AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तुला पाहून घेईन’ या वाक्याला धमकी मानता येणार नाही : हायकोर्ट

अहमदाबाद : तुमचा कुणाशी वाद झाला किंवा राग आला असेल तर तुम्ही काय म्हणता? सर्वसाधारणपणे अनेकांचं हेच उत्तर असतं की ‘तुला पाहून घेईन’. ही एखाद्याला धमकी वाटते तर कुणी आपापल्या पद्धतीने अर्थ लावतो. पण कुणी तुम्हाला असा इशारा दिला असेल तर घाबरु नका. कारण, या वाक्याला गुन्हेगारी धमकी मानण्यास गुजरात हायकोर्टाने नकार दिलाय. गुजरात हायकोर्टाने […]

'तुला पाहून घेईन' या वाक्याला धमकी मानता येणार नाही : हायकोर्ट
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM
Share

अहमदाबाद : तुमचा कुणाशी वाद झाला किंवा राग आला असेल तर तुम्ही काय म्हणता? सर्वसाधारणपणे अनेकांचं हेच उत्तर असतं की ‘तुला पाहून घेईन’. ही एखाद्याला धमकी वाटते तर कुणी आपापल्या पद्धतीने अर्थ लावतो. पण कुणी तुम्हाला असा इशारा दिला असेल तर घाबरु नका. कारण, या वाक्याला गुन्हेगारी धमकी मानण्यास गुजरात हायकोर्टाने नकार दिलाय. गुजरात हायकोर्टाने एका वकिलाविरोधात दाखल केलेल्या एफआयआरला अवैध ठरवत हा निर्णय दिला.

‘तुला पाहून घेईन’ हे वाक्य अनेकांच्या जिव्हारी लागतं आणि हे वाक्य बोलणाराविरोधात धमकी दिल्याचा गुन्हाही अनेकदा दाखल केला जातो. पण गुजरात हायकोर्टाच्या निर्णयामुळे आता ही धमकी ठरवली जाणार आहे. ‘तुला पाहून घेईन’ हे वाक्य धमकी असू शकत नाही. धमकी ती असते, ज्यामुळे पीडिताच्या मनात भीती निर्माण होईल. पण या प्रकरणात अशी कोणतीही घटना समोर आलेली नाही. या वाक्याला गुन्हेगारी धमकी समजली जाऊ शकत नाही, असं निरीक्षण नोंदवत कोर्टाने एफआयआर रद्द केला.

या प्रकरणातील वकील मोहसीन 2017 मध्ये तुरुंगात बंद असलेल्या त्यांच्या क्लाएंटला भेटायला गेले होते. पोलिसांनी वकिलांनी कैद्यासोबत भेट नाकारली. यावर दोन्ही बाजूने शाब्दिक वाद झाला. रागात असलेल्या वकिलाने तुम्हाला पाहून घेईन, अशी धमकी पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी वकिलाविरोधात सरकारी कामात अडथळा आणणे आणि कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्याला रोखल्याचा गुन्हा दाखल केला होता.

व्हिडीओ पाहा

Follow Us
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू...
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू....
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल.
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान.
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;.
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा...
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा....
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला.
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका...
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका....
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?.
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं...
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं....
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर..
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर...