दीपावली'
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
Follow us
| Updated on: Nov 13, 2020 | 11:29 AM

मुंबई :  महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील जनतेला दीपावली सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सणाचा आनंद घेताना कोरोना नियमांचं उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्या, असं राज्यपालांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलंय. (Governor Bhagatsinh Koshyari Wish for diwali To people Of Maharashtra)

“दिवाळीच्या आनंदात किमान एका गरीब-उपेक्षिताला सामावून घ्या, असा अनमोल संदेश देताना कोरोनाचे गंभीर आव्हान अद्याप पूर्णपणे संपलेले नाही. त्यामुळे यावर्षी दिवाळी सुरक्षित, पर्यावरणयुक्त व प्रदुषणमुक्त वातावरणात साजरी करावी”, असं राज्यपालांनी म्हटलंय.

“दीपावलीच्या मंगल पर्वावर सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. कोरोनाचे गंभीर आव्हान अद्याप पूर्णपणे संपलेले नाही. त्यामुळे यावर्षी दिवाळी सुरक्षित, पर्यावरणयुक्त व प्रदुषणमुक्त वातावरणात साजरी करावी. दिवाळीच्या आनंदात किमान एका गरीब व उपेक्षित व्यक्तीला सामावून घेतल्यास ही दिवाळी खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक होईल”, असं ते म्हणाले. यंदाचा प्रकाशोत्सव सर्वांच्या जीवनात सुख, समाधान व समृद्धी घेऊन येवो, अशी प्रार्थनाही राज्यपालांनी केली आहे.

दिवाळी सणाचा जरूर आनंद घ्या पण आरोग्याच्या जबाबदारीचे भान ठेवा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

‘कोरोनाला सणवार -दिवाळी कळत नाही. लस जेव्हा येईल आणि आपल्यापर्यंत पोहचेल तोपर्यंत स्वत:ला सुरक्षित ठेवणे आणि घरातले-बाहेरचे यांनाही संसर्ग होऊ न देणे हे आपले प्राधान्य असले पाहिजे. गेल्या सात आठ महिन्यात आपण सर्व धर्मियांचे सण, उत्सव अतिशय सावधपणे आणि नियमांचे पालन करून साजरे केले आहेत. आपण जो संयम पाळला आहे त्याचाच परिणाम म्हणून आपण या महामारीला इतक्या महिन्यानंतरही रोखून धरण्यात यशस्वी झालो आहे हे विसरू नका. सणाचा जरूर आनंद घ्या पण आरोग्याच्या जबाबदारीचे भान ठेवा असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

दिवाळीत कोरोना नियमांचं काटेकोर पालन करा- उपमुख्यमंत्री अजित पवार

“यंदाची दिवाळी सर्वांनी कोरोनाप्रतिबंधक नियमांचं काटेकोर पालन (Corona Guidelines) करुन साजरी करुया, आसपासच्या गरीब, दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांना मदत करुन त्यांनाही दिवाळी आनंदात सहभागी करुन घेण्याची परंपरा यावर्षीही कायम राखूया”, असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

संबंधित बातम्या

दिवाळीत कोरोना नियमांचं काटेकोर पालन करा, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं नागरिकांना आवाहन

शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊ नये म्हणून आंदोलन करणार : रवी राणा

PHOTO | दिवाळीवर कोरोनाचं सावट, तरीही बाजारात नव्या ‘फटाका चॉकलेट’ची चलती

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.