“मला महाराष्ट्र आवडतो” कंगनाचे मराठीतून गोडवे

मी केलेला पहिला स्वतंत्र चित्रपट म्हणजे मराठा इतिहासातील गौरवशाली छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी लक्ष्मीबाई यांच्याविषयी, कारण मला महाराष्ट्र आवडतो" असे ट्वीट कंगनाने केले आहे.

"मला महाराष्ट्र आवडतो" कंगनाचे मराठीतून गोडवे

मुंबई : मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यानंतर अभिनेत्री कंगना रनौतविषयी उफाळलेला मुंबईकरांचा जनक्षोभ अद्याप मावळलेला नसतानाच कंगनाने मराठीतून गोडवे गायले आहेत. “मला महाराष्ट्र आवडतो” असे कंगनाने ट्वीटमध्ये म्हटले आहे. (Kangana Ranaut tweets she likes Maharashtra in Marathi)

“यश मिळाल्यानंतर मला मोठे हिरो असलेले, बिग बॅनर चित्रपट ऑफर करण्यात आले, पण मी सर्वांना नाकारले. मला प्रचंड विरोध सहन करावा लागला, मी मोठा स्ट्रगल केला. त्यानंतर मी केलेला पहिला स्वतंत्र चित्रपट म्हणजे मराठा इतिहासातील गौरवशाली छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी लक्ष्मीबाई यांच्याविषयी, कारण मला महाराष्ट्र आवडतो” असे ट्वीट कंगनाने केले आहे.

@BJP4Maha अशा एका ट्विटर हँडलवर कंगनाचे गुणगान गाणारे ट्वीट करण्यात आले होते. “साधारण दोन ते तीन वर्षांपूर्वी मणिकर्णीका या राणी लक्ष्मीबाईंवरील चित्रपटाच्या ट्रेलरचे उद्घाटन कंगनाने महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे पूजन करुन केले होते. खरं तर बॉलिवूडसारख्या खाणावळीच्या अधिपत्याखाली असलेल्या क्षेत्रामध्ये हे धाडसच होते.” असे यात म्हटले होते, त्याला उत्तर देताना कंगनाने महाराष्ट्राचे गोडवे गायले. (Kangana Ranaut tweets she likes Maharashtra in Marathi)

“मी 9 सप्टेंबरला मुंबईत येत आहे, कोणाच्या बापात हिंमत असेल तर थांबवा” अशा शब्दात कंगनाने ट्विटरवरुन चॅलेंज दिले आहे.

काय आहे प्रकरण ?

“शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला उघड धमकी दिली आणि मुंबईत पुन्हा पाऊल ठेवू नकोस असा इशारा दिला. याआधी मुंबईच्या रस्त्यांवर ‘आझादी’च्या घोषणा देण्यात आल्या. आता उघडपणे धमक्या मिळत आहेत. मुंबई पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे का वाटत आहे?” असा प्रश्न कंगनाने ट्विटरवरुन विचारला होता.

संबंधित बातम्या :

मुंबई, मराठी माणसाबद्दल आक्षेपार्ह बोलणारे कोणीही असो, आमच्यातलेही, तरी माफी मागावीच लागेल : संजय राऊत

कंगनाने सलमान खानला पटवण्याचा खूप प्रयत्न केला, तेव्हा तो म्हणाला होता… : राखी सावंत

मुंबईनं मला यशोदा आईसारखं स्वीकारलं, मुंबई माझी कर्मभूमी, कंगनाला उपरती

(Kangana Ranaut tweets she likes Maharashtra in Marathi)

Published On - 10:01 am, Mon, 7 September 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI