आधार कार्डवरील तुमचा फोटो कसा बदलाल?

मुंबई : आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकासाठी महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. हे भारतीय नागरिकांचं ओळखपत्र आहे. आज कुठल्याही महत्त्वाच्या व्यवहारासाठी आपल्याला या आधार कार्डची गरज असते. आर्थिक व्यवहार असो किंवा सरकारी योजनांच्या लाभासाठी असो, प्रत्येक ठिकाणी हे आधार कार्ड एक महत्त्वाच्या कागदपत्राचं काम करतं. आधार कार्ड बनवणारी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण संस्था म्हणजेच UIDAI […]

आधार कार्डवरील तुमचा फोटो कसा बदलाल?
सध्याच्या काळात आधार कार्ड खूप महत्वाचे आहे. सिम कार्ड घेण्यापासून पीएफसारख्या अनेक सेवांसाठी आधार कार्ड असणे फार महत्वाचे आहे. त्यामुळे सरकारी योजनांपासून अगदी घरगुती कामकाजासाठी आधार कार्ड गरज भासते. सध्या बऱ्याच ठिकाणी आधारकार्डचा वापर हा मुख्य ओळखपत्र म्हणूनही केला जात आहे.
Follow us
| Updated on: May 27, 2019 | 10:43 PM

मुंबई : आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकासाठी महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. हे भारतीय नागरिकांचं ओळखपत्र आहे. आज कुठल्याही महत्त्वाच्या व्यवहारासाठी आपल्याला या आधार कार्डची गरज असते. आर्थिक व्यवहार असो किंवा सरकारी योजनांच्या लाभासाठी असो, प्रत्येक ठिकाणी हे आधार कार्ड एक महत्त्वाच्या कागदपत्राचं काम करतं. आधार कार्ड बनवणारी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण संस्था म्हणजेच UIDAI ही नागरिकांना अनेक सुविधा पुरवते. त्यापैकीच एक सुविधा फोटो अपडेट करणे ही देखील आहे.

अनेकांना आधार कार्डवरील फोटोवर आक्षेप असतो. आधार कार्डवर फोटो चांगला येत नसल्याने नागरिक नाराज असतात. यावर अनेक मीम्सही बनवले जातात. आधार कार्डवरील फोटो चांगला नसल्याने अनेकजण आधार कार्ड केवळ गरजेच्या ठिकाणीच वापरतात, तसेच ते आपलं आधार कार्ड इतर कुणाला दाखवतही नाही. मात्र, तुम्हाला आधार कार्डवरील तुमचा फोटो आवडत नसेल तर तुम्ही तो बदलू शकता.

आधार कार्डमध्ये मोबाईल नंबर, पत्ता आणि इतर माहिती बदलता येते, हे तर सर्वांनाच माहीत आहे. मात्र, आता तुम्हाला तुमच्या आधार कार्डमधील फोटोही बदलता येणार आहे. नवा आणि आपल्या आवडीचा फोटो अपलोड करण्यासाठी दोन पद्धती आहेत. चला तर या पद्धती जाणून घेऊ, ज्याच्या मदतीने तुम्ही आधार कार्ड वरील तुमचा न आवडणारा फोटो बदलू शकता.

पहिली पद्धत

UIDAI च्या स्थानिक कार्यालयाला पत्र लिहून तुम्ही तुमचा नवा फोटो अपलोड करण्याची विनंती करु शकता. या अर्जासोबत तुम्हाला तुमचा नवा फोटो आणि आधार कार्डची प्रत जोडावी लागेल. जर तुमचा अर्ज स्वीकारण्यात आला तर केवळ 15 ते 20 दिवसांमध्ये तुम्हाला तुमचं नवं आधार कार्ड नव्या फोटोसह मिळेल.

दुसरी पद्धत  

पहिल्यांदा तुम्हाला UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल. त्यानंतर नोदंणी फॉर्म डाऊनलोड करुन तो भरावा लागेल. आता तुमच्या जवळच्या कुठल्याही नोदंणी केंद्रावर (AEC) जाऊन हा फॉर्म तिथल्या आधार कार्डसंबंधी कामं करणाऱ्या अधिकाऱ्याला द्या. या फॉर्मसोबत तुम्हाला बायोमेट्रिक तपशील मागितला जाईल. त्यानंतर अधिकारी तुमचा नवा फोटो घेईल. या प्रक्रियेसाठी तुम्हाला 25 रुपयांचं शुल्कही द्यावं लागेल. 25 रुपयांवर तुम्हाला जीएसटीही द्यावा लागेल. त्यानंतर तुम्हाला एक पावती दिली जाईल. यामध्ये यूआरएन नंबर असेल. या नंबरच्या मदतीने तुम्ही तुमचं आधार कार्ड अपडेट झालं की नाही ते तपसू शकता. यनंतर काहीच दिवसांत तुम्हाला नव्या फोटोसह तुमचं आधार कार्ड मिळेल.

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.