AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sydney Test : भारतीय खेळाडूंवर वर्णद्वेषी टीका, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा माफीनामा

सिडनी कसोटीच्या चौथ्या दिवशीदेखील काही ऑस्ट्रेलियन समर्थकांनी मोहम्मद सिराजवर वर्णद्वेषी टीका केली.

Sydney Test : भारतीय खेळाडूंवर वर्णद्वेषी टीका, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा माफीनामा
| Updated on: Jan 10, 2021 | 2:04 PM
Share

सिडनी : ऑस्ट्रेलियातील सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडियात (Aus vs Ind 3rd Test) तिसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यादरम्यान शनिवारी आणि रविवारी (सामन्याच्या तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी) भारतीय खेळाडू मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह दोघांवर काही ऑस्ट्रेलियन चाहत्यांनी वर्णद्वेषी टीका केली. याप्रकरणी सुरक्षारक्षकांनी 6 प्रेक्षकांची स्टेडियममधून हकालपट्टी केली आहे. दरम्यान, अशी माहिती मिळाली आहे की, सर्व आरोपींची स्डेटियमधील सुरक्षा अधिकारी आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या (CA) अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरु आहे. तसेच लागोपाठ दोन दिवसांपासून सुरु असलेल्या या प्रकाराबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (Cricket Australia) एक निवेदन जारी केले आहे. त्यात त्यांनी भारतीय खेळाडूंची माफी मागितली आहे. त्याचबरोबर भारतीय संघाला आश्वासन देण्यात आले आहे की, या प्रकरणात त्वरित कारवाई केली जाईल. (Ind vs Aus : CA Apologise to Indian Team For Alleged Racism Incident At SCG)

साधारणपणे ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील सामन्यात खेळाडू एकमेकांना डिवचतात. यामध्ये काहीवेळा हे खेळाडू शिवीगाळही करतात. मात्र आता क्रिकेट सामना पाहायला आलेल्या चाहत्यांकडून शिवीगाळ तसेच वर्णद्वेषी टीका (Racial Abuse) करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या समर्थकांनी टीम इंडियाचे गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) या दोघांना काल (शनिवारी – सामन्याच्या तिसऱ्या दिवशी) शिव्या दिल्या असल्याचं प्रकरण समोर आलं होतं. या सर्व प्रकरणाबाबत टीम इंडियाकडून सामनाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणात आयसीसीने लक्ष घातलं असून कारवाई केली जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. परंतु त्याचा काहीही परिणाम झाला नाही. कारण आज सामन्याच्या चौथ्या दिवशीदेखील काही ऑस्ट्रेलियन समर्थकांनी मोहम्मद सिराजवर वर्णद्वेषी टीका केली.

सिराजवर आज पुन्हा वर्णद्वेषी टीका झाल्यानंतर कप्तान अजिंक्य रहाणे शांत बसला नाही. सिराजने तक्रार करताच कर्णधार रहाणेने याबाबतची पंचांकडे तक्रर केलीच सोबतच सामनादेखील थांबवला. कर्णधार रहाणेने घेतलेल्या भूमिकेनंतर पंच आणि पोलिसांना या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला. पंचांनी पोलिसांच्या मदतीने सिराजवर टीका करणाऱ्या प्रेक्षकांची स्टेडियममधून हकालपट्टी केली.

कप्तान रहाणेने सामना रोखला

जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) दुसऱ्या सत्रात शेवटचं षटक टाकण्यास सुरुवात करत होता. त्यादरम्यान सिराज सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करत होता. त्यावेळी सिराजच्या मागे स्टेडियममध्ये बसलेल्या प्रेक्षकांनी सिराजवर कमेंट्स करणं सरु केलं. तेव्हा कप्तान रहाणेने बुमराहला गोलंदाजी करण्यापासून रोखले. त्यानंतर रहाणेने सिराजशी बातचित केली आणि थेट पंचांना गाठून त्यांच्याकडे तक्रार केली. यादरम्यान संपूर्ण भारतीय संघ खेळपट्टीजवळ एकत्र जमला. त्यानंतर पंचांनी आणि पोलिसांनी स्टँडमध्ये जाऊन संबंधित प्रेक्षकांना स्टेडियमधून बाहेर जाण्यास सांगितले. यादरम्यान भारतीय टीमच्या ड्रेसिंग रुममध्येदेखील नाराजी दिसत होती. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीदेखील टीम सिक्युरिटीशी बातचित केली.

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी काय घडलं होतं?

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, एक क्रिकेट चाहता हा सामना पाहायला आलेला. हा चाहता दारु पिऊन आला होता. या मद्यधुंद चाहत्याने शिवीगाळ केली. या चाहत्याने मोहम्मद सिराजला माकड म्हटल्याची माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली. तसेच बुमराह आणि सिराजला शिवीगाळ केल्याचं प्रकारही समोर आला. या सर्व प्रकारानंतर टीम इंडियाने सामनाधिकारी डेव्ही बून यांच्याकडे तक्रार करण्यात आली. या सर्व प्रकारानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे आणि अश्विनसह इतर खेळाडूंनी फिल्ड अंपायर यांच्याशी चर्चा केली. यामध्ये शिवीगाळ केल्याचं सांगितले गेलं. यानंतर अंपायर आणि संबंधित यंत्रणेने बुमराह आणि सिराजसोबत चर्चा केली. तसेच टीम इंडियाच्या सिक्युरिटी संबंधित अधिकाऱ्यांनी मैदानातील सुरक्षा कर्मियांना याबाबत विचारणा केली. यावेळेस आयसीसीचे सुरक्षाधिकारीही उपस्थित होते. दरम्यान हा सर्व प्रकार आयसीसीपर्यंत पोहचला आहे.

पाहा नेमकं काय झालं

हेही वाचा

मोहम्मद शमी, उमेश यादव, केएल राहुल आणि रवींद्र जाडेजा जायबंदी, कसोटी की दुखापतीची मालिका?

रवींद्र जाडेजाची चपळाई टीम इंडियाच्याच अंगाशी, 13 वेळा साथीदार रनआऊट

(Ind vs Aus : CA Apologise to Indian Team For Alleged Racism Incident At SCG)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.