AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार मालक सावधान, अन्यथा कायमचा होईल परवाना रद्द

जर तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी नियमांचं पालन गेलं नाही तर तुम्हाला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. कारण, नियमांचं पालन होतं की नाही हे पाहण्यासाठी एक विशेष पथक स्थापन करण्यात येणार आहे. 

हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार मालक सावधान, अन्यथा कायमचा होईल परवाना रद्द
| Edited By: | Updated on: Oct 08, 2020 | 8:56 AM
Share

मुंबई : कोरोनाचा धोका वाढत असला तरी राज्य आता अनलॉकच्या प्रक्रियेत आहे, त्यामुळे अनेक महत्त्वाच्या गोष्टींसाठी परवानगी देण्यात आली आहे. 5 ऑक्टोबरपासून राज्यात हॉटेल, रेस्टॉरंट आणि बारही पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. पण जर तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी नियमांचं पालन गेलं नाही तर तुम्हाला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. कारण, नियमांचं पालन होतं की नाही हे पाहण्यासाठी एक विशेष पथक स्थापन करण्यात येणार आहे.  (Hotel restaurant and bar owners license will be revoked permanently if not follow corona rules)

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाने हॉटेल व्यावसायिकांसाठी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. यानुसारच हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट सुरू करण्यास परवानगी दिलेली आहे. या नियमांचं हॉटेल चालकांकडून पालन होतं आहे की नाही, हे पाहण्यासाठी पथकं स्थापन केली जाणार आहेत. ही पथकं हॉटेलची तपासणी करणार असून यामध्ये नियमांचं उल्लंघन होत असल्याचं निदर्शनास आल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार 50 हजार रुपयांचा दंडाची कारवाई करण्यात येणार आहे.

तसंच, दुसऱ्यांदा नियमांचं उल्लंघन केल्यास हॉटेल परवाना काही दिवसांसाठी निलंबित आणि जर तिसऱ्यांदा नियमांचे उल्लंघन झाल्यास हॉटेल व्यवसायाचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला जाणार आहे, अशी माहिती विभागीय आयुक्‍त सौरभ राव यांनी दिली. हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेने सुरू आहे का, प्रवेश करण्याच्या ठिकाणी सॅनिटायझरची व्यवस्था, थर्मलद्वारे शरीराचे तापमान तपासणे, हवा खेळती, आवश्‍यक ते सामाजिक अंतर, डिजिटल पेमेंटला प्राधान्य, चांगल्या प्रतीचे पेपर नॅपकीन, वारंवार निर्जंतुकीकरण करणे आवश्‍यक आदी मार्गदर्शक सूचना शासनाने दिल्या आहेत.

या मार्गदर्शक सूचनांचे पालन होतं की नाही, यावर लक्ष ठेवण्याबरोबच नियमांच्या अंमलबजावणीचे काम विशेष पथक करणार आहे. शहरामधील पथकामध्ये मनपाचे कर्मचारी, उत्पादन शुल्कचे अधिकारी आणि पोलीस यांचा समावेश असणार आहे. तर, ग्रामीण भागात महसूल आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे. (Hotel restaurant and bar owners license will be revoked permanently if not follow corona rules)

मुंबई पालिकेचे हॉटेल्ससंदर्भातील काही नियम – मुंबईत हॉटेल्समध्ये टेबलाचे प्री-बुकिंग आवश्यक – ठराविक संख्येपेक्षा जास्त ग्राहक एकावेळेस हॉटेलमध्ये येण्यास परवानगी नाही – दोन टेबलमध्ये कमीत कमी 2 ते 3 फुटांचे अंतर आवश्यक – टेबल आणि किचनची वेळोवेळी स्वच्छता करणं गरजेचं – हॉटेलमधील कर्मचाऱ्यांची वेळोवेळी वैद्यकीय चाचणी आणि कोविड टेस्ट करणं बंधनकारक

इतर बातम्या – 

IPL 2020, CSK vs KKR : गोलीकीपर प्रमाणं झेपावत धोनीनं घेतला कॅच, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

KBC 12 : महाराष्ट्राच्या कन्येने 12 लाख जिंकले, वडिलांच्या शस्त्रक्रियेसाठी ‘हॉटसीट’वर बसलेल्या अस्मिताची कहाणी

(Hotel restaurant and bar owners license will be revoked permanently if not follow corona rules)

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.