Cashew Nuts | कॅल्शियमयुक्त ‘काजू’चे सेवन आरोग्यासाठी फायदेकारक, पाहा ‘5’ महत्त्वाचे फायदे

सुक्यामेव्यातील महत्त्वाचा घटक ‘काजू’ जगभरात विविध प्रकारे वापरला जातो.

Cashew Nuts | कॅल्शियमयुक्त ‘काजू’चे सेवन आरोग्यासाठी फायदेकारक, पाहा ‘5’ महत्त्वाचे फायदे

मुंबई : ड्रायफ्रुट्स अर्थात सुकामेवा आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. त्यातही असे काही ड्रायफ्रुट्स आहेत, जे आपण अगदी रोजच्या पदार्थांमध्येदेखील वापरतो. मग ते मिठाई असो किंवा इतर स्वादिष्ट पदार्थ! सुक्यामेव्याबद्दल बोलले जात असताना, काजूला विसरून कसे बरे चालेल? सुक्यामेव्यातील महत्त्वाचा घटक ‘काजू’ जगभरात विविध प्रकारे वापरला जातो. अनेक गोड पदार्थांत चवीसाठी आणि सजावटीसाठी काजूचा वापर होतो.  भारतात मसालेदार पदार्थांची चव वाढविण्यासाठी देखील काजू वापरले जातात. काजूचा वापर केवळ खाण्यापुरता मर्यादित नाही तर, शरीराच्या अनेक समस्या कमी करण्यात देखील काजू महत्त्वाचा ठरतो.(Health Benefits of Cashew Nuts)

काजूचे नियमित सेवन केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या टाळता येतात. काजूमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फायबर आणि लोहाचे गुणधर्म आहेत. म्हणून काजूला ड्रायफ्रुट्सचा राजा मानले जाते. शरीरासाठी काजू खूप गुणकारी आहेत. काजूचे निअयमित सेवन केल्यास विविध फायदे दिसून येतील. रोज थोडेसे काजू खाल्ल्याने शरीराला केवळ उर्जाच मिळत नाही तर विविध आजार आपल्यापासून दूर राहतात.(Health Benefits of Cashew Nuts)

हाडे मजबूत होतात.

काजूमध्ये मॅग्नेशियम आणि कॅल्शियमचे प्रमाण चांगले असते. काजूच्या सेवनाने हाडे आणि ऑस्टिओपोरोसिसच्या समस्येपासून मुक्ती मिळण्यास मदत होते. काजूमधील कॅल्शियम नैसर्गिकरीत्या हाडांना मजबुती देते.

पचनक्रिया सुधारते.

काजूमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे, काजू पचन क्रिया सुधारण्यासाठी मदत करू शकते. काजू खाल्ल्यास गॅस आणि बद्धकोष्ठतेच्या समस्यापासून मुक्ती मिळू शकते. पचनासाठी काजू खूप फायदेकारक मानले जातात.(Health Benefits of Cashew Nuts)

मधुमेह नियंत्रित ठेवते.

काजूमध्ये अशी पुष्कळ पोषक द्रव्ये आढळतात, जे रक्तातील ग्लुकोज नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. मधुमेहाच्या रुग्णांसाठी काजूचे नियमित सेवन करणे फादेकारक मानले जाते.

त्वचेच्या सुरकुत्या कमी होतात.

काजू त्वचेसाठी देखील खूप उपयुक्त मानले जातात. काजूच्या सेवनाने त्वचेच्या सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. काजूमध्ये व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडेंट गुणधर्म असतात जे त्वचेसाठी फायदेकारक मानले जातात.

केसांना मजबुती मिळते.

काजूमध्ये मॅग्नेशियम, जस्त, लोह आणि फॉस्फरस सारखे पोषक घटक आढळतात. या घटकांमुळे केस मजबूत होतात. शिवाय केसांना चमक मिळून ते केस दाट होण्यास मदत होते.

(टीप : उपचारांपूर्वी अथवा अधिक माहितीसाठी नेहमी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

(Health Benefits of Cashew Nuts)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI