‘कोरोना’ व्हायरसमुळे हॉलिवूड अभिनेत्याचे निधन

हॉलिवूडचे प्रसिद्ध नाट्य आणि चित्रपट अभिनेते मार्क ब्लम यांचं कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे निधन झालं (Mark Blum dies of Corona)

'कोरोना' व्हायरसमुळे हॉलिवूड अभिनेत्याचे निधन

न्यूयॉर्क : ‘कोरोना’ व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला असताना प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेताही बळी पडला आहे. अभिनेते मार्क ब्लम यांचं COVID-19 मुळे निधन झालं. वयाच्या 69 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (Mark Blum dies of Corona)

ब्लम यांनी नाटकांसोबतच लव्हसिक, डेस्परेटली सीकिंग सुजान, क्रॉकोडाईल डंडी, ब्लाईन्ड डेट यासारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. स्थानिक वेळेनुसार 25 मार्च रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. हॉलिवूडमध्ये कोरोना विषाणूमुळे झालेला हा पहिला मृत्यू आहे.

ब्लम यांची पत्नी जेनेट जेरीश यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. मार्क ब्लम कोरोना विषाणूशी झुंज देत होते. न्यूयॉर्कमधील एका रुग्णालयात त्यांचं निधन झालं, अशी माहिती जेनेट यांनी दिली. ब्लूम यांच्या निधनावर हॉलिवूड सेलिब्रिटी आणि नाट्यजगताने शोक व्यक्त केला आहे.

न्यू जर्सी येथे जन्मलेल्या ब्लम यांनी 1970 च्या दशकात अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. सुरुवातीला त्यांनी थिएटर केलं. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा चित्रपट आणि टीव्ही मालिकांकडे वळवला.

टॉम हॅन्क्स, त्यांची पत्नी रीटा विल्सन आणि अभिनेता इदरीस एल्बा यासारखे हॉलिवूड कलाकारही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले आहे.

अमेरिकेत 63 हजार 570 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 884 जणांना प्राण गमवावे लागल्याची माहिती ‘जागतिक आरोग्य संघटनेच्या’ वेबसाईटवर आहे.

संबंधित बातम्या :

भारतीय खाद्यसंस्कृती जगभरात नेणारा मास्टरशेफ कोरोनाचा बळी

इंग्लंडच्या राजघराण्यातही कोरोनाचा शिरकाव, प्रिन्स चार्ल्स यांना कोरोना संसर्ग

(Mark Blum dies of Corona)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI