पनवेल उपजिल्हा रूग्णालयात व्हेंटिलेटर वाढवण्याचे पालकमंत्री आदिती तटकरेंचे निर्देश

कोविड रूग्णांना दिवसेंदिवस ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेडची भासणारी कमतरता दूर करण्यासाठी पनवेल उपजिल्हा रूग्णालयात आणखी दहा व्हेंटिलेटर वाढविण्याचे निर्देश पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहेत (Aaditi Tatkare on Ventilator Panvel).

पनवेल उपजिल्हा रूग्णालयात व्हेंटिलेटर वाढवण्याचे पालकमंत्री आदिती तटकरेंचे निर्देश
Follow us
| Updated on: Sep 15, 2020 | 11:24 PM

पनवेल : कोविड रूग्णांना दिवसेंदिवस ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेडची भासणारी कमतरता दूर करण्यासाठी पनवेल उपजिल्हा रूग्णालयात आणखी दहा व्हेंटिलेटर वाढविण्याचे निर्देश पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहेत (Aaditi Tatkare on Ventilator Panvel). तसेच खासगी रुग्णालयांना लागणारा ऑक्सिजन पुरवठा देण्यासोबत आणखी काही रुग्णालयांनाही कोविड रूग्णालयाचा दर्जा देण्याचे निर्देश आदिती तटकरे यांनी दिले (Aaditi Tatkare on Ventilator Panvel).

पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी दिलेल्या निवेदनानुसार पालकमंत्री आदिती तटकरे यांनी संबंधितांची ऑनलाईन बैठक आयोजित करण्याचे जिल्हा प्रशासनाला आदेश दिले होते. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले आहेत. यावेळी या ऑनलाईन बैठकीस जिल्हाधिकारी निधी चौधरी, पनवेल महापालिका आयुक्त सुधाकरराव देशमुख सहभागी झाले होते.

पीएम केअर फंडातून आलेल्या वीस व्हेंटिलेटरपैकी दहा व्हेंटिलेटर डी. वाय. पाटील रूग्णालयास देण्यात आले आहेत. उर्वरित 10 व्हेंटिलेटर उपजिल्हा रूग्णालयात कार्यान्वित करण्यात यावेत, अशी कांतीलाल कडू यांची मागणी होती. त्या अनुषंगाने आदिती तटकरे यांनी हे व्हेंटिलेटर उपजिल्हा रूग्णालयात कार्यान्वित करण्यात यावेत, त्यासाठी लागणारा आवश्यक निधी तात्काळ देण्यात येईल, असे सांगितले.

खासगी डॉक्टर पुरेसे वेतन देऊन किंवा जाहिराती देऊनही प्रतिसाद देत नसल्याची खंत महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी व्यक्त केली. डॉक्टर उपलब्ध होत नसल्याने अतिदक्षता विभाग चालविणे दिवसेंदिवस अवघड होत असल्याबाबतची वस्तुस्थिती त्यांनी तटकरे यांच्याकडे मांडली. शिवाय खासगी डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस बजावली म्हणून स्वास्थ हॉस्पिटलने महापालिके विरुध्द न्यायालयात दावा दाखल केला असून या रुग्णालयाने महापालिकेकडे दरमहा 5 कोटी रूपये नुकसान भरपाई मागितली असल्याची माहिती त्यांनी यावेळी आदिती तटकरे यांना दिली.

कोणत्याही परिस्थितीत पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आणखी दहा व्हेंटिलेटर वाढवून घ्यायचे आहेत. त्याशिवाय भविष्यातील परिस्थितीचा विचार करुन करोनाचा मुकाबला करताना आणखी काही खासगी रुग्णालयांशी संपर्क साधून अथवा त्यांचे प्रस्ताव आल्यास तातडीने त्यांना कोविड रूग्णांसाठी परवानगी देण्यात यावी, असे आदेश तटकरे यांनी आयुक्त देशमुख यांना दिले. त्याशिवाय दोन दिवसात बैठक बोलावून यावर मार्ग काढण्याचेही सूचित केले आहे.

अतिदक्षता विभागामध्ये काम करण्यासाठी खासगी डॉक्टरांना शासनाच्या नियमानुसार वेतन दिले जाते. त्यामुळे शासन नियमांच्या पलिकडे जाऊन त्या डॉक्टरांना जास्त वेतन देणे शक्य नसल्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले. याबाबत आदिती तटकरे यांनी शहरांच्या दृष्टीने विचार करता अलिबाग किंवा पनवेल अशी तुलना करणे उचित ठरणार नाही, असे सांगून पनवेलच्या शेजारी नवी मुंबई, मुंबई आणि ठाणे अशी मोठी शहरे असल्याने पनवेलच्या डॉक्टरांचीही अधिक वेतनाची अपेक्षा असू शकते, असे मत व्यक्त केले.

संबंधित बातम्या :

वादळग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळवून देईन, रायगडच्या पाहणी दौऱ्यात आदिती तटकरेंची हमी

रायगडला चक्रीवादळाचा मोठा फटका, विशेष पॅकेजची पालकमंत्री आदिती तटकरेंची मागणी

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.