Col. Santosh Babu | एकुलत्या एक पुत्राने देशासाठी प्राणार्पण केल्याचा अभिमान, धीरोदात्त वीरमातेची प्रतिक्रिया

शहीद कर्नल बिक्कुमल्ला संतोष बाबू यांची हैदराबादमध्ये पोस्टिंग झाल्याची ऑर्डर 3 महिन्यांपूर्वीच हाती आली होती. मात्र लॉकडाऊन व चीनसोबत असलेल्या तणावामुळे पोस्टिंग लांबली होती (India China Face off Martyr Col Santosh Babu Mother Reaction)

Col. Santosh Babu | एकुलत्या एक पुत्राने देशासाठी प्राणार्पण केल्याचा अभिमान, धीरोदात्त वीरमातेची प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: Jun 17, 2020 | 9:21 AM

नवी दिल्ली : एकुलता एक मुलगा गमावल्याचे दुःख आहे, मात्र त्याने देशासाठी प्राणार्पण केले, याचा अभिमान असल्याची प्रतिक्रिया चीनी सैन्यासोबत झालेल्या संघर्षात धारातीर्थी पडलेल्या शहीद कर्नल बिक्कुमल्ला संतोष बाबू यांच्या मातोश्रींनी दिली. (India China Face off Martyr Col Santosh Babu Mother Reaction)

शहीद कर्नल संतोष यांच्या आई मंजुळा या दुःखद वृत्तालाही मोठ्या धीराने सामोऱ्या गेल्या. “आता तो मला अम्मा म्हणून हाक मारणार नाही. एकुलता एक मुलगा गमावल्याचे दुःख आहे. पण देशासाठी त्याने आपल्या प्राणाचे बलिदान दिले, याचा मला अभिमान आहे” असं त्या म्हणाल्या.

शहीद कर्नल बिक्कुमल्ला संतोष बाबू यांची हैदराबादमध्ये पोस्टिंग झाल्याची ऑर्डर 3 महिन्यांपूर्वीच हाती आली होती. मात्र लॉकडाऊन व चीनसोबत असलेल्या तणावामुळे पोस्टिंग लांबली होती. त्यांची पत्नी, मुलगा आणि मुलगी कित्येक दिवसांपासून वडिलांच्या प्रतीक्षेत होते, मात्र दुर्दैवाने त्यांच्या हौतात्म्याचे वृत्त धडकले.

(India China Face off Martyr Col Santosh Babu Mother Reaction)

हेही वाचा : भारत-चीन संघर्ष वाढला, भारतापुढे आता कोणते मार्ग?

चीनी सैन्यासोबत गलवानच्या खोऱ्यात झालेल्या धुमश्चक्रीत भारताचे 20 जवान शहीद झाल्याचे दु:खद वृत्त आहे. शहीदांची संख्या वाढण्याची भीतीही वर्तवली जात आहे. संघर्षात चीनचेही 43 सैनिक मृत किंवा जखमी झाल्याची माहिती आहे. गलवान खोरं हे भारत-चीन सीमेवरील लडाख सीमेजवळचा भाग आहे. हे खोरे चीनच्या दक्षिण शिनजियांग ते भारताच्या लडाखपर्यंत पसरलेले आहे

भारतीय सैन्याने अधिकृत निवेदन जारी केल्यानंतर तासाभरातच चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी पत्रकार परिषद घेतली. सीमेवर दोन देशांच्या सैनिकांमधील चकमकीची सर्व जबाबदारी झाओ यांनी भारतावर टाकली. हे भारताचे प्रक्षोभक कृत्य असल्याचा कांगावाही चीनने केला. ‘भारताने सीमा ओलांडू नये किंवा परिस्थिती आणखी बिघडू शकेल असे एकतर्फी पाऊल उचलू नये’ अशी दर्पोक्तीही त्यांनी केली

संबंधित बातम्या :

Galwan Valley conflict | भारत-चीनमध्ये गलवान खोऱ्यांवरुन नेमका तणाव काय?

India-China Territory Dispute | भारत-चीन नेमका सीमा-वाद काय?

(India China Face off Martyr Col Santosh Babu Mother Reaction)

Non Stop LIVE Update
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.