Ashram 2 Controversy | ‘आम्ही कुठलीही कायदेशीर नोटीस पाठवलीच नाही’, ‘आश्रम’ वादावर करणी सेनेचे स्पष्टीकरण!

‘आश्रम’ वेब सीरीजमुळे धार्मिक भावना दुखावल्याचे म्हणत, करणी सेनेकडून प्रकाश झा यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली होती.

Ashram 2 Controversy | ‘आम्ही कुठलीही कायदेशीर नोटीस पाठवलीच नाही’, ‘आश्रम’ वादावर करणी सेनेचे स्पष्टीकरण!
काशीपुरवाल्या निराला बाबांची ही कथा आणखी पुढे सरकणार आहे. आता या मालिकेचा तिसरा भागही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Follow us
| Updated on: Nov 07, 2020 | 12:15 PM

मुंबई : सध्या अनेक वेब सीरीज आणि चित्रपटांमुळे काहीना काही वाद निर्माण होतच आहेत. ‘लक्ष्मी बॉम्ब’, ‘मिर्झापूर 2’नंतर बॉबी देओल अभिनित ‘आश्रम’ (ashram) ही वेब सीरीजदेखील वादात अडकल्याचे बोलले जात होते. या वेब सीरीजच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला होता. मात्र, दुसऱ्या पर्वाचे प्रदर्शन रोखण्यासाठी करणी सेनेने (Karni Sena) निर्मात्यांना कायदेशीर नोटीस (Notice) पाठवल्याचे बोलले जात होते. मात्र, आपल्याकडून ‘आश्रम’ या वेब सीरीजला किंवा त्यांच्या निर्मात्यांना कुठलीही नोटीस पाठवली नसल्याचे स्पष्टीकरण करणी सेनेकडून देण्यात आले आहे (Karni sena did not sent any legal notice to ashram web series says surjeet singh).

माध्यमांतील वृत्तानुसार, दोन दिवसांपूर्वी करणी सेनेच्या महाराष्ट्र शाखेचे राज्य संघटनमंत्री सुरजित सिंह यांच्या वतीने निर्माते प्रकाश झा यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली होती. त्यानंतर या बातमीची खूप चर्चा देखील झाली. या वादादरम्यान, ‘प्रेक्षक याचा निर्णय घेतील’, असे मत ‘आश्रम’चे निर्माते प्रकाश झा यांनी व्यक्त केले होते. परंतु, आता करणी सेनेच्या महाराष्ट्र शाखेचे राज्य संघटन मंत्री सुरजित सिंह यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून यावर भाष्य केले आहे. ‘आपल्याकडून अशी कोणतीही नोटीस निर्मात्यांना पाठवण्यात आलेली नाही. सध्या सोशल मीडियावर जे पत्र फिरते आहे, ते बनावट आहे’, असे सुरजित सिंह यांनी सांगितले आहे.

प्रकाश झा यांचा पलटवार

सदर नोटीसचे वृत्त समोर येताच निर्माते प्रकाश झा यांनी देखील आपली प्रतिक्रिया नोंदवली होती. ‘त्यांच्या बोलण्याने मी निर्णय घेणारा कोण? ‘आश्रम’च्या पहिल्या पर्वाला 40 कोटींहून अधिक प्रेक्षकांनी पाहिले आहे. त्यामुळे ही वेब सीरीज नकारात्मकता पसरवते, की सकारात्मकता ही प्रेक्षकांनाचा ठरवू द्यावे’, असे प्रकाश झा म्हणाले. (Karni sena did not sent any legal notice to ashram web series says surjeet singh)

बंदी घालण्याची नोटीस खोटी?

‘आश्रम’ वेब सीरीजमुळे धार्मिक भावना दुखावल्याचे म्हणत, करणी सेनेकडून प्रकाश झा यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली होती. सदर नोटीस करणी सेनेच्या राज्य संघटनेचे सरचिटणीस सुरजित सिंह यांनी प्रकाश झांना पाठवली असल्याचे म्हटले जात होते.

निर्माते प्रकाश झा यांच्या व्यतिरिक्त,  जिथे ही वेब सीरीज प्रदर्शित करण्यात आली त्या ‘एमएक्स प्लेयर’ या ओटीटी प्लॅटफॉर्मला देखील कायदेशीर नोटीस पाठवली गेली होती. ‘या वेब सीरीजमधून धार्मिक परंपरा, आश्रम धर्म, प्राचीन सांस्कृतिक परंपरा यांना लक्ष्य करण्यात आले आहे’, असे या कायदेशीर नोटीसमध्ये म्हटले होते.

वेब सीरीजवर बंदी घालण्याची मागणी

‘आश्रम’ या वेब सीरीजमध्ये बॉबी देओल मुख्य भूमिका साकारत आहे. त्याचे पात्र एका ढोंगी बाबाची कथा सांगणारे आहे. या वेब सीरीजच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला असला, तरी आता दुसऱ्या भागाच्या प्रदर्शनावर मात्र संकट कोसळले आहे. धार्मिक भावना दुखावल्याचे कारण देत, करणी सेनेने यावर बंदी घालण्याची मागणी केली होती.(Karni sena did not sent any legal notice to ashram web series says surjeet singh)

करणी सेनेचे सरचिटणीस सुरजित सिंह यांच्या वकिलाने पाठवलेली कायदेशीर नोटीस असल्याचा दावा करत यात असे म्हणण्यात आले होते की, ‘प्रकाश झा यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘आश्रम-चॅप्टर-2- द डार्क साइड’ नावाच्या वेब सीरीजमुळे लोकांच्या भावनांवर मोठ्या प्रमाणात प्रभाव पडला आहे. शिवाय लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. ही वेब सीरीज येणाऱ्या तरुण पिढीमध्ये हिंदू धर्माबद्दल नकारात्मकता पसरवणारी ठरणार आहे.’

तसेच वेब सीरीजच्या अधिकृत ट्रेलरमध्ये दर्शविलेले वैशिष्ट्य कोणत्याही व्यक्तिमत्वाला लक्ष्य करत नाही. तर, या ट्रेलरमधून पुरातन परंपरा, प्रथा, हिंदू संस्कृती, आश्रम धर्म यांना निशाणा बनवले जात आहे. ज्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत’, असेही या नोटीसमध्ये म्हणण्यात आले आहे.

मात्र सदर नोटीस ही आम्ही पाठवलेली नसून, ती बनावट असल्याचा दावा सुरजित सिंह यांनी केला आहे. त्यामुळे आता ही बनावट नोटीस नेमकी कोणी पाठवली याचा तपास केला जाणार आहे.

(Karni sena did not sent any legal notice to ashram web series says surjeet singh)

Non Stop LIVE Update
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.