वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी इंदोरीकर महाराजांना तात्पुरता दिलासा

इंदोरीकर महाराजांना अहमदनगर जिल्हा न्यायालयाने आज (7 ऑगस्ट) काहीसा दिलासा दिला आहे (Indorikar maharaj get releif from sangamner court).

वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी इंदोरीकर महाराजांना तात्पुरता दिलासा
Follow us
| Updated on: Aug 07, 2020 | 3:08 PM

अहमदनगर : प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती इंदोरीकर महाराजांना अहमदनगर जिल्हा न्यायालयाने आज (7 ऑगस्ट) काहीसा दिलासा दिला आहे (Indorikar maharaj get releif from sangamner court). संगमनेर प्रथमवर्ग न्यायालयाने इंदोरीकर महाराजांना आज हजर राहण्याचा आदेश दिला होता. या आदेशाला जिल्हा न्यायालयाने स्थगिती दिली आहे. आता इंदोरीकर महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणाची 20 ऑगस्ट रोजी संगमनेर येथील जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे (Indorikar maharaj get releif from sangamner court).

मुला-मुलीच्या जन्माविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर प्रसिद्ध किर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्याविरोधात 26 जून रोजी संगमनेर प्रथमवर्ग न्यायालयात गुन्हा दाखल झाला होता. न्यायालयाने इंदोरीकर महाराजांना हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यापुर्वीच 4 ऑगस्ट रोजी इंदोरीकर महाराजांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली. त्यात जिल्हा न्यायालयाने हजर राहण्याच्या आदेशाला स्थगिती दिल्याने इंदोरीकरांना दिलासा मिळाला आहे.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

याप्रकरणी पुढील सुनावणी 20 ऑगस्ट रोजी संगमनेर येथील जिल्हा न्यायालयात होणार आहे. सरकारी वकील आणि इंदोरीकर महाराजांचे वकील त्यांची बाजू मांडणार आहेत. इंदोरीकर महाराजांना 20 ऑगस्ट रोजी सुनावणीदरम्यान न्यायालयात हजर राहण्याची गरज असणार नाही.

दरम्यान, सत्र न्यायायालयाच्या स्थिगीती आदेशावर तक्रारदार रंजना गवांदे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. “आमचा लढा कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून कायदेशीर लढा आहे. सरकारी पक्षाकडे आम्ही आवश्यक ते पुरावे सादर केले आहेत. सरकार पक्ष आपली बाजू 20 ऑगस्टला न्यायालयात मांडेल”, असं गवांदे यांनी सांगितलं.

काय आहे प्रकरण?

“स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग अशीव वेळी झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होते” असं वादग्रस्त वक्तव्य महाराज इंदोरीकर यांनी केले होते. लिंग भेदभाव करणाऱ्या या वक्तव्यानंतर जिल्हा आरोग्य विभागाने इंदोरीकर महाराजांना पीसीपीएनडीटी कायद्यानुसार नोटीस बजावत स्पष्टीकरण मागितलं होतं. यावर दिलेल्या कालावधीच्या अखेरच्या दिवशी इंदोरीकरांनी आपल्या वकिलामार्फत उत्तर देत खुलासा केला होता.

इंदोरीकर महाराज यांचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. काही सामाजिक संघटना आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीने इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली होती

इंदोरीकर महाराज यांनी हे वक्तव्य कुठे आणि कधी केले, याबाबत कुठलाही पुरावा नसल्याचं कारण देत मार्च महिन्यात अहमदनगर जिल्हा प्रशासनाने गुन्हा दाखल केला नव्हता. मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या रंजना गवांदे यांनी याबाबत पाठपुरावा करुन या प्रकरणाचे पुरावे जिल्हा आरोग्य विभागाला दिले. त्यानंतर 26 जून रोजी संगमनेर कोर्टात जिल्हा आरोग्य प्रशासनाने इंदोरीकर महाराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. संगमनेर कोर्टाने इंदोरीकर महाराज यांना समन्स बजावले असून आज कोर्टात हजर राहण्याचा आदेश दिलेला आहे.

फेब्रुवारी महिन्यात हा वाद समोर आल्यानंतर वारकरी तसेच इंदोरीकर समर्थकांनी ‘अकोले बंद’ची हाक देत आंदोलन केले होते. कोर्टात गुन्हा दाखल झाल्यानंतर मनसेचे नेते अभिजीत पानसे, भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील, भाजप अध्यात्मिक सेलचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी इंदोरीकर यांची भेट देत समर्थन दिले होते. तर अकोलेचे माजी आमदार वैभव पिचड यांनी देखील तहसिलदारांना निवेदन दिले होते.

संबंधित बातम्या

माझे सध्या वाईट दिवस, चांगलं काम करताना एवढा त्रास होतो : इंदुरीकर महाराज  

राज्य सरकारच्या अकलेची कीव, भाजप आमदाराचा इंदुरीकर महाराजांना पाठिंबा 

आमचं घरच बसल्यासारखं झालं, मुलं शाळेत जाईनात, आख्खं घर आऊट झालं, इंदुरीकर महाराज उद्विग्न  

आता आपली कपॅसिटी संपली, उद्या-परवाचं बघून फेटा ठेवणार, शेती करणार : इंदुरीकर महाराज

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.