जळगावात कोरोनाचा कहर, 157 पैकी 100 रुग्ण एकट्या अमळनेरमध्ये

| Updated on: May 09, 2020 | 1:45 PM

जळगाव जिल्ह्यात आज (9 मे) आणखी 32 कोरोनाबाधित रुग्ण आढळले (Jalgaon District Corona Update) आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 157 वर पोहोचला आहे.

जळगावात कोरोनाचा कहर, 157 पैकी 100 रुग्ण एकट्या अमळनेरमध्ये
Follow us on

जळगाव : राज्यातील प्रमुख शहर समजल्या जाणाऱ्या मुंबई, पुण्याला कोरोनाने (Jalgaon District Corona Update) विळखा घातला आहे. त्यानंतर आता छोट्या छोट्या जिल्ह्यातही कोरोनाचा कहर वाढत आहे. गेल्या 3 दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याचे दिसत आहे. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर हे कोरोनाचा हॉटस्पॉट बनलं आहे. आज जळगावमध्ये 32 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यातील सर्वाधिक 31 रुग्ण हे अमळनेरमधील आहेत.

त्यामुळे अमळनेरमधील कोरोनाबाधितांचा आकडा 100 झाला आहे. तर जळगाव जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 157 वर पोहोचला आहे.

जळगाव जिल्ह्यात आज (9 मे) आणखी 32 कोरोनाबाधित रुग्ण आढळले (Jalgaon District Corona Update) आहेत. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, चोपडा, जळगाव शहरातील स्वॅब घेतलेल्या 103 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल घेण्यात आले होते. त्यातील 71 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर 32 व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

पॉझिटिव्ह आढळलेल्या या रुग्णांमध्ये चोपडा तालुक्यातील अडावद येथील एक आणि अमळनेर येथील 31, अशा एकूण 32 रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 157 इतकी झाली आहे. तर दुर्देवाने यातील 18 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 3 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

अमळनेरात समूह संसर्ग?

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर हे कोरोनाचे हॉट्स्पॉट ठरत आहे. या शहरातील कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांची संख्या साततत्याने वाढत आहे. त्यामुळे या ठिकाणी समूह संसर्गाला सुरुवात झाल्याची भीती व्यक्त होत आहे. अमळनेरातील कोरोनाबाधितांची संख्या शुक्रवारी 69 होती. त्यात आज पुन्हा 31 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे ही संख्या 100 वर पोहोचली आहे.

दरम्यान, काल पाचोरा शहरात देखील एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता. हा अहवाल प्रशासनाला रात्री उशिरा प्राप्त झाला होता.

जळगावमध्ये कुठे किती रुग्ण? 

शहर – रुग्ण – मृत्यू (कंसात)

  • अमळनेर- 100  (8)
  • भुसावळ 21 (4)
  • जळगाव- 14 (2)
  • पाचोरा- 15 (3)
  • चोपडा- 5 (1)
  • मलकापूर 1
  • बुलडाणा – 1
  • एकूण – 157 (18)

संबंधित बातम्या : 

औरंगाबादेत कोरोनाचा कहर, दिवसाच्या सुरुवातीलाच 17 नवे रुग्ण, बाधितांचा आकडा 494 वर

काल 87, आज 96 पोलिसांना कोरोना, आतापर्यंत 714 पोलीस कोरोनाबाधित