Indian Railway | स्टेयरिंगशिवाय ट्रेन कशी बदलते ट्रॅक, जाणून घ्या याबाबत सर्व काही

ट्रॅक बदलण्यासाठी, ज्या ट्रॅकमध्ये अॅडजस्टेबल ट्रॅक असतो, तो रेल्वेच्या मार्गानुसार बदलला जातो. (Know how the train changes tracks without steering)

Indian Railway | स्टेयरिंगशिवाय ट्रेन कशी बदलते ट्रॅक, जाणून घ्या याबाबत सर्व काही
स्टेयरिंगशिवाय ट्रेन कशी बदलते ट्रॅक
Follow us
| Updated on: May 29, 2021 | 4:37 PM

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे हे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क मानले जाते. नेहमीच शेकडो गाड्या रुळावर धावतात आणि त्या प्रचंड तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हाताळल्या जातात. बर्‍याच ठिकाणी सिंगल असूनही रेल्वेची आवागमन कायम असून रेल्वे प्रवाशांसह माल निश्चित ठिकाणी पोहचवण्यात येतो. रेल्वे रुळांचे जाळे दुर्गम भागातही पसरले आहे, त्या माध्यमातून गाड्या लोकांपर्यंत पोहोचत आहेत. तुम्ही अनेकदा पाहिले असेल की, बर्‍याच ठिकाणी बरेच ट्रॅक असतात. या ट्रॅकच्या जाळ्यांमध्येही आपली ट्रेन वेगाने आपला मार्ग शोधते. यावेळी आपल्याला नेहमी प्रश्न पडतो की हे कसे घडते आणि ट्रेन आपला मार्ग कसा नियंत्रण ठेवते? ट्रेन ट्रॅकच्या जाळ्यात कसा आपला मार्ग निवडते आणि ट्रेन इंजिन ट्रॅक कसे बदलते? (Know how the train changes tracks without steering)

कशी चालते ट्रेन?

ट्रेन ट्रॅकला आतून पकडून चालते. म्हणजेच, रेल्वेचे टायर्स ट्रॅकवर सेट असतात आणि टायरमध्ये ट्रॅकच्या आतला हिस्सा मोठा असतो, जो ट्रॅकला घट्ट पकडतो. ज्या प्रकारे ट्रेन रुळ असताता त्याचप्रमाणे ट्रेन पुढे सरकत जाते.

कशी वळते ट्रेन?

जरी ट्रेनचा ट्रॅक सरळ असला, तरी जिथे ट्रेनला वळणे आवश्यक आहे तिथे ट्रॅक थोडा वेगळा असतो. आपण पाहिले असेल की रुळांमधे लोखंडी पट्टी लावली आहे. येणार्‍या ट्रेनला दिशा देण्याचे काम करते. हे किंचित वळलेले असते, अशा प्रकारे जर ट्रेनला वळायचे असेल किंवा दुसर्‍या ट्रॅकवर जायचे असेल तर हा लॉकसारखा ट्रॅक एका बाजूला चिपकावला जातो आणि ट्रॅकची दिशा बदलली जाते. यामुळे ट्रेन दुसऱ्या बाजूला वळते. हा एक प्रकारचा अॅडजस्टेबल ट्रॅक आहे, जो ट्रेनला दिशा देण्याचे काम करतो.

कोण करते अॅडजस्ट?

ट्रॅक बदलण्यासाठी, ज्या ट्रॅकमध्ये अॅडजस्टेबल ट्रॅक असतो, तो रेल्वेच्या मार्गानुसार बदलला जातो. पूर्वी हे काम रेल्वेच्या कर्मचार्‍याकडून केले जात असे आणि दिवसभर ते मॅन्युअली पद्धतीने बदलले जाते. तथापि, आता हे काम मशीनद्वारे केले जात आहे. सिग्नल आणि मार्गानुसार मशीन ते अॅडजस्ट करते आणि त्यानुसार ट्रेनला दिशा मिळते आणि ती फिरते. (Know how the train changes tracks without steering)

इतर बातम्या

“मोदी सरकारच्या 7 वर्षांच्या काळ्या कारभाराची पोलखोल; काँग्रेसची उद्या राज्यभर निदर्शने”

पावसाळ्यात कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता, लक्षणं ओळखून वेळीच उपचार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.