अंजली दमानिया यांच्या आरोपांवर उद्याच उत्तर देणार: एकनाथ खडसे

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या दाव्यांवर बोलण्यास भाजपचे बंडखोर नेते एकनाथ खडसे यांनी बोलण्यास नकार दिला आहे. उद्याच त्यावर भाष्य करेल, असं विधान एकनाथ खडसे यांनी केलं आहे.

अंजली दमानिया यांच्या आरोपांवर उद्याच उत्तर देणार: एकनाथ खडसे
एकनाथ खडसे, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस

मुंबई: सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या दाव्यांवर बोलण्यास भाजपचे बंडखोर नेते एकनाथ खडसे यांनी बोलण्यास नकार दिला आहे. उद्याच त्यावर भाष्य करेल, असं विधान एकनाथ खडसे यांनी केलं आहे. (i will talk tomorrow on anjali damania allegation: eknath khadse)

भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर भाजपचे बंडखोर नेते एकनाथ खडसे आज पहिल्यांदाच मुंबईत आले. त्यांच्यासोबत पत्नी मंदाकिनी खडसे आणि कन्या रोहिणी खडसेही आहेत. उद्या शुक्रवारी दुपारी 2 वाजता त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे. पण खडसे मुंबईत येण्यापूर्वी अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेऊन खडसेंवर घणाघाती हल्ला केला होता. खडसे हे खूनशी नेते आहेत, असं सांगतानाच त्यांच्याविरोधातील विनयभंगाचा खटला अजूनही संपलेला नाही, असं त्या म्हणाल्या होत्या.

दमानिया यांच्या या दाव्यांबाबत खडसे यांना विचारले असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. आज काही बोलणार नाही. उद्याच त्यावर बोलेल, इतकंच खडसे म्हणाले. तर आज राष्ट्रवादी नेत्यांनी तुमच्याशी संपर्क केला होता का? या प्रश्नावरही त्यांनी बोलणं टाळलं.

काय म्हणाल्या होत्या दमानिया?

मला पीआयने सांगितलं तुमची सीडी लॅबमध्ये पाठवलेली आहे. या प्रकरणाचा तपास झालेला नाही आणि तुमच्याविरोधात आरोपपत्रही दाखल झालेलं नाही. त्यामुळे तुमचा विनयभंगाचा खटला अजून संपलेला नाही, असं मला अधिकाऱ्याने सांगितलं, असं सांगतानाच विनयभंगाच्या खटल्याबाबत खडसे धांदात खोटं बोलत आहेत, असा दावा दमानिया यांनी केला आहे.

खडसेंनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी माझ्याबद्दल अश्लील वक्तव्य केलं. वाट्टेल ते बोलले. त्यामुळे वाकोला पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात असं वक्तव्य शोभणारं नाही. त्यामुळे त्यांना धडा शिकवण्यासाठीच एफआयआर दाखल केला, असंही त्या म्हणाल्या. मी दाखल केलेल्या एफआयआरवर पुढे काहीही झालं नाही. त्याला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच कारणीभूत आहेत. याप्रकरणात फडणवीसांनी सोयीचं राजकारण केलं. कोणत्याही सामाजिक कार्यकर्त्यांबाबत राजकारणी असंच राजकारण करतात, असं त्या म्हणाल्या. खडसेंवरील विनयभंगाचा गुन्हा संपलेला नाही. तरीही कालही ते वृत्तवाहिन्यांवरून धांदात खोटे बोलले. त्यामुळे माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली, असा संतापही त्यांनी व्यक्त केला. (i will talk tomorrow on anjali damania allegation: eknath khadse)

संबंधित बातम्या:

खडसेंनी माझा सर्वाधिक छळ केला, माझं नाव घ्याल तर याद राखा, सोडणार नाही; दमानिया यांचा इशारा

आरोपपत्रच दाखल झालं नाही, मग विनयभंगाचा खटला संपला कसा?; दमानियांचा खडसेंना सवाल

(i will talk tomorrow on anjali damania allegation: eknath khadse)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI