मुंबई, मराठी माणसाबद्दल आक्षेपार्ह बोलणारे कोणीही असो, आमच्यातलेही, तरी माफी मागावीच लागेल : संजय राऊत

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कंगना रनौत प्रकरणावर पुन्हा एकदा रोखठोक भूमिका घेतली आहे (Sanjay Raut on Kangana Ranaut ).

मुंबई, मराठी माणसाबद्दल आक्षेपार्ह बोलणारे कोणीही असो, आमच्यातलेही, तरी माफी मागावीच लागेल : संजय राऊत
Follow us
| Updated on: Sep 06, 2020 | 12:43 PM

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कंगना रनौत प्रकरणावर पुन्हा एकदा रोखठोक भूमिका घेतली आहे (Sanjay Raut on Kangana Ranaut ). कंगना रनौतविषयी अशा भाषेचा उपयोग योग्य आहे का? असा प्रश्न विचारला. त्यावर संजय राऊत यांनी मुंबई, महाराष्ट्र आणि मराठी माणसाबद्दल अभद्र भाषेचा उपयोग करणारा कुणीही असो माफी मागावीच लागेल, असं स्पष्ट मत व्यक्त केलं.

संजय राऊत म्हणाले, “मुंबई किंवा महाराष्ट्राबद्दल येथे राहणाऱ्या कोणत्याही मराठी माणसाबद्दल अशाप्रकारे अभद्र भाषेचा उपयोग करणाऱ्यांना महाराष्ट्राची आणि मुंबईची माफी मागावीच लागेल. ते आमच्यापैकी कुणी असेल तरीही त्याला मी माफी मागायला सांगेल.”

याआधी संजय राऊत यांनी अभिनेत्री कंगना रनौतशी व्यक्तिगत भांडण नाही. महाराष्ट्राचा अपमान करणारा कोणीही असो आम्ही आवाज उठवू, अशी भूमिका घेतली होती. यावेळी त्यांनी कंगनाला मराठी वाचता बोलता येतं का? असा प्रश्नही विचारला होता. तसेच इतरांच्या ट्वीटचे अर्थ कळण्यासाठी स्वतःचं ट्वीटर खातं स्वतः वापरावं लागतं, दुसऱ्या राजकीय पक्षाच्या आयटीसेलकडे द्यायचं नसतं, असा टोलाही लगावला.

संजय राऊत म्हणाले होते, “हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांचा आहे हे भान ठेवून बोलणं गरजेचं आहे. कंगना रनौतशी माझं व्यक्तिगत भांडण नाही. पण महाराष्ट्राच अपमान करणारा कुणीही, कितीही मोठा असो खपवून घेणार नाही. भाजपचे नेते आशिष शेलार यांचीही भूमिकाही मी वाचली त्यांनी हे अधिक जोराने म्हटलं पाहिजे. महाराष्ट्र त्यांचा सुद्धा आहे. ते सुद्धा महाराष्ट्रात राजकारण करतात.”

“छत्रपती शिवाजी महाराज एका पक्षाचे, जातीचे नाहीत. ते देशाचे आणि महाराष्ट्राचे आहेत. अशा शिवरायांच्या महाराष्ट्रावर एखादी व्यक्ती अशाप्रकारे घाणेरड्या शब्दात टीपण्णी करत असेल तर हा विषय एका पक्षाचा राहत नाही. हा विषय शिवसेनेचा नाही. हा विषय महाराष्ट्रातील 11 कोटी जनतेचा आहे. सर्व राजकीय पक्षांचा हा विषय आहे. इथं महाराष्ट्रात राहतात, खातात-पितात त्या सर्वाचा विषय आहे. बॉलिवूडमधील अनेक मोठ्या कलाकारांनी या विधानाचा निषेध केलाय. मी त्यांचं अभिनंदन करतो,” असंही संजय राऊत म्हणाले होते.

‘इतके दिवस महाराष्ट्रात राहता, मराठी वाचता-बोलता येतं का?’

संजय राऊत म्हणाले होते, “इतके दिवस महाराष्ट्रात राहता, मराठी वाचता येतं का? मराठी बोलता येतं का? माझ्या ट्वीटचा अर्थ समजून घेण्यासाठी स्वतःचं अकाऊंट स्वतः वापरावं लागतं. दुसऱ्या राजकीय पक्षाच्या आयटीसेलकडे ट्विटर अकाऊंट वापरायला द्यायचं नसतं. म्हणून असे घोळ होतात. काल कंगनाबाबत राज्याचे गृहमंत्री, परिवहन मंत्री यांनी भूमिका मांडली आहे. सरकारची भूमिका त्यातून स्पष्ट होते. मी सुद्धा पक्षाची भूमिका मांडली आहे. महाराष्ट्राचा अपमान करणारा कोणीही असो, त्याविरोधात आपण एकत्र आलं पाहिजे.”

संबंधित बातम्या :

कंगनाने सलमान खानला पटवण्याचा खूप प्रयत्न केला, तेव्हा तो म्हणाला होता… : राखी सावंत

कंगना बाई शुद्धीत नाही, तिला आपण इतकं सिरीयसली का घेतोय? : प्रफुल्ल पटेल

संबंधित व्हिडीओ :

Sanjay Raut on Kangana Ranaut

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.