ट्रेनमधील चादर, ब्लँकेट्स किती दिवसांनी धुतात? हे वाचून वस्तू वापरताना 10 वेळा विचार कराल; RTIचा रिपोर्ट पाहून आश्चर्य वाटेल
ट्रेनमधील चादर, उशा आणि टॉवेल, ब्लँकेट, बेड प्रत्येक वापरानंतर कितीवेळा स्वच्छ केले जातात किंवा किती दिवसांनी ते धुतले जातात. याचं उत्तर ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल आणि इथून पुढे या वस्तू वापरायच्या का हाही विचार येईल. आरटीआयच्या माध्यमातून विचारलेल्या या प्रश्नावर भारतीय रेल्वेनेच याबाबत माहिती दिली आहे.

ट्रेनमधील चादर, उशा आणि टॉवेल, ब्लँकेट, बेड प्रत्येक वापरानंतर कितीवेळा स्वच्छ केले जातात किंवा किती दिवसांनी ते धुतले जातात. याचं उत्तर ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल आणि इथून पुढे या वस्तू वापरायच्या का हाही विचार येईल. आरटीआयच्या माध्यमातून विचारलेल्या या प्रश्नावर भारतीय रेल्वेनेच याबाबत माहिती दिली आहे.
कुठेही लांब पल्ल्याला जायच असेल तर नक्कीच सर्वजन रेल्वेनेच प्रवास करणं पसंत करतात. रेल्वेमध्ये सामान्य सीटिंग कोच व्यतिरिक्त स्लीपर क्लास, एसी कोच असे वेगवेगळे कोच असून या प्रत्येकाच भाडं देखील वेगळं असत. लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमध्ये स्लीपर, 3 टायर एसी, 3 टायर इकॉनॉमी, 2 टायर एसी, फस्ट एसी असे कोच असतात.
- How often are the sheets and blankets used by passengers washed in the train?
ट्रेनमधील चादर, ब्लँकेट्स किती दिवसांनी धुतात?
प्रवास अजून आरामदायी व्हावा यासाठी अनेकजण एसी कोचची निवड करतात. कारण एसी कोचमध्ये बर्थ बुक करणाऱ्या प्रवाशांना प्रवासाच्या सुरुवातीला दोन चादरी, उशा, टॉवेल आणि ब्लँकेटसह एक बेड रोल दिला जातो. स्वच्छता जरा जास्त ठेवली जाते अशा मताने अनेकजण एसी कोचची निवड करतात. मात्र कित्येकदा ट्रेनमध्ये मिळणाऱ्या बेडशीट आणि ब्लँकेट्स अस्वच्छ असल्याची किंवा उग्र वास येत असल्याची तक्रार वारंवार प्रवाशांनी केलेलीही आपण ऐकलं असेल.
- How often are the sheets and blankets used by passengers washed in the train?
या प्रसंगांवरून एक प्रश्न नक्कीच पडतो तो म्हणजे चादर, उशा आणि टॉवेल, ब्लँकेट, बेड प्रत्येक वापरानंतर कितीवेळा स्वच्छ केले जातात किंवा किती दिवसांनी ते धुतले जातात. याचं उत्तर ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल आणि इथून पुढे या वस्तू वापरायच्या का हाही विचार येईल. आरटीआयच्या माध्यमातून विचारलेल्या या प्रश्नावर भारतीय रेल्वेनेच याबाबत माहिती दिली आहे.
रेल्वेच्या उत्तरानुसार, चादर, उशा आणि टॉवेल, बेडशीट धुण्यासाठी रेल्वेने देशभरात 46 विभागीय लॉन्ड्री तयार केल्या आहेत. त्यामुळे वेळोवेळी ही धुलाई होत असल्याचे रेल्वेने म्हटले आहे.तसेच रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार बेडरोलसह दिलेले ब्लँकेट हे महिन्यातून एकदा स्वच्छ केले जाते.
- How often are the sheets and blankets used by passengers washed in the train?
ब्लँकेटची देखभाल करणे खूपच अवघड
ब्लँकेट ओले झाले किंवा त्यावर काही पडले तर ते मध्येच स्वच्छ केले जाते, अन्यथा ब्लँकेट महिन्यातून एकदाच धुतात. तसेच लोकरीच्या ब्लँकेटची देखभाल करणे खूपच अवघड आहे. त्यामुळे काही रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मते काही वेळा ब्लँकेट धुण्यास दोन महिन्यांचा कालावधी लागतो.
तसेच द न्यू इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार आरटीआय म्हटले आहे की, प्रवाशांना दिलेले बेडरोल प्रत्येक वापरानंतर धुतले जाते. लोकरीच्या चादरी महिन्यातून एकदा किंवा दोनदा धुतल्या जातात, असेही रेल्वेने आरटीआयद्वारे सांगितले आहे. ही धुण्याची प्रक्रिया त्यांच्या उपलब्धता आणि पुरवठ्यावर अवलंबून असते.

वेगवेगळ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या २० सदस्यांनी सांगितले की, ब्लँकेट महिन्यातून एकदाच धुतात. तर एका कर्मचाऱ्याने सांगितले की, प्रत्येक प्रवासानंतर आम्ही बेडशीट आणि पिलो कव्हर बंडलमध्ये लॉन्ड्रीला देतो. ब्लँकेटच्या बाबतीत, आम्ही त्यांना व्यवस्थित दुमडून ठेवतो. जेव्हा वास येतो किंवा त्याच्यावर जेवणाचा डाग लागलेला असतो तेव्हा आम्ही त्यांना लॉन्ड्रीमध्ये पाठवतो.
कंत्राटदारांच्या मनमानीमुळे साफसफाई नीट होतं नाही
रेल्वेने विभागीय लॉन्ड्री बांधली असली तरी ती चालवायला कंत्राटदाराला दिली आहे. कंत्राटदारांच्या मनमानीमुळे साफसफाई योग्य प्रकारे होत नाही, त्यामुळे अनेकदा डब्यांच्या बेडरोलच्या तक्रारी येतात. गेल्या वर्षी रेल्वेने या लॉन्ड्रीच्या कंत्राट नियमात बदल केला. यापूर्वी हे कंत्राट दीर्घ कालावधीसाठी दिले जात होते, परंतु नंतर ते कमी करून 6 महिन्यांचे करण्यात आले, अशी माहितीही रेल्वे विभागाकडून देण्यात आली.
