AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dakhkhancha Raja Jyotiba | ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेसमोर नवे संकट, ग्रामस्थांचा कथानकावर आक्षेप!

या मालिकेत चुकीच्या पद्धतीने इतिहास दाखवला जात असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.

Dakhkhancha Raja Jyotiba | ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेसमोर नवे संकट, ग्रामस्थांचा कथानकावर आक्षेप!
| Updated on: Oct 30, 2020 | 6:15 PM
Share

मुंबई : अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या ‘कोठारे व्हिजन’ने ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ (Dakhkhancha Raja Jyotiba) ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे. पौराणिक मालिकेच्या या कथानकावर आता ज्योतिबा ग्रामस्थांनी आक्षेप (objection) घेतला आहे. या मालिकेत चुकीच्या पद्धतीने इतिहास दाखवला जात असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामस्थांच्या आक्षेपामुळे आता निर्मात्यांच्या समोर नवे संकट उभे राहिले आहे.(Jyotiba Villager’s objection on ‘Dakhkhancha Raja Jyotiba’ story)

स्टार प्रवाह वाहिनीवर सुरू असलेल्या ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेच्या कथानकावर जोतिबा ग्रामस्थांनी आक्षेप घेत कथानकात बदल करण्यास सांगितले आहे. या मालिकेत चुकीचा इतिहास दाखवला जात असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे. कथानकात योग्य ते बदल करूनच मालिका सुरू करा, असे आवाहन ग्रामस्थांकडून ‘कोठारे व्हिजन’ला करण्यात आले आहे. योग्य इतिहास दाखवला जात नाही, तोपर्यंत मालिका बंद ठेवण्यासाठीचे निवेदन ग्रामस्थांकडून ग्रामपंचायतीला सादर करण्यात आले आहे.

महाराष्ट्राचं लोकदैवत ‘ज्योतिबा’

‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ म्हणजे महाराष्ट्राचं लोकदैवत. ज्योतिबाच्या नावानं चांगभलं म्हणत हजारोंच्या संख्येने भक्त आपल्या लाडक्या दैवताला साकडं घालतात. कोरोनाच्या या संकटकाळात गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळ भक्तांना ज्योतिबाच्या मंदिरात जाऊन प्रत्यक्ष दर्शन घेता आलेलं नाही. ‘कोठारे व्हिजन’च्या ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या मालिकेमुळे आपल्या लाडक्या दैवताच्या भेटीची भक्तांची ही आस पूर्ण झाली आहे. या पौराणिक मालिकेच्या रुपात प्रेक्षकांना घरबसल्या ज्योतिबाचं दर्शन होत आहे.(Jyotiba Villager’s objection on ‘Dakhkhancha Raja Jyotiba’ story)

विशेष म्हणजे ज्योतिबा देवस्थान असलेल्या कोल्हापूर नगरीतच मालिकेचं संपूर्ण शूटिंग सुरू आहे. कोल्हापूर चित्रनगरीत या मालिकेचा भव्यदिव्य सेट उभारण्यात आला आहे. या मालिकेच्या निमित्ताने कोल्हापुरातील तंत्रज्ञ आणि कामगारांना नवी संधी मिळाली आहे.

‘स्टार प्रवाह प्रस्तुत दख्खनचा राजा ज्योतिबा ही मालिका अभ्यासपूर्वक बनवली जात आहे. आपल्या रसिकांपर्यंत प्रामाणिक मनोरंजनाद्वारे त्यांच्या आराध्य दैवताचं दर्शन आणि त्या दैवताच्या आयुष्यातील माहित असलेले आणि काही नव्याने कळतील असे पैलू या मालिकेद्वारे मांडण्यात येणार आहेत. भाविक आवर्जून ही मालिका बघतील आणि त्यांना आपल्या लाडक्या ज्योतिबाची मालिका आणि त्यांचा महिमा घरबसल्या पहाता येईल’, अशी माहिती स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे यांनी दिली होती.

प्रकाशाच्या गुलालाची उधळण

दरवर्षी लाखो भाविक ज्योतिबा देवस्थानाला भेट देऊन गुलालाची उधळण करत असतात. मात्र, यंदा कोरोनामुळे भक्तांना त्यांच्या देवाचे दर्शन घेता आलेले नाही. परंतु, स्टार प्रवाहच्या आणि कोठारे व्हिजनच्या पुढाकाराने ज्योतिबा नगरीत गुलाबी रंगाची लाईटिंग करण्यात आली होती.

(Jyotiba Villager’s objection on ‘Dakhkhancha Raja Jyotiba’ story)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.