गुप्तेश्वर पांडे DGP होते, मात्र भाजप नेत्यासारखे बोलायचे, अनिल देशमुखांचा हल्लाबोल

गुप्तेश्वर पांडे बिहारचे DGP होते मात्र ते भाजपचे वरिष्ठ नेते असल्यासारखे बोलायचे, अशी जोरदार टीका गृहमंत्री अनिल देखमुख यांनी केली. (Home Minister Anil Deshmukh Criticized Gupteshwar Pandey)

गुप्तेश्वर पांडे DGP होते, मात्र भाजप नेत्यासारखे बोलायचे, अनिल देशमुखांचा हल्लाबोल

नागपूरगुप्तेश्वर पांडे बिहारचे DGP होते मात्र ते भाजप नेते असल्यासारखे बोलायचे, अशी जोरदार टीका गृहमंत्री अनिल देखमुख यांनी केली. बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पांडे यांनी घेतलेल्या स्वेच्छा निवृत्तीवर गृहमंत्री देशमुख यांना पत्रकार परिषदेत पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावेळी त्यांनी पांडेंवर बोचरे वार केले. (Home Minister Anil Deshmukh Criticized Gupteshwar Pandey)

“बिहारचे माजी DGP गुप्तेश्वर पांडे बिहारचे एक वरिष्ठ अधिकारी होते. दीड दोन महिन्यापासून आपण पाहत होतो, ते असे बोलयाचे की त्यांच्या बोलण्यातून ते भाजपचे वरिष्ठ नेते आहेत, असं जाणवायचं. वरिष्ठ अधिकाऱ्याने असं बोलणं उचित नव्हतं”, असं गृहमंत्री देशमुख म्हणाले.

अनिल देशमुख म्हणाले, ते ज्या प्रकारे ते बोलायचे, ज्या प्रकारची त्यांची वक्तव्य असायची त्यावरून तरी ते भाजप नेते आहेत असं वाटायचं. राजीनामा दिल्यानंतर आता ते भाजपच्या तिकीटावर विधानसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा आहेत. यावरूनच त्यांच्या पाठीमागच्या एकंदरित वक्तव्यांचा अंदाज येतो”

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या चौकशी प्रकरणात बिहार पोलिसांना महाराष्ट्र पोलीस सहकार्य करत नसल्याची टीका गुप्तेश्वर पांडे यांनी केली होती. तसंच सुशांत सिंह राजपूत प्रकरणात मुंबई पोलिसांनी आतापर्यंत काय चौकशी केलीये हे त्यांनी सांगावं, असं आव्हानच त्यांनी मुंबई पोलिसांनी दिलं होतं.

बिहार विधानसभेच्या तोंडावर गुप्तेश्वर पांडेंची स्वेच्छानिवृत्ती

बिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी मंगळवारी (22 सप्टेंबर) स्वेच्छानिवृत्ती घेतली. बिहार निवडणुकांच्या तोंडावर व्हीआरएस (व्हॉलंटरी रिटायरमेंट फ्रॉम सर्व्हिस) घेतल्याने पांडे राजकारणातून सेकंड इनिंग सुरु करण्याची शक्यता बळावली आहे.गुप्तेश्वर पांडे फेब्रुवारी 2021 मध्ये सेवानिवृत्त होणार होते, मात्र पाच महिने आधीच त्यांनी व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली.

गुप्तेश्वर पांडे भाजपकडून बिहार विधानसभेच्या रिंगणात?

पुढील महिन्यात बिहार निवडणुका होण्याची चिन्हं असल्याने गुप्तेश्वर पांडे निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपकडूनच ते निवडणूक लढवण्याची चिन्हं आहेत.

कोण आहेत गुप्तेश्वर पांडे

गुप्तेश्वर पांडे यांचा जन्म 1961 मध्ये बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील गेरुबंध गावात झाला. पांडे यांनी पाटणा विद्यापीठातून संस्कृतमध्ये पदवी संपादन केली. विशेष म्हणजे संस्कृतमधून त्यांनी यूपीएससीची परीक्षा दिली होती. पहिल्याच प्रयत्नात ते यूपीएससी परीक्षा उत्तीर्णही झाले. त्यानंतर ते आयकर अधिकारी झाले. दुसर्‍या प्रयत्नात आयपीएस परीक्षा पास होऊन त्यांनी पोलिस सेवेत प्रवेश केला.

गुप्तेश्वर पांडे यांनी याआधी 2009 मध्येही व्हीआरएस घेतली होती. भाजपच्या तिकिटावर बिहारमधील बक्सर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्याचा त्यांचा मानस होता. मात्र त्यांची महत्त्वाकांक्षा अपुरी राहिल्याने नऊ महिन्यांनी बिहार सरकारकडे त्यांनी आपली निवृत्ती मागे घेण्याची विनंती केली.

नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने त्यावेळी पांडे यांचा विनंती अर्ज मंजूर केला होता. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ते बिहार पोलिस महासंचालकपदी रुजू झाले होते.

संबंधित बातम्या

Gupteshwar Pandey | बिहार पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडेंची स्वेच्छानिवृत्ती, राजकारणाच्या वाटेवर?

VIDEO | ‘बिहार के रॉबिनहूड’…, स्वेच्छानिवृत्ती स्वीकारताच गुप्तेश्वर पांडेंवर रापचिक सॉन्ग

(Home Minister Anil Deshmukh Criticized Gupteshwar Pandey)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI