BLOG : कोरोना विरोधातील युद्ध आणि सोशल मीडिया

कोरोनाच्या या संकटात बऱ्याच गोष्टी पहिल्यांदा घडत आहेत, त्यापैकीच एक म्हणजे कधी नव्हे ते लोकांनी स्वत:ला घरात लॉकडाऊन करुन घेतलं (increase use of Social media in lockdown) आहे

  • Updated On - 6:29 pm, Wed, 13 May 20 Edited By:
BLOG : कोरोना विरोधातील युद्ध आणि सोशल मीडिया
'माघ मेला'मध्ये टेक्नेलॉजीसह सोशल मीडियाचा वापर

कोरोनाच्या या संकटात बऱ्याच गोष्टी पहिल्यांदा घडत आहेत, त्यापैकीच एक म्हणजे कधी नव्हे ते लोकांनी स्वत:ला घरात लॉकडाऊन करुन घेतलं (increase use of Social media in lockdown) आहे, जी लोकं 12 ते 15 तास घराबाहेर रहायची, तिच लोकं गेली दीड महिना 24 तास घरात आहेत. लोकं घरात लॉकडाऊन असले, तरिही मानवाचा व्यक्त होण्याचा स्वभाव मात्र कायम आहे. लोकांना बाहेर पडता येत नाही, मित्रांसोबत गप्पा मारता येत नाही, यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांनी पर्याय शोधला (increase use of Social media in lockdown) आहे. मित्रांशी चाटिंग करणे, सामाजिक, धार्मिक, सरकार, सत्ता, प्रशासन, देश… अशा संपूर्ण विषयावर सोशल मीडियावर चर्चेचा फड रंगतोय आणि या कोरोनाच्या संकटाच्या काळातंही लोक याच सोशल मिडियाच्या माध्यमातून एक दुसऱ्याला धिर देताना आल्याला दिसत आहेत. या असह्य होणाऱ्या लॉकडाऊनच्या काळात, कोरोना व्हायरसच्या भीतीखाली सोशल मीडियाने संपूर्ण देशमनाला सकारात्मक ऊर्जा दिल्याची अनेक उदाहरणं समाजात पहायला मिळतात. लॉकडाऊनच्या काळात सोशल मीडियाने सार्वजनिक भावनांचा उद्रेक होऊ दिला नाही, कोरोनाच्या या जागतिक संकटात सोशल मीडियाने वैश्विक स्तरावर पुन्हा एकदा, सामाजिक एकीकरणाची बाजू प्रखरपणे मांडली.

कोरोनाविरुद्धच्या युद्धात सोशल मीडियाचं हत्यार…

जगभरात कोरोनाचं संकट आहे, आपल्या देशानंही कोरोना व्हायरस विरोधातील हे युद्ध जिंकण्याचा निर्धार केला आहे. पण हे युद्ध शस्त्राने जिंकता येत नाही, तर जनजागृती हेच कोरोनाविरुद्धचं युद्ध जिंकण्याचा कानमंत्र आहे. कोरोनाला हरवण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग, सॅनीटायझरचा वापर करणे, हात साबनाने कमीत कमी 20 सेकंद स्वच्छ धुणे. सोशल मीडियावर अशा प्रकारच्या जनजागृतीची मोहिम सुरु आहे. समाजातले अनेक प्रतिष्ठीत लोकं, नेते, अभितेने, याच सोशल मीडियाच्या आधार घेवून आप आपले संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. शिवाय आपलं सरकार, आरोग्य विभाग आणि पोलीसंही कोरोना विरुद्धच्या या युद्धात सोशल मीडियाचा वापर करत आहेत. यात बऱ्यापैकी यश येतानाही दिसत आहे. त्यामुळे कोरोना विरुद्धच्या या युद्धात सोशल मीडियाचं योगदान कधिच न विसरण्यासारखं आहे.

सोशल मीडियावरील राजकीय संवाद वाढले….

कोरोना हा संसर्गजन्य आजार आहे, एका व्यक्तीपासून तो आज दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचतो. त्यामुळे कोरोनाच्या या संकटात राजकीय नेते मंडळींनी समाजाशी संवाद करणाऱ्या पारंपारीक साधनांना फाटा दिला आहे. बरेच नेते मंडळी फेसबूक लाईव्ह करत लोकांशी जनतेशी संवाद साधत आहेत. नेत्यांच्या सभा बंद झाल्या, फेसबूक सारख्या सोशल मीडियावर नेते मंडळींची भाषणं आजंही सुरु आहेत. पूर्वी मैदानात रंगणाऱ्या नेते मंडळींच्या सभा आता सोशल मीडियावर रंगू लागल्या आहेत. देशातील राज्यकर्ते पूर्वी प्रेस कॉनफरंस घेवून माध्यमांशी थेट संवाद साधायचे, पण आता कोरोनाच्या या संकटात तेही जनतेशी संवाद साधण्यासाठी फेसबूक लाईव्हची मदत घेत आहेत.

