अटी-बिटी काही नाही, पायलटला सोडा, अन्यथा खैर नाही, भारताने पाकला ठणकावलं!

नवी दिल्ली : भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तानने तातडीने सोडावं, कोणत्याही अटी-बिटी मानणार नाही, अन्यथा तुमची खैर नाही, असा सज्जड दम भारताने पाकिस्तानला दिला आहे. भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे सध्या पाकिस्तानच्या ताब्यात आहेत. “भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना लगेच परत येण्याची अपेक्षा आहे. कोणत्याही व्यवहाराचा कोणताही प्रश्न नाही. जर पाकिस्तानला […]

अटी-बिटी काही नाही, पायलटला सोडा, अन्यथा खैर नाही, भारताने पाकला ठणकावलं!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM

नवी दिल्ली : भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तानने तातडीने सोडावं, कोणत्याही अटी-बिटी मानणार नाही, अन्यथा तुमची खैर नाही, असा सज्जड दम भारताने पाकिस्तानला दिला आहे. भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे सध्या पाकिस्तानच्या ताब्यात आहेत.

“भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना लगेच परत येण्याची अपेक्षा आहे. कोणत्याही व्यवहाराचा कोणताही प्रश्न नाही. जर पाकिस्तानला असे वाटते की त्यांच्याशी वाटाघाटी करण्यासाठी अभिनंदनचा वापर होईल, तर ते चुकीचे आहे. विंग कमांडर अभिनंदन यांना मानवी पद्धतीने वागवावे अशी भारताची अपेक्षा.”, असा थेट इशारा भारताने पाकिस्तानला दिला आहे.

तसेच, पायलटच्या सुटकेसाठी अटी-बिटी काही मानणार नाही, असेही भारताने पाकिस्तानला ठणकावून सांगितले आहे.

“भारताने कोणत्याही सैनिकाला किंवा नागरिकाला टार्गेट केलेलं नाही. पण पाकिस्ताने मात्र भारताच्या लष्कराला टार्गेट केलं आहे. भारताने LOC ओलांडली नाही. भारत LOC चं उल्लंघन करणार नाही.” असेही यावेळी भारताकडून स्पष्ट करण्यात आले.

विंग कमांडर अभिनंदन वर्धमान पाकिस्तानच्या ताब्यात

भारत आणि पाकिस्तानच्या वायूसेनेत जम्मू काश्मीरमध्ये सीमेवर संघर्ष पाहायला मिळाला. भारताने एअर स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तानने बदला घ्यायचा म्हणून भारतीय सीमेत घुसून बॉम्बने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात पाकिस्तानने भारतीय विमान पाडल्याचं बोललं जातंय. शिवाय दोन पायलट आमच्या ताब्यात असल्याचा दावाही पाकिस्तानने केला. पण काही वेळातच दोन नसून एकच पायलट आमच्याकडे असल्याचा यू टर्न पाकिस्तानने घेतला. विशेष म्हणजे आमचा एक पायलट बेपत्ता असल्याची कबुली भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या पायलटचं नाव विंग कमांडर अभिनंदन वर्धमान असं आहे. त्यांच्याबाबत अजून भारतीय वायूसेनेकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण पाकिस्तानने जो व्हिडीओ रिलीज केलाय, त्यात अभिनंदन यांनी स्वतःबद्दल सांगितलं आहे. पाकिस्तानकडून दिवसभरात दुसरा व्हिडीओ रिलीज करण्यात आलाय.

कोण आहेत अभिनंदन वर्धमान?

अभिनंदन हे भारतीय वायूसेनेत विंग कमांडर आहेत. बुधवारी ते मिग 21 हे विमान घेऊन उड्डाण घेतलं, पण पाकिस्तानने हे विमान पाडलं. अभिनंदन यांनी स्वतःची सुटका तर केली, पण ते खाली पडलेल्या अवस्थेत असताना त्यांना पाकिस्तानी रेंजर्सने अटक केली. स्थानिकांकडून अभिनंदन यांना मारहाणही करण्यात आली.

पाकिस्तानने सकाळी जो व्हिडीओ रिलाज केला, त्यात अभिनंदन यांच्या चेहऱ्यावर रक्त दिसत होतं. पण दुसऱ्या व्हिडीओमध्ये ते चहा पिताना दिसत आहेत. शिवाय मी सुरक्षित असल्याचंही त्यांनी सांगितलंय. अभिनंदन आपण दक्षिण भारतीय असल्याचं सांगत आहेत. शिवाय लग्न झालेलं आहे का असं विचारल्यानंतर त्यांनी हो उत्तर दिलं.

अभिनंदन यांना देशसेवेचं बाळकडू घरातून मिळालंय. त्यांचे वडीलही भारतीय वायूसेनेतच होते. अभिनंदन हे 2004 मध्ये वायूसेनेत दाखल झाले. अभिनंदन यांना अटक केल्याची माहिती समोर येताच भारतात त्यांच्या सुटकेसाठी प्रार्थना करण्यात येत आहे. सोशल मीडियावर अभिनंदन यांना परत आणा म्हणून मोहिम राबवण्यात आली.

भारताकडूनही अभिनंदन यांच्या सुटकेची मागणी

पाकिस्तानच्या दिल्लीतील उच्चायुक्तांना भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून समन्स बजावण्यात आलं होतं. या बैठकीत भारताकडून पाकिस्तानला स्पष्ट शब्दात इशारा देण्यात आलाय. भारतीय विंग कमांडरला आमच्या ताब्यात देण्यात यावं, त्यांच्या केसालाही धक्का लागता कामा नये, असा इशाराही भारताने दिल्याची माहिती आहे. त्यामुळे भारतीय पायलटला सोडवण्यासाठी केंद्र सरकारनेही आता दबाव टाकणं सुरु केलं आहे.

संबंधित बातमी :

वडिलांचीही वायूसेनेतच सेवा, कोण आहेत विंग कमांडर अभिनंदन?

मी सुखरुप आहे, पाकिस्तानकडून विंग कमांडर अभिनंदन यांचा दुसरा व्हिडीओ जारी

पाकिस्तान बेपत्ता पायलटच्या केसालाही धक्का लावू शकत नाही

पाकिस्तानने भारतीय पायलटला पकडल्याचा दावा खरा? चिंता वाढली

भारतीय विंग कमांडरला अटक केल्याचा दावा, पाकिस्तानकडून व्हिडीओ जारी

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.