गडचिरोली हल्ला : नक्षलवाद्यांना जवानांच्या खासगी गाडीची माहिती पुरवणारे गद्दार कोण?

गडचिरोली : गडचिरोलीतील कुरखेडा तालुक्यातील दादापूर मार्गावर नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवला. या स्फोटात 15 जवान आणि गाडीचा ड्रायव्हर शहीद झाला. याबाबत राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिलेली माहिती अतिशय धक्कादायक आहे. “नक्षलवादी पोलिसांच्या वाहनांना लक्ष्य करतात हे ध्यानात ठेवून, जवान खासगी वाहनातून जात होते. ही गाडी खासगी होती. या गाडीचा ड्रायव्हरही खासगी होता”, अशी माहिती […]

गडचिरोली हल्ला : नक्षलवाद्यांना जवानांच्या खासगी गाडीची माहिती पुरवणारे गद्दार कोण?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:56 PM

गडचिरोली : गडचिरोलीतील कुरखेडा तालुक्यातील दादापूर मार्गावर नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवला. या स्फोटात 15 जवान आणि गाडीचा ड्रायव्हर शहीद झाला. याबाबत राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिलेली माहिती अतिशय धक्कादायक आहे. “नक्षलवादी पोलिसांच्या वाहनांना लक्ष्य करतात हे ध्यानात ठेवून, जवान खासगी वाहनातून जात होते. ही गाडी खासगी होती. या गाडीचा ड्रायव्हरही खासगी होता”, अशी माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी टीव्ही 9 ला दिली.

शीघ्र कृतीदलाचे जवान होते. 15 जवान आणि 1 ड्रायव्हर होता. खासगी वाहन होतं. पोलिसांच्या गाड्यांवर हल्ला केला जातो, त्यामुळे खासगी वाहनातून प्रवास सुरु होता, त्यावेळी हा दुर्दैवी प्रकार झाला. एकदंरीत जो प्रकार घडला आहे, त्याची किंमत त्यांना चुकवावी लागेल, असं दीपक केसरकर म्हणाले.

गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार वाहन जर खासगी असेल, तर नक्षलवाद्यांनी नेमकं याच गाड्यांना कसं काय लक्ष्य केलं? त्यांना याबाबतची माहिती कशी मिळाली? नक्षलवाद्यांनी काल रात्रीच वाहने जाळली असताना, जवानांच्या मार्गावर काही खबरदारी का घेतली नाही? जवान खासगी वाहनातून जात असताना नक्षलींच्या कोणी खबऱ्याने याची माहिती पुरवली का?  असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.

भ्याड नक्षली हल्ला

गडचिरोलीतील कुरखेडा तालुक्यातील दादापूर मार्गावर नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवला. या स्फोटात 15 जवानांसह एक ड्रायव्हर शहीद झाले आहेत. पोलिसांच्या शीघ्र कृती दलावर नक्षलवाद्यांनी हा हल्ला केला. या हल्ल्यात 16 जवान शहीद झाले. सी 60 तुकडीचे हे सर्व जवान होते. गस्तीवर जाणाऱ्या जवानांना लक्ष्य करुन नक्षल्यांनी हा हल्ला केला. पोलिसांच्या नक्षलविरोधी पथकाच्या दोन गाड्यांवर नक्षलवाद्यांनी लक्ष्य केलं. आज महाराष्ट्र दिनी नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोट घडवून हा हल्ला केल्याचं सांगण्यात येत आहे. नक्षलवाद्यांनी काल रात्रीच रस्त्याचं काम सुरु असलेल्या ठिकाणी तब्बल 30 वाहने पेटवून दिली. त्यानंतर आज पुन्हा नक्षल्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून भीषण हल्ला केला.

हल्ला नेमका कुठे झाला?

गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील जांभूळखेडा आणि लेंढारी गावादरम्यान ही घटना घडली. लेंढारी गावाजवळ वळण आहे, या ठिकाणी भूसुरुंग घडवला. हा जंगलाचा भाग आहे. काल नक्षलवाद्यांनी ठेकेदारांची वाहने जाळली होती.  ही घटना पाहण्यासाठी, त्याच्या तपासासाठी  पोलिसांचं शीघ्र कृती दल जात होतं. त्यावेळी हा प्रकार घडला.

नक्षवाद्यांना माहित होत गाड्या जाळल्यानंतर तपासासाठी पोलीस येणार. त्यामुळे त्यांनी एकप्रकारे सापळा लावला होता, असं म्हटलं जात आहे.

संबंधित बातम्या 

गडचिरोलीत नलक्षलवाद्यांकडून भ्याड हल्ला, 16 जवान शहीद   

गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा धुमाकूळ, रस्ते करण्यासाठी आणलेली 30 वाहने पेटवली   

आधी गाड्या पेटवून ट्रॅप लावला, खासगी गाडीतून आलेले जवान नक्षलींच्या जाळ्यात अडकले!  

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.