AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीयांच्या हृदयाचा आकार 20 टक्क्यांनी लहान; संशोधनात भारतीय डॉक्टरांचा दावा

भारतीय नागरिकांचे हृदय पाश्चिमात्य नागरिकांच्या तुलनेत 15 ते 20 टक्क्यांनी लहान आहे. त्यामुळे भारतीयांच्या हृदयावरील उपचार पद्धतीत बदल करणे अपेक्षित असल्याचा दावा देशातील काही डॉक्टरांनी केला आहे.

भारतीयांच्या हृदयाचा आकार 20 टक्क्यांनी लहान; संशोधनात भारतीय डॉक्टरांचा दावा
| Updated on: Nov 05, 2020 | 6:10 PM
Share

नागपूर : भारतीय नागरिकांचे हृदय पाश्चिमात्य नागरिकांच्या तुलनेत 15 ते 20 टक्क्यांनी लहान आहे. त्यामुळे भारतीयांच्या हृदयावरील उपचार पद्धतीत बदल करणे अपेक्षित असल्याचा दावा देशातील काही डॉक्टरांनी केला. याविषयीचे संशोधन अमेरिकेतील ‘द इंटरनॅशनल जर्नल ऑफ कार्डीओव्हॅस्कूलार इमेजिंग’ या नियतकालीकात प्रकाशित झाले आहे. नागपूरचे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. शंतनू सेनगुप्ता यांचादेखील या संशोधनात समावेश आहे. (heart size of Indians is 20 percent smaller than foreign people caim indian researcher doctors)

प्रकाशित संशोधनानुसार, भारत देशातील नागरिकांच्या हृदयांचा आकार पाश्चिमात्य देशातील नागरिकांच्या तुलनेत पंधरा ते वीस टक्क्यांनी लहान आहे. या संशोधनाविषयी बोलताना डॉ. शंतनू सेनगुप्ता म्हणाले, “भारतीयांचे हृदय विदेशी नागरिकांच्या तुलनेत 15 ते 20 टक्क्यांनी लहान आहे. या विषयी अजून अभ्यास होणे बाकी आहे. पण भारतीयांचे हृदय लहान असल्यामुळे हृदयावरील उपचार पद्धतीत बदल करणे अपेक्षित आहे.”

तसेच, भारतीय नागरिकांची शरीरयष्टी लक्षात घेता हृदयाचा आकार लहान असल्याने कोणतेही कॉम्पलिकेशन नसल्याचं ते म्हणाले. धूम्रपान करणारे रुग्ण, मधुमेहाचा आजार असणारे आणि हृदयाचा आजार असणाऱ्या रुग्णांचे हृदय सामान्यतः मोठे आढळून येतात.असा निष्कर्षदेखील डॉ. शंतनू सेनगुप्ता आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काढला आहे.

नागपूर येथील डॉ. शंतनू सेनगुप्ता यांच्यासह देशातील काही नामवंत हृदयरोग तज्ज्ञांच्या टीमने हे संशोधन केले आहे. अमेरिकेतील ‘द इंटरनॅशनल जर्नल ऑफ कार्डिओव्हॅस्कुलर इमेजिंग’मध्ये हे संशोधन प्रकाशित झाले आहे. यासाठी भारतातील 6 केंद्रांत हजारो भारतीयांच्या हृदयाची तपासणी करण्यात आली. ज्यामध्ये 400 रुग्ण हे नागपुरातील आहेत. या सर्वांच्या हृदयाचा आकार 15 ते 20 टक्क्यांनी लहान असल्याचं संशोधनातून पुढे आलं आहे.

संबंधित बातम्या :

अमेरिकेत भारतीय वंशाच्या अनिकाचं Covid-19 औषध बनवण्यावर संशोधन, 18 लाख रुपये जिंकले

Weight Loss | जेवणानंतर चालल्याने वजन कमी होईल, नवीन संशोधनाचा मनोरंजक निष्कर्ष!

लवकरच विनाबियांची संत्री-मोसंबी, नागपुरातील संस्थेचे संशोधन

(heart size of Indians is 20 percent smaller than foreign people caim indian researcher doctors)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.