AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KBC 11 : शाळेत मध्यान्ह भोजनाचं काम, मोबाईलही नाही, अमरावतीच्या ‘खिचडी ताई’ करोडपती!

दुसऱ्याच आठवड्यात पर्वातील दुसरा करोडपती मिळाला आहे. महाराष्ट्रातील एक महिला (Babita Tade win 1 crore) करोडपती  ठरली असून बबीता ताडे (Babita Tade) असे या महिलेचे नाव आहे.

KBC 11 : शाळेत मध्यान्ह भोजनाचं काम, मोबाईलही नाही, अमरावतीच्या 'खिचडी ताई' करोडपती!
| Updated on: Sep 18, 2019 | 4:38 PM
Share

मुंबई : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध रिअॅलिटी शो ‘कौन बनेगा करोडपती’च्या 11 व्या पर्वाचा (Kaun Banega Crorepati) दुसरा करोडपती मिळाला आहे. ‘कौन बनेगा करोडपती’ (Kaun Banega Crorepati) या शोमध्ये बिहारमध्ये राहणाऱ्या सनोज राज यांनी 11 व्या पर्वातील पहिला करोडपती होण्याचा मान मिळवला होता. त्यानंतर दुसऱ्याच आठवड्यात पर्वातील दुसरा करोडपती मिळाला आहे. महाराष्ट्रातील एक महिला (Babita Tade win 1 crore) करोडपती  ठरली असून बबीता ताडे (Babita Tade) असे या महिलेचे नाव आहे. बबीता या महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात राहतात.

नुकतंच सोनी इंटरटेनमेंट चॅनलने (Kaun Banega Crorepati 11) याबाबतचा एक प्रोमो रिलीज केला आहे. यात बबीता यांनी 1 कोटी रुपये जिंकल्याचे सांगितलं आहे. यात केबीसीचे होस्ट अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी बबीता ताडे यांचा प्रवास सांगितला आहे. बबीता ताडे या एका सरकारी शाळेत लहान मुलांसाठी मध्यान्य भोजन बनवण्याचे काम (school employee Babita Tade)  करतात. त्यामुळे आजूबाजूचे लोक त्यांना ‘खिचडी स्पेशल’ या नावानेच हाक मारतात.

बबीता दररोज 450 लहान मुलांसाठी जेवण (government school employee Babita Tade) बनवतात. गेल्या 17 वर्षांपासून दररोज न चुकता त्या हे काम करतात. बबीता यांना या कामासाठी दर महिना फक्त 1500 रुपये मिळतात. विशेष म्हणजे बबीता यांनी 1 कोटी रुपये जिंकले असून लवकरच त्या 7 कोटीच्या प्रश्नाचे उत्तर देणार आहेत.

जेवण बनवणे हे खूप सोपं काम आहे, असे अनेकांना वाटते. मात्र असं अजिबात नाही. मला जेवण बनवण्यात फार आनंद मिळतो. कारण शाळेतील लहान मुलांना मी बनवलेले जेवण फार आवडते, असं मत बबीता ताडे (Babita Tade Win 1 crore) यांनी यावेळी व्यक्त केले. कोणतेही काम छोटे किंवा मोठे नसते असेही त्या यावेळी म्हणाल्या. आपल्याकडे स्वत:चा मोबाईल असावा, असे बबीता यांचे स्वप्न आहे.

दरम्यान केबीसीचा हा एपिसोड अद्याप प्रदर्शित झालेला नाही. आज (18 सप्टेंबर) आणि उद्या (19 सप्टेंबर) रात्री 9 वाजता हा एपिसोड प्रदर्शित होणार आहे. मात्र या प्रोमोवरुन सोशल मीडियावर बबीता (Babita Tade Win 1 crore)  चांगल्याच प्रसिद्ध झाल्या आहेत. अनेकांनी या प्रोमोखाली तुमचा प्रवास फार प्रेरणादायी आहे. तुम्हाला पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा, अशा कमेंट केल्या आहेत.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.