Maharashtra Corona Update | राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 24 हजार 427 वर, दिवसभरात 53 जणांचा मृत्यू

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण (Latest Corona Patients Updates Maharashtra) संख्या 24 हजार 427 वर पोहोचली आहे.

Maharashtra Corona Update | राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 24 हजार 427 वर, दिवसभरात 53 जणांचा मृत्यू

मुंबई : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण (Latest Corona Patients Updates Maharashtra) संख्या 24 हजार 427 वर पोहोचली आहे. आज राज्यात 1 हजार 026 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज 339 कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 5 हजार 125 रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली (Latest Corona Patients Updates Maharashtra).

दिवसभरात 53 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

आज राज्यात 53 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाबळींची एकूण संख्या आता 921 झाली आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी मुंबई मधील 28, पुण्यात 6, पनवेलमध्ये 6, जळगावमध्ये 5, सोलापूर शहरात 3, ठाण्यात 2, रायगडमध्ये 1, औरंगाबाद शहरात 1 आणि अकोला शहरात 1 मृत्यू झाला आहे.

आज झालेल्या मृत्यूंपैकी 29 पुरुष तर 24 महिला आहेत. आज झालेल्या 53 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 21 रुग्ण आहेत. तर 27 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर 5 जण 40 वर्षांखालील आहे. या 53 रुग्णांपैकी 35 जणांमध्ये (66 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

54.92 लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार, क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 1289 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण 12 हजार 923 सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी 54.92 लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण (Latest Corona Patients Updates Maharashtra) केलेले आहे.

2, 81, 655 जण होम क्वारंटाईनमध्ये

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 2 लाख 21 हजार 645 नमुन्यांपैकी 1 लाख 95 हजार 804 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत. तर 24 हजार 427 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 2 लाख 81 हजार 655 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 15 हजार 627 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

कोरोना रुग्णांची अद्ययावत आकडेवारी :

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861

Latest Corona Patients Updates Maharashtra

संबंधित बातम्या :

सोलापुरात पहिला रुग्ण सापडून 1 महिना पूर्ण, 12 एप्रिल ते 12 मेपर्यंत किती कोरोना रुग्ण सापडले?

नाशिकमध्ये दोन नवजात बाळांना कोरोनाची बाधा, बाधितांचा आकडा 693 वर

Lockdown : 17 तारखेनंतरच्या लॉकडाऊनबाबतची माहिती नीट कळवा, मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

बेस्टच्या 81 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, 70 टक्के कर्मचारी विलगीकरणात

Published On - 12:37 am, Wed, 13 May 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI