जातीचं नाव काढेल त्याला ठोकून काढेन: नितीन गडकरी

जातीचं नाव काढेल त्याला ठोकून काढेन: नितीन गडकरी

पुणे: “मी जात पात काही पाळत नाही, जो जातीचं नाव काढेल त्याला मी ठोकून काढेन”, असा सज्जड दम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला. पिंपरी-चिंचवडमध्ये पुनरुत्थान समरस्ता गुरुकुलमतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

आपण जात पात काही पाळत नाही, तुमच्याइकडे किती चालते मला माहित नाही, मात्र, आमच्या इकडे जात बंद झाली आहे. मी सर्वांना सांगितलं आहे, जो जातीचं नाव काढेल त्याला मी ठोकून काढेन, असं गडकरी म्हणाले.

जातीचं नाव काढेल त्याला मी ठोकून काढेन, आमच्या पाच जिल्ह्यात जात काढत नाहीत. त्यामुळे जातीयवाद आणि संप्रदायिकतेपासून मुक्त आर्थिक आणि सामाजिक समता-एकता याच्या आधारावर संपूर्ण समाजाचं संघटन झालं पाहिजे, त्या समाजात कोणी गरीब-श्रीमंत असता कामा नये, कोणी छोट्या जातीचा मोठ्या जातीचा राहता कामा नये, संपूर्ण समाज एक एकात्म आणि अखंड असावा असं नितीन गडकरी म्हणाले.

पिंपरी-चिंचवडमध्ये काल पुनरुत्थान समरस्ता गुरुकुलमतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी गडकरी प्रमुख पाहुणे होते. यावेळी पिंपरीचे महापौर राहुल जाधव, आयुक्त श्रावण हर्डीकर, आमदार लक्ष्मण जगताप, गिरीश प्रभुणे, खासदार अनिल शिरोळे, माजी खासदार प्रदीप रावत, माधव भंडारी इत्याही उपस्थित होते.

‘पाण्यावर उतरवणारी विमानं हवीत’
रस्त्यांमुळं विरोधकांच्या स्तुतीस पात्र ठरलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी आता जल वाहतुकीवर भर दिला आहे. पाण्यावर उतरणारी विमानं आली पाहिजे यासाठी प्रयत्न करत असल्याचं गडकरींनी म्हटलं. पुण्याच्या एका उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते.

याशिवाय नद्यांच्या संवर्धनासाठी लवकरच पाऊल उचलणार असून पुढील मार्च महिन्यापर्यंत गंगेत ग्लास बुडवून पाणीही पिऊ शकता असं आश्वासन गडकरींनी यावेळी दिलं.


Published On - 11:38 am, Mon, 11 February 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI