उपचाराला पैसे नव्हते, आजारपणाला कंटाळून पतीने पत्नीला जिवंत पुरले
पत्नीच्या आजारावर उपचार करण्यासाठी पैसे नसल्यामुळे पतीने पत्नीला (Husband killed wife in goa) जिवंत पुरले. ही घटना काल (5 डिसेंबर) गोवा येथील मारमवाडा येथे उघडकीस आली आहे.

पणजी (गोवा) : पत्नीच्या आजारावर उपचार करण्यासाठी पैसे नसल्यामुळे पतीने पत्नीला (Husband killed wife in goa) जिवंत पुरले. ही घटना काल (5 डिसेंबर) गोवा येथील मारमवाडा येथे उघडकीस आली आहे. तुकाराम शेतगांवकर (46), असं आरोपी पतीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी पतीला (Husband killed wife in goa) अटक केली असून अधिक चौकशी सुरु आहे.
आरोपी पती तुकाराम पैसे नसल्यामुळे पत्नीवर उपचार करु शकत नव्हता. पत्नी तन्वी आजारी असल्यामुळे गेले काही दिवस ती बेडवरच पडून होती. पत्नीच्या आजारपणाला कंटाळून पतीने हे कृत्य केले, असं पोलिसांनी सांगितले.
पत्नीला पुरलेल्या ठिकाणी काल कालव्याचे काम करणारे कर्मचारी आले. त्यांनी तेथे जेसीबीच्या मदतीने खोदण्याचे काम सुरु केले. यावेळी आरोपी पती घटनास्थळी आला. त्याने खोदकाम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विरोध केला. मात्र कर्माचाऱ्यांनी त्याचे न ऐकता खोदकाम सुरु केले. खोदकाम सुरु असताना तेथे मृतदेह मिळाल्याने या घटनेचा खुलासा झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
मृतदेह मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी गोव्यातील एका खासगी रुग्णालयात पाठवण्यात आला. त्यानंतर आरोपी पती शेतगावकरला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली. यावेळी शेतगावकरने गुन्ह्याची कबुली दिली. सध्या शेतगावकरला पोलिसांनी अटक केली आहे.