Jacqueline Fernandez | दसऱ्याच्या निमित्ताने जॅकलिनकडून ‘या’ खास व्यक्तीला कार भेट!

नुकताच दसऱ्याचा मुहूर्त साधत तिने तिच्या स्टाफ मेंबरला चक्क कार भेट दिली आहे.

Jacqueline Fernandez | दसऱ्याच्या निमित्ताने जॅकलिनकडून ‘या’ खास व्यक्तीला कार भेट!
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसनं तिच्या स्टाफ मेंबरला दसऱ्यासाठी एक नवीन कार गिफ्ट केली आहे.

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) तिच्या दिलदार स्वभावामुळे संपूर्ण मनोरंजन विश्वात प्रसिद्ध आहे. ती नेहमीच आपल्या खास आणि जवळच्या व्यक्तींना काहीना काही भेटवस्तू देत असते. तिच्या या स्वभावामुळे चाहत्यांमध्येदेखील ती प्रसिद्ध आहे. नुकताच दसऱ्याचा मुहूर्त साधत तिने तिच्या स्टाफ मेंबरला चक्क कार भेट दिली आहे. तिने सोशल मीडियावर ही खास पोस्ट शेअर केली आहे.(Jacqueline Fernandez gifts a car to her staff member)

जॅकलिनच्या या गिफ्टने तिचा स्टाफ मेंबर प्रचंड खुश झाला आहे. तिने शेअर केलेल्या व्हिडीओत जॅकलिन या कारची पूजा करून, स्टाफ मेंबरला नवीन कारची किल्ली देताना दिसली. जॅकलिनचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात ती ट्रॅफिक पोलिसांच्या पोशाखात दिसत आहे. स्वतः पूजा करून, ती तिच्या स्टाफलाही नवीन कारची पूजा करण्यास सांगते.

दसऱ्याचे निमित्त साधत तिने स्टाफमध्ये हा ‘आनंद’ वाटला आहे. जॅकलिन बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होती, तेव्हापासून हा स्टाफ मेंबर तिच्यासोबत आहे. या कारची डिलिव्हरी थेट जॅकलीनचे चित्रीकरण सुरू असलेल्या सेटवर देण्यात आली आहे. या दरम्यान ती पोलीसच्या वेशात दिसली आहे. यावरून चाहत्यांनी तिच्या नव्या प्रोजेक्टचा अंदाज बांधला आहे. याआधीही जॅकलिनने तिच्या मेकअप मनला कार गिफ्ट दिली होती. (Jacqueline Fernandez gifts a car to her staff member)

आगमी प्रोजेक्टमध्ये व्यस्त

लॉकडाऊन काळात जॅकलिन बॉलिवूडचा दबंग अर्थात सलमान खानसह त्याच्या पनवेलच्या फार्महाऊसवर राहत होती. या दरम्यान, त्यांनी एक गाणे देखील चित्रित केले होते. या गाण्यात दोघांची केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना चांगलीच पसंत पडली होती. यानंतर आता जॅकलिन तिच्या आगामी नव्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त झाली आहे. नुकतेच या चित्रीकरणा दरम्यानचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते.

 

View this post on Instagram

 

How was everyone’s Sunday?? Fun project coming up soon! #myhappyplace❤️

A post shared by Jacqueline Fernandez (@jacquelinef143) on

इन्स्टाग्रामवर जॅकलिनचे 46 मिलियन फॉलोअर्स

सोशल मीडियावर जॅकलिनने 46 मिलियन फॉलोअर्सचा टप्पा गाठला आहे. यात केवळ भारतातीलच नव्हे तर, जगभरातील चाहत्यांचा समावेश आहे. 46 मिलियन फॉलोअर्सचा टप्पा गाठल्यानंतर जॅकलिनने चाहत्यांसाठी काही टॉपलेस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. या फोटोसोबत तिने ‘थँक्यू, लव्ह यू’, असे कॅप्शन दिले होते. जॅकलिनने इन्स्टाग्रामवर 3 फोटो शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत. गुलाबाच्या गुच्छासोबत तिने हे फोटोशूट केले आहे.

(Jacqueline Fernandez gifts a car to her staff member)

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI