शेतकऱ्यांच्या पदरी निराशा, पावसामुळे कापूस वाळवत ठेवण्याची वेळ

धुळे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे कपाशी पिकाचे अतोनात नुकसान झाले. शेतकऱ्यांना कापूस वाळत ठेवण्याची वेळ आहे. (Heavy rain in Dhule district)

शेतकऱ्यांच्या पदरी निराशा, पावसामुळे कापूस वाळवत ठेवण्याची वेळ

धुळे : वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील कपाशी पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना कापूस वाळवत ठेवण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यातील कापडणे गावासह संपूर्ण खानदेशात अतिवृष्टी झाल्याने सगळीकडे सारखीच परिस्थिती आहे. (Heavy rain along with hurricanes in Dhule district casuses bad effect on cotton farming)

कपाशी पीक पूर्णपणे भिजले, उन्हात वाळवत ठेवल्यास भाव कमी

पावसामुळे कापूस भिजल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. कापसाची फुटलेली बोंडे खराब झाली आहेत. ओला कापूस व्यापारी घेत नाहीत आणि काढलेला कापूस उन्हात वाळवत ठेवला, तर कापसाचे वजन कमी होते. त्यामुळे शेतकरी दुहेरी कात्रीत सापडल्याचे चित्र आहे. मागच्या वर्षीही पावसाळी हंगामाच्या शेवटी आणि परतीच्या पावसाने खानदेशात हाहा:कार माजवला होता. खरीप हंगामात पेरणी केलेल्या पिकांची नासधूस झाली होती. या वर्षी सुद्धा अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांची परिस्थिती सारखीच आहे.

हे ही वाचा : धुळे जिल्ह्याची कोव्हिड 19 लढाईत सर्वोत्कृष्ट कामगिरी, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडून अभिनंदन

कोरोना आणि अतिवृष्टीमुळे पिकांच्या कापणीला विलंब

देशात कोरोना संसर्गामुळेही शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. कोरोनाकाळात शेतीसाठी लागणारी औषधं, खतांची दुकानं बंद होती. परिणामी शेतकऱ्यांना वेळेवर फवारणी, खत पेरणी करता आला नाही. धुळे जिल्ह्यात काही ठिकाणी तर खत आणि औषधांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करण्यात आला. परिणामी शेतकऱ्यांना खत, औषधी चढ्या भावाने खरेदी करावी लागली. शेतकरी कोरोना संकटातून सुटतो न सुटतो तोच, अतिवृष्टीसारख्या अस्मानी संकटात तो सापडला. हाताशी आलेल्या पिकाला शेतकऱ्यांना मुकावे लागले. मोठा फटका सहन करावा लागला.

दरम्यान, धुळे जिल्ह्यात खरीप हंगामात कापसाची सर्वात जास्त लागवड झाली आहे. निसर्गराजा या वर्षी तरी साथ देईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. प्रत्यक्षात मात्र, धुळे जिल्ह्यातील शेतकरी कोरोना आणि अतिवृष्टीमुळे दुहेरी संकटाला तोंड देत आहेत. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करुन, लवकरात लवकर विम्याचा लाभ द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

संबंधित बातम्या :

Heavy Rain | धुळे, नंदुरबारमध्ये जोरदार पाऊस; अनेक सखल भागात गुडघाभर पाणी

Dada Bhuse | मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतीचं नुकसान – कृषीमंत्री दादा भुसे

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतीचं नुकसान, ओला दुष्काळ जाहीर करा, भाजप आमदाराचे मुख्यमंत्र्यांना पत्र

(Heavy rain along with hurricanes in Dhule district casuses bad effect on cotton farming)

Published On - 6:18 pm, Thu, 1 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI