सर्जिकल स्ट्राईकची इन्साईड स्टोरी, ऐका मोदींच्याच तोंडून

नवी दिल्ली : सर्जिकल स्ट्राईक ही एक मोठी रिस्क होती, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. नव्या वर्षात पहिल्यांदाच दिलेल्या मुलाखतीत मोदींनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय. राम मंदिर हे घटनेनुसारच तयार होईल. न्याय प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय अध्यादेश येणार नाही, असं मोदींनी स्पष्ट केलंय. वृत्तसंस्था एएनआयला मोदींनी ही मुलाखत दिली आहे. उरी हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईकचा निर्णय […]

सर्जिकल स्ट्राईकची इन्साईड स्टोरी, ऐका मोदींच्याच तोंडून
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:46 PM

नवी दिल्ली : सर्जिकल स्ट्राईक ही एक मोठी रिस्क होती, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. नव्या वर्षात पहिल्यांदाच दिलेल्या मुलाखतीत मोदींनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय. राम मंदिर हे घटनेनुसारच तयार होईल. न्याय प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय अध्यादेश येणार नाही, असं मोदींनी स्पष्ट केलंय. वृत्तसंस्था एएनआयला मोदींनी ही मुलाखत दिली आहे.

उरी हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईकचा निर्णय कसा घेतला याबद्दल सर्व माहिती मोदींनी दिली. यावरुन जे राजकारण करण्यात आलं, तेही दुर्दैवी असल्याचं मोदी म्हणाले. “सर्जिकल स्ट्राईकची माहिती सर्वात अगोदर सैन्याने दिली, एकही मंत्री यावर बोलला नाही. पण त्याच दिवशी राजकीय पक्षाच्या काही नेत्यांनी सर्जिकल स्ट्राईकवर आक्षेप घेतला, जो आरोप पाकिस्तानने केला, त्याला आपलेच लोक समर्थन देत होते”, असं मोदी म्हणाले.

उरी हल्ल्यात जवान मारण्यात आले, त्याने अस्वस्थ केलं, माझ्या वैयक्तिक रागाचा व्यवस्थेवर परिणाम होऊ नये याचीही काळजी घेत होतो, माझ्यापेक्षा जास्त रोष सैन्यामध्ये होता, शहिदांना न्याय देण्याची त्यांची इच्छा होती, यानंतर सैन्याला फ्री हँड दिले, अशी माहिती मोदींनी दिली.

सैन्य आपल्या शब्दावर जीव पणाला लावतात, सर्जिकल स्ट्राईकवर नियोजन केलं, स्पेशल ट्रेनिंग दिली, मी स्वतः लक्ष ठेवलं. कारण, हा सर्व अनुभव माझ्यासाठीही नवीन होता. दोन वेळा तारखा बदलल्या. सर्व तयारीनंतर तारीख निश्चित केली, सूर्योदयापूर्वी आपले लोक परत येतील हे ठरलं, यश मिळो किंवा अपयश, सूर्योदयापूर्वी परत या स्पष्ट आदेश दिला. सूर्योदय होऊनही काही माहिती मिळत नसल्याने अस्वस्थ झालो, एक तासानंतर बातमी आली की सैन्य आपल्या सीमेत आलेलं नाही, पण सेफ झोनमध्ये आहोत, तरीही अखेरचा व्यक्ती येईपर्यंत मला माहिती द्या असं सांगितलं, असं मोदी म्हणाले.

हे सर्व झाल्यानंतर सर्जिकल स्ट्राईकची माहिती पाकिस्तानलाही दिली, हा क्षण माझ्यासाठीही महत्त्वाचा होता, या घटनेने सैन्याच्या शक्तीचा नवा परिचय झाला. आपल्या सैन्याची शक्ती अद्भुत असल्याचं मोदी म्हणाले.

संपूर्ण मुलाखत :

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.