AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Food | दररोज ‘दही’ खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हालाही माहित नसतील!

दररोज दही खाल्ल्याने केवळ ताजेतवाने वाटत नाही तर, पाचन तंत्रही ठीक राहते आणि पोटाचा त्रासही होत नाही.

Food | दररोज ‘दही’ खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हालाही माहित नसतील!
दही
| Edited By: | Updated on: Dec 07, 2020 | 12:28 PM
Share

मुंबई : दही (Curd) हा बहुतेक लोकांच्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. दह्यामध्ये अनेक पोषक घटक असतात. दररोज दही खाल्ल्याने केवळ ताजेतवाने वाटत नाही तर, पाचन तंत्रही ठीक राहते आणि पोटाचा त्रासही होत नाही (Health Benefits). दही ऑस्टिओपोरोसिस, रक्तदाब, केस आणि हाडे यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. दह्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, राइबोफ्लेविन, व्हिटामिन बी 6 आणि व्हिटामिन बी12 या पोषक घटकांचे प्रमाण अधिक असते (Health Benefits of Curd).

जेवणात रोज दही खाणे आवश्यक आहे. दही खाल्ल्यामुळे शरीरातील समस्या दूर व्हायला मोठी मदत होते. दही पौष्टिक असल्यामुळे आरोग्यासंबधी आणि सौंदर्यासंबधित समस्यांवरदेखील दही खाणे हा उत्तम उपाय आहे. केसातील कोंड्यापासून त्वचा कोमल करण्यासाठी दह्याचा उपयोग होतो. रोज दह्यात गूळ किंवा खडीसाखर टाकून किंवा लस्सीच्या स्वरुपात दही खाल्ल्याने ते सौंदर्यवर्धक देखील ठरते.

दही खाण्याचे महत्त्वाचे फायदे :

  • दररोज दही खाल्ल्याने उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो. त्याचबरोबर हृदयाशी संबंधित आजारांपासून दूर राहण्यासाठीही दही उपयुक्त आहे.
  • केसांवर आणि त्वचेवर दही लावल्याने त्याचे चांगले परिणाम दिसू लागतात. डोक्यातील कोंडा टाळण्यासाठी केसांना दही लावणे फायदेशीर ठरते. यासाठी केसांना दही लावून अर्ध्या तासाने केस धुवावे.
  • दह्यामध्ये फॅटचे प्रमाण अधिक असते. दह्यामध्ये दुधासारखेच पोषक घटक असतात. दह्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे दात आणि हाडेही बळकट होतात (Health Benefits of Curd).
  • दही एनर्जी बूस्टर देखील आहे. त्यामुळे ताण-तणाव देखील कमी होतो. दही उत्तम अँटीऑक्सिडेंट असून, शरीर हायड्रेट देखील ठेवते.
  • दह्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. याव्यतिरिक्त झोपेची समस्या दूर करण्यातही दही फायदेशीर आहे.
  • चेहऱ्यावर,त्वचेवर मध आणि बदाम तेलासोबत पंधरा मिनिटे दही वापरल्याने मृत आणि रापलेली त्वचा निघून जाते. कांती उजळ बनते. संत्र्याच्या सालीसोबत दही लावल्याने रंग उजळतो. गुलाब पाणी आणि हळदी सोबत दही लावल्याने त्वचा उजळ आणि मुलायम बनते. लिंबू रस आणि दह्याच्या वापराने त्वचेवरील,चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते (Health Benefits of Curd).

दह्याचे प्रकार

आजकाल सर्वाना कंपनीचे डब्यातील पॅकबंद दहीच मिळते. पूर्वीच्या काळी बऱ्याच घरांमध्ये छान काळ्या मातीच्या मडक्यात उकळून कोमट झालेल्या दुधात सायंकाळी विरजण घालून दही तयार केले जायचे. दही बनवण्याच्या पद्धती व त्याचा स्वाद यावरून दह्याचे पाच प्रकार पडतात. मंद, गोड, आंबट-गोड, आंबट व अत्यंत आंबट असे हे पाच प्रकार. या प्रत्येक प्रकारानुसार, आजारानुसार व ऋतूनुसार दही सेवन केल्यास दह्याचे फार चांगले फायदे मिळतात. मात्र चुकीच्या पद्धतीने दही सेवन केल्यास नको असलेल्या आजारांनाही निमंत्रण मिळते. शरद, ग्रीष्म व वसंत ऋतूमध्ये दही खाणे हितकारक नसते. यामुळे कफ वाढून सर्दी, खोकला मागे लागतो (Health Benefits of Curd).

तसेच रात्रीदेखील दही खाऊ नये. खायचेच असेल तर, त्यात तूप, साखर, मुगाची डाळ, मध किंवा आवळा घालून खावे. अदमुरे म्हणजे अर्धवट लागलेल्या दह्याला ‘मंद दही’ असे म्हणतात. याचेही सेवन करू नये. याने त्रिदोष वाढतात, तसेच पोट बिघडून वारंवार शौच व मूत्रप्रवृत्ती होते. आंबट व अत्यंत आंबट दहीसुद्धा सेवन करू नये. यामुळे अनेक पित्ताचे व अपचनाचे विकार मागे लागतात. म्हणजेच फक्त गोड व आंबट-गोड दही आपण खाऊ शकतो. जे दही चांगले लागले आहे, जे मधुर रसदार व थोडे आंबट असते त्याला गोड दही असे म्हणतात. हे दही सर्वात उत्तम समजले जाते. हे शक्तिवर्धक असून यामुळे पचनशक्तीसुद्धा सुधारते, भूक वाढते. मात्र, मधुमेह झालेल्या व्यक्तीने कोणत्याच प्रकारचे दही सेवन करू नये.

(Health Benefits of Curd)

टीप : सदर लेख संशोधनावर आधारित असून, कुठल्याही उपचारापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.