सोशल मिडीयावरुन शिक्षणाला चालना….

कोरोनाच्या या संकटात लॉकडाऊनमुळे लोक आप आपल्या घरात लॉकडाऊन झाले आहेत. यामुळे कॉलेज आणि क्लासेस बंद आहेत. विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान होत आहे. यावर पर्याय म्हणून आता सोशल मिडीयावर ऑनलाईन क्लासेसला चालना मिळू लागली आहे. कोरोनाच्या या संकटात वर्गात जावून शिकणं शक्य नाही, पण आता सोशल मीडियाच्या मदतीनं ऑनलाईन क्लासेसकडे लोक वळायला लागले आहेत.

घरात लॉकडाऊन असलेले लोक आपलं पारंपरिक ज्ञान सोशल मीडियाच्या माध्यमातून जगापर्यंत पोहोचवत आहेत. योगासने, पाककृती, कलाकुसर, व्यायाम, सजावट आणि गाणे – संगीताची मैफील आता सोशल मिडीयावर रंगायला लागली आहेत.

सोशल मिडीयावर कोरोना योध्यांचा सन्मान….

कोरोनाच्या या युद्धात डॉक्टर्स, इतर आरोग्य कर्मचारी, पोलीस, स्वच्छता कर्मचारी हे खरे कोरोना योध्ये आहेत. रोज लोकं या कोरोना योद्ध्यांबाबत सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करतात, या सर्व सोशल योद्ध्यांचं तोंडभरुन कौतुक केलं जातं. त्य़ामुळेच कधीकाळी पोलिसांवर टीका करणारेही आता पोलिसांच्या कार्याला सलाम करत आहेत. कोरोनाच्या या युद्धात कोरोना योद्ध्यांचं काम, त्यांचा त्य़ाग समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडीयाचं मोठं योगदान आहे. त्यामुळेच कधी नव्हे ते आता कोरोना रुग्णांची सेवा करुन घरी जाणाऱ्या परिचारीकांचा सन्मान होतोय, त्यांच्यावर फुलांचा वर्षावर होतोय. हे समाजमन बदलण्यात सोशल मीडियाचा मोठा वाटा आहे.

लॉकडाऊनमध्ये नैराश्य दूर करण्यास मदत…

कोरोनाच्या या महामारीत संपूर्ण जगात नकारात्मक भावना बळावत आहेत. कोरोनाच्या भीतीनं आत्महत्या केल्याच्या घटनाही देशात घडल्या आहेत. कोरोनाच्या या संकटात निर्माण झालेली भीती, नैराश्य, अस्थिरता दूर सारत, सोशल मीडियावरील जनजागृतीमुळे जनसामान्यांचे मानसिक स्वास्थ्य मजबूत ठेवण्याचे प्रयत्न केले आहेत. इतक्या विपरीत काळात सुद्धा लोकांचा सामाजिक, पारिवारिक एकोपा अजून पक्का होत आहे.

सोशल मीडियावरील संवाद वाढला….

जी कोलं सोशल मीडियाला नावं ठेवायची, तिच लोकं लॉकडाऊनच्या काळात सोशल मीडियाचा आधार घेताना दिसत आहे. 15 ते 20 तास घराबाहेर राहणारी लोकं, लॉकडाऊनच्या सुरुवातीला काहीशी अस्वस्थ होती, पण आता तिच लोकं कोरोनाच्या या लढ्यात सहभागी होताना दिसत आहे. लॉ़कडाऊनमुळे दोन परिवार किंवा नातेवाईक एकत्र येवू शकत नाही. पण या काळात त्यांचा सोशल मीडियावरील संवाद वाढला आहे. सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे मुलांना रागावणारे आई-वडीलंही आता व्हॉट्सअॅप किंवा फेसबूकवर सक्रीय झालेले पहायला मिळाले. सोशल मीडियाच्या सकारात्मक वापराचा विरोध करीत, यावर बंदीची भाषा बोलणारेही या संकटाच्या काळात सोशल मीडियावरुन

समाज जागृतीचं काम करताना दिसत आहेत.

कोरोनाचं संकट संपूर्ण जगावर आहे, येत्या काळात आपला देश हे कोरोना विरुद्ध छेडलेलं हे युद्ध नक्की जिंकेल, आणि पूर्वीचे दिवस पुन्हा परत येतील. पण जेव्हा कधी कोरोना व्हायरस विरोधातील युद्धाची इतिहासात नोंद होईल, त्यात जनगाजृतीसाठी सोशल मीडियाचं योगदान, कधीही न विसरण्यासारखं

(टीप – लेखातील मतं लेखकाची वैयक्तिक मतं आहेत)