कंगना बाई शुद्धीत नाही, तिला आपण इतकं सिरीयसली का घेतोय? : प्रफुल्ल पटेल

कंगना बाई शुद्धीत नाही," असे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी (NCP Praful Patel on Kangana Ranaut controversy) केले.

कंगना बाई शुद्धीत नाही, तिला आपण इतकं सिरीयसली का घेतोय? : प्रफुल्ल पटेल
Follow us
| Updated on: Sep 05, 2020 | 7:24 PM

गोंदिया : राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी अभिनेत्री कंगना रनौतच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. या बाईला आपण इतकं सिरीयसली का घेतोय, कंगना बाई शुद्धीत नाही, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले. (NCP Praful Patel on Kangana Ranaut controversy)

“अभिनेत्री कंगना बाईला आपण इतकं सिरीयसली का घेतोय? बाहेरुन येऊन तिने मुंबईला आपले निवासस्थान केले. तरी त्यांना समाधान नाही. इथे येऊन उलट-सुलट बोलते. मला वाटते, कंगना बाई शुद्धीत नाही,” असे वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केले.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही अभिनेत्री कंगनाला धमकावल्याचा आरोप कंगनाने केला होता. यानंतर सर्वत्र ट्विटर वॉर सुरु झाले होते. यानंतर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी कंगनाच्या कानशिलात लावण्यासंबंधी ट्विट केले होते. तसेच राष्ट्रवादीचे नेते आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कंगनाला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही, असे विधान केले होते. त्याशिवाय अनेक नेत्यांनी याबाबत विविध प्रतिक्रिया देत कंगनाच्या वक्तव्याचा निषेध केला होता.

काय आहे प्रकरण ?

“शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला उघड धमकी दिली आणि मुंबईत पुन्हा पाऊल ठेवू नकोस असा इशारा दिला. याआधी मुंबईच्या रस्त्यांवर ‘आझादी’च्या घोषणा देण्यात आल्या. आता उघडपणे धमक्या मिळत आहेत. मुंबई पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे का वाटत आहे?” असा प्रश्न कंगनाने ट्विटरवरुन विचारला होता. यावर संजय राऊत यांनीही ट्विटरवर खेळण्यापेक्षा पोलिसांकडे पुरावे द्यावेत, असा टोला कंगनाला लगावला होता.

ट्विटरवर आपली बदनामी करणारे ट्वीट ‘लाईक’ करण्यावरुन कंगनाचे काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांशी वाजले होते. “सुशांतच्या मारेकऱ्यांविरुद्ध लढा देणाऱ्या लोकांची निंदा करणारे ट्वीट लाईक केले जात आहेत. छेडछाड आणि दमदाटीचा निषेध करण्याऐवजी मुंबई पोलीस आयुक्त त्यांना प्रोत्साहन देत आहेत. लज्जास्पद!!” असे ट्वीट कंगनाने स्क्रीनशॉटसह केले होते.

“बॉलिवूड माफियांपेक्षा मला मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते. त्यामुळे हिमाचल सरकार किंवा थेट केंद्र सरकारनेच मला सुरक्षा द्यावी” असंही कंगना म्हणाली होती. आधी मुंबई पोलीस आणि नंतर मुंबईविषयी वक्तव्य केल्याने सर्वसामान्य नागरिकांनी कंगनाचा समाचार घेतला होताच. पण शिवसेना खासदार संजय राऊत, भाजप नेते निलेश राणे, काँग्रेस मंत्री नितीन राऊत अशी सर्वपक्षीय टीकाही तिच्यावर झाली. (NCP Praful Patel on Kangana Ranaut controversy)

संबंधित बातम्या :

कंगनाशी व्यक्तिगत भांडण नाही, महाराष्ट्राचा अपमान करणारा कोणीही असो, आवाज उठवू : संजय राऊत

आम्ही धमकी नव्हे, अ‍ॅक्शन घेतो, महाराष्ट्राच्या अस्मितेवर ड्रग्जच्या गुळण्या सहन करणार नाही, राऊतांचा रनौतवर हल्ला

मुंबईत येतेय, कोणाच्या बापात हिंमत असेल तर अडवा, कंगनाचा एल्गार, थोबाड फोडणार, शिवसेनेचा पलटवार

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.