जुन्या ओळखीचा फायदा घेत तरुणाला हनी ट्रॅपमध्ये फसवण्याचा प्रयत्न, पती-पत्नीसह तिघांना अटक

जुन्या ओळखीचा फायदा घेत तरुणाला हनी ट्रॅपमध्ये फसवण्याचा प्रयत्न, पती-पत्नीसह तिघांना अटक

नागपूरच्या नंदनवन परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने आपली जुनी ओळख असलेल्या तरुणाला प्लॅन करुन घरी बोलावलं.

Nupur Chilkulwar

|

Oct 06, 2020 | 7:25 PM

नागपूर : जुन्या ओळखीचा फायदा घेऊन तरुणाला हनी ट्रॅपमध्ये फसविण्याचा प्रयत्न करणाऱ्या (Husband-Wife Tries To Trap A Man In Honey Trap) तिघांना नंदनवन पोलिसांनी अटक केली आहे. नागपुरातील नंदनवन परिसरात ही घटना घडली आहे (Husband-Wife Tries To Trap A Man In Honey Trap).

नागपूरच्या नंदनवन परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने आपली जुनी ओळख असलेल्या तरुणाला प्लॅन करुन घरी बोलावलं. तो घरी पोहचताच या तरुणाच्या पत्नीने घरी आलेल्या मित्रासोबत सलगी करायला सुरुवात केली. ठरल्या प्रमाणे तिचा पती आपल्या दोन मित्रांसोबत तिथे पोहचलाय त्यानंतर त्या तरुणाचे अर्ध नग्न फोटो काढले. त्याला मारहाण करत तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप करु लागले.

पोलिसात तक्रार देण्याची धमकी दिली. पोलिसात जायचं नसेल, तर एक लाख रुपये देण्याची मागणी केली. त्याच्या जवळ असलेले पैसे हिसकावून घेतले. इतकंच नाही तर चाकुच्या धाकावर त्याला एटीएममध्ये नेलं आणि त्याच्याकडून 13 हजार रुपये काढून घेतले. इतकंच नाही तर अश्लील फोटो वायरल करण्याची धमकीही तरुणाला दिली.

मात्र तरुणाने त्यांच्या तावडीतून सुटताच थेट नंदनवन पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी त्या तरुणीसह तिघांना अटक केली.

Husband-Wife Tries To Trap A Man In Honey Trap

संबंधित बातम्या :

संगमनेरमध्ये भावाकडून अल्पवयीन बहिणीवर लैंगिक अत्याचार, मुलगी गरोदर राहिल्याने प्रकार उघड

पुण्यात दगडाने ठेचून गुंडाची हत्या, तर पोलीस आयुक्तालयाजवळही गोळीबाराचा थरार

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें