Happy Birthday Gulzar | शब्दाचे जादूगार गुलजार यांची दहा अविस्मरणीय गाणी

Happy Birthday Gulzar ज्येष्ठ गीतकार गुलजार यांच्या 86 व्या वाढदिवसानिमित्त गुलजार यांच्या सांगीतिक कारकीर्दीचा आढावा. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

Happy Birthday Gulzar | शब्दाचे जादूगार गुलजार यांची दहा अविस्मरणीय गाणी
Follow us
| Updated on: Aug 18, 2020 | 10:46 AM

मुंबई : गुलजार म्हणजे साहित्य विश्वाला पडलेलं एक सुरेख स्वप्न… गुलजार (Gulzar) म्हणजे शब्दांचे जादूगार… शब्दांशी खेळणाऱ्या या अवलियाबद्दल लिहिताना शब्दच तोकडे पडतात. अशा या गुलजार साहेबांचा आज 86 वा वाढदिवस. त्यानिमित्ताने गुलजार यांच्या शब्दांपलिकडच्या प्रवासाचा घेतलेला आढावा.

गुलजार यांचा जन्म 18 ऑगस्ट 1934 रोजी सध्या पाकिस्तानात असलेल्या झेलम जिल्ह्यात झाला. त्यांचं मूळ नाव संपूर्णसिंग कालरा. फाळणीनंतर कालरा कुटुंब भारतात स्थायिक झालं.

संपूर्णसिंगचे गुलजार कसे झाले?

सुरुवातीला मुंबईतील गॅरेजमध्ये संपूर्णसिंग यांनी छोटी-मोठी कामं केली, मात्र त्यांच्यातील लेखक स्वस्थ बसू देईना. रवींद्रनाथ टागोरांच्या लेखनाने गोडी लावली होतीच. वडिलांचा विरोध पत्करुन ‘गुलजार दिनवी’ या टोपणनावाने संपूर्ण यांनी लेखन सुरु केलं. हळूहळू संपूर्णची जिंदगी ‘गुलजार’ झाली.

शैलेंद्र आणि बिमल रॉय यांनी गुलजार यांना चित्रपटांकडे वळण्यास उद्युक्त केलं. बिमल रॉय यांनी 1963 मध्ये ‘बंदिनी’ चित्रपटातून गुलजार यांना संधी दिली. एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं ‘मोरा गोरा अंग लैले…’ हे गुलजार यांनी लिहिलेलं पहिलं चित्रपट गीत. बिमल रॉय आणि हृषिकेश मुखर्जींसारख्या दिग्दर्शकांमुळे गुलजार यांची कारकीर्द बहरली. त्यानंतर पंचमदा (आरडी), सलील चौधरी यांच्यापासून विशाल भारद्वाज, ए आर रहमान यांच्यापर्यंत अनेक संगीतकारांसोबत गुलजार यांची नाळ जुळली.

गुलजार यांच्या लेखणीतून उतरलेलं ‘मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है’ सारखं काव्य काळजाला हात घालतं, तर माचिस चित्रपटातलं ‘पानी पानी रे’ किंवा नुकतंच ‘राझी’मधलं ‘मुडके ना देखो दिलबरो’ ऐकताना डोळ्यात टचकन् पाणी येतं.

एकीकडे हृदय पिळवटून टाकणारी गाणी लिहिणारे गुलजार आजच्या काळाशी सुसंगत गाणीही ज्या वकुबाने लिहितात, ते पाहून रसिक मंत्रमुग्ध होतो.

बिडी जलैले पण याच लेखणीची कमाल

‘आँखे भी कमाल करती है, पर्सनल से सवाल करती है’ ही ‘कजरा रे…’ मधली ओळ असो, वा ‘ओमकारा’मधलं ‘बिडी जलायले’ आजच्या पिढीला कनेक्ट करणारे शब्द ही गुलजारसाहेबांची ताकद. जंगल जंगल बात चली है पासून ‘मोटू पतलू’ या कार्टूनचं थीम साँगही गुलजार यांनी लिहिलेलं.

फक्त गीत-कविताच नाही, तर पटकथा लेखन आणि दिग्दर्शन यावरही गुलजार यांची हुकूमत. इंदिरा गांधी यांच्या आयुष्यावर आधारित ‘आंधी’ चित्रपटाचं दिग्दर्शन गुलजार यांचं.

आंतरराष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरलं

गुलजार यांना 2004 मध्ये ‘पद्मभूषण’ने सन्मानित करण्यात आलं आहे. याशिवाय साहित्य अकादमी, दादासाहेब फाळके पुरस्काराचेही ते मानकरी ठरले आहेत. ‘फिल्मफेअर’च्या 21 बाहुल्या ठेवायला तर जागा अपुरी पडत असेल. पाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारासोबत त्यांनी एक ऑस्कर आणि एक ग्रॅमी पुरस्कारही पटकावला आहे.

अभिनेत्री राखी या त्यांच्या अर्धांगिनी, तर लेक मेघना गुलजार यांनीही चित्रपट दिग्दर्शनात यश मिळवलं आहे. गुलजार यांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्त टॉप 10 गाण्यांची झलक

1. मेरा कुछ सामान|आशा भोसले| आरडी बर्मन | इजाजत (1987)

2. तुझसे नाराज नहीं| अनुप घोषाल | आरडी बर्मन | मासूम (1983)

3. दिल ढूंढता है फिर वही फुरसत के रात दिन | भूपिंदर सिंह | मौसम (1975)

4. तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं | लता मंगेशकर-किशोर कुमार | आरडी बर्मन | आंधी (1975)

5. वोह शाम कुछ अजीब थी | किशोर कुमार | हेमंत कुमार | खामोशी (1969)

6. आप की आँखों में कुछ महके हुए से | लता मंगेशकर-किशोर कुमार | आरडी बर्मन | घर (1978)

7. एक अकेला इस शहर में | भूपिंदर सिंह | जयदेव | घरोंदा (1977)

8. धागे तोड लाऊ… बोल ना हलके हलके | राहत फतेह अली खान-महालक्ष्मी अय्यर| शंकर-एहसान-लॉय | झूम बराबर झूम (2007)

9. नमक | रेखा भारद्वाज | विशाल भारद्वाज | ओमकारा (2006)

10. दिलबरो | हर्षदीप कौर-विभा सराफ-शंकर महादेवन| शंकर-एहसान लॉय | राझी (2018)

Non Stop LIVE Update
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.