वीरप्पनला ठार करणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याला अमित शाह यांच्याकडून मोठी जबाबदारी

निवृत्त आयपीएस अधिकारी के. विजय कुमार (Ex. IPS K vijay kumar) यांची गृहमंत्रालयात वरिष्ठ सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

वीरप्पनला ठार करणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याला अमित शाह यांच्याकडून मोठी जबाबदारी

नवी दिल्ली : निवृत्त आयपीएस अधिकारी के. विजय कुमार (Ex. IPS K vijay kumar) यांची गृहमंत्रालयात वरिष्ठ सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आयपीएस के विजय कुमार यांनी चंदन तस्कर वीरप्पनचा खात्मा केला होता. वीरप्पनचा खात्म केल्यापासून विजय कुमार (Ex. IPS K vijay kumar) चर्चेत आले होते. सध्या गृहमंत्रलयाने त्यांच्यावर नवीन केंद्रशासित  प्रदेश जम्मु-काश्मीरच्या सुरक्षेसंबंधी सल्ला देण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

विजय कुमार यांनी यापूर्वी जम्मू-काश्मीरच्या राज्यपालांचे सल्लागर म्हणून काम केले आहे. एक अधिकारी म्हणून त्यांनी यशस्वीरित्या स्पेशल टास्क फोर्सचे नेतृत्व केले आहे. त्यासोबतच त्यांनी चंदन तस्कर वीरप्पनला ठार केले आहे. वीरप्पनची तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणात दहशत होती.

कोण आहे के. विजय कुमार ?

कुख्यात चंदन तस्कर वीरप्पनला ठार करणारे के. विजय कुमार हे 1975 च्या बॅचचे आहेत. विजय कुमार हे मुळचे तामिळनाडूचे आहेत. विजय कुमार यांनी वीरप्पनचा खात्मा केल्यानंतर सर्व स्तरातून त्यांचे कौतुक करण्यात आले होते. वीरप्पनचा खात्म केला तेव्हा ते एसटीएफचे प्रभारी होते. त्यांच्या नेतृत्वात एसटीएफने यशस्वीरित्या वीरप्पनला ठार केले. विजय कुमार यांनी यापूर्वीही अनेक केंद्रातील मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.

वर्ष 2010 मध्ये जेव्हा छत्तीसगडमधील दंतेवाडामध्ये सीआरपीएफच्या 75 जवानांची हत्या करण्यात आली होती. तेव्हा विजय कुमार यांची सीआरपीएफच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. तसेच 1998 ते 2001 पर्यंत ते सीमा सुरक्षा बलमध्ये इंस्पेक्टर जनरल (आयजी) या पदावर होते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI