AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

समाजसेवेचं व्रत हाती घेतलेलं आहे, कधीही राजकारणात येणार नाही : इंदुरीकर महाराज

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या व्यासपीठावर गेल्यानंतर इंदुरीकर महाराजांच्या भाजप प्रवेशाचा अंदाज लावला जात होता. पण त्यांनी स्वतः पत्रकाद्वारे स्पष्टीकरण देत या चर्चांना पूर्णविराम दिला. 

समाजसेवेचं व्रत हाती घेतलेलं आहे, कधीही राजकारणात येणार नाही : इंदुरीकर महाराज
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Sep 14, 2019 | 3:54 PM
Share

शिर्डी : किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर (Nivrutti Maharaj Indurikar BJP) यांनी त्यांच्या राजकारण प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम दिलाय. भाजपच्या व्यासपीठावर गेलो, तो सामाजिक कार्यक्रमासाठी आणि धनादेश सुपूर्द करण्यासाठी, समाजसेवेचं व्रत हाती घेतलेलं आहे, त्यामुळे कधीही राजकारणात येणार नाही, अशी माहिती निवृत्ती महाराजांनी (Nivrutti Maharaj Indurikar BJP) दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या व्यासपीठावर गेल्यानंतर इंदुरीकर महाराजांच्या भाजप प्रवेशाचा अंदाज लावला जात होता. पण त्यांनी स्वतः पत्रकाद्वारे स्पष्टीकरण देत या चर्चांना पूर्णविराम दिला.

इंदुरीकर महाराजांचं स्पष्टीकरण

राम कृष्ण हरी..

“आज संगमनेर तालुक्यातील महाजनादेश यात्रेमध्ये मी माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी गेलो नव्हतो. समाजासाठी माझं काहीतरी देणं लागते आणि माझ्या व्यस्त कार्यक्रमांच्या दैनंदिन जीवनात मला समाजासाठी जी काही मदत करायची असती ती करता येत नाही. म्हणून आज मुख्यमंत्र्यांना मी स्वतः एक लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सुपूर्द करण्यासाठी संगमनेर गेलो होतो. मी कुठल्याही प्रकारचा राजकीय हेतू मनामध्ये ठेवलेला नव्हता. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी मी तो एक लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला व कुठल्याही पक्षाची मफर गळ्यात न घालता तिथून कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी निघून गेलो.

जर मला राजकारणात किंवा निवडणुकीत उतरायचे असते तर मी संपूर्ण कार्यक्रम होईपर्यंत तिथेच थांबून राहिलो असतो परंतु मी मात्र समाजसेवेचे व्रत हाती घेतलेले आहे. राजकारणात मी कधीही येणार नाही आणि संगमनेर तालुक्याचे नेतृत्व देखील खूप सुसंस्कृत आणि विकासात्मक आहे त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक गोष्टी मी स्वतः समाजासाठी करत आलो आहे. माझ्या स्वतःच्या शाळेसाठी स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांनीच पहिली वर्गणी दिलेली आहे आणि आज देखील आमदार बाळासाहेब थोरात हे शाळेला नेहमी मदत करत आहे. मी कधीही या गोष्टीचा विसर पडू देणार नाही.मी सर्व माझ्या हितचिंतकांना व व श्रोत्यांना सांगू इच्छितो की मी कधीही राजकारणात येणार नाही. समाजकार्याचा वसा मी हाती घेतलेला आहे तो माझ्याकडून चिरंतर सुरू राहील. त्यामुळे माझ्या संगमनेर विधानसभा उमेदवारीच्या काही बातम्या सुरू आहेत त्यांना मी आजच जाग्यावर पूर्णविराम देतो आहे.”

आपला, -ह.भ.प निवृत्ती महाराज इंदोरीकर

PHOTO : … म्हणून मुख्यमंत्र्यांनी इंदुरीकर महाराजांसमोर हात जोडले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संगमनेरमधील महाजनादेश यात्रेला उपस्थित राहून किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये एक लाख रुपयांचं योगदान दिलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी हात जोडून इंदुरीकर महाराजांचे आभार मानले.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...