‘लीप दिवस’ का साजरा करतात? 29 फेब्रुवारीचा रंजक इतिहास

लीप वर्षाच्या निमित्ताने 'गुगल'नेही आकर्षक डूडल तयार करुन 'लीप दिवस' साजरा केला आहे.

'लीप दिवस' का साजरा करतात? 29 फेब्रुवारीचा रंजक इतिहास

मुंबई : आजचा दिवस वर्षातील उर्वरित 365 दिवसांपेक्षा वेगळा आहे. याचं कारण म्हणजे 29 फेब्रुवारीचा दिवस चार वर्षांनी एकदाच येतो. लीप वर्ष म्हणजे नेमकं काय? लीप दिवस का साजरा केला जातो? 29 फेब्रुवारीचा इतिहास काय? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधणं इंटरेस्टिंग आहे. (Leap Day Interesting Facts and History)

लीप वर्षात फेब्रुवारी महिन्यात 28 ऐवजी 29 दिवस असतात. साहजिकच लीप वर्षात 365 ऐवजी 366 दिवस असतात. ‘गुगल’नेही आकर्षक डूडल तयार करुन ‘लीप दिवस’ साजरा केला आहे. पुढचं लीप वर्ष 2024 मध्ये असेल.

लीप वर्षाचं कारण काय?

पृथ्वीला सूर्याची प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी साधारणपणे 365 दिवस लागतात. खगोलशास्त्रीय आकडेवारीनुसार नेमका कालावधी 365.242 दिवस इतका असतो. दरवर्षी 0.242 दिवसाचा वाढीव कालावधी शिल्लक राहतो. चार वर्षांमधील हा वाढीव कालावधी एकत्रित करुन त्याचा एक दिवस पूर्ण केला जातो. फेब्रुवारी महिन्यात 28 दिवस असल्यामुळे त्याला जोडून ‘लीप दिवस’ साजरा केला जातो.

लीप वर्ष काही जणांसाठी खूप खास असतं. काही जण 29 फेब्रुवारीचा मुहूर्त साधून लग्न करतात. मात्र ज्यांचा जन्म लीप वर्षात 29 फेब्रुवारीला होतो, त्यांना सेलिब्रेशन करण्यासाठी चार वर्ष वाट बघावी लागते.

दिनविशेष 29 फेब्रुवारी

1896 – भारताचे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांचा जन्मदिवस.
1904 – प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना रुक्मिणी देवी यांचा जन्म.
2004 – ‘द लॉर्ड ऑफ द रिंग : द रिटर्न ऑफ द किंग’ चित्रपटाने 11 ऑस्कर जिंकून इतिहास रचला
2008 – पाकिस्तानच्या पेशावरमध्ये आत्मघाती हल्ल्यात 44 जणांचा मृत्यू

Leap Day Interesting Facts and History

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